समुद्रशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्या शरीरावर असणाऱ्या तिळांच्या शुभ आणि अशुभ गोष्टींबाबत अधिक सांगण्यात आले आहे. महिलांच्या शरीरावर असणाऱ्या तिळांचे वेगवेगळे महत्त्व असते असे यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. काही तीळ हे शुभ ठिकाणी असतात तर काही ठिकाणी असणारे तीळ हे तुम्हाला अशुभ ठरतात आणि त्याचा दुष्परिणाम तुम्हाला भोगावा लागतो असे हे शास्त्र सांगते. पण शरीरावर नक्की अशा कोणत्या ठिकाणी असणारे तीळ महिलांना अशुभ ठरतात आणि त्याचा कोणता परिणाम त्यांना भोगावा लागतो याची माहिती आम्ही तुम्हाला या लेखातून देत आहोत. तसंच महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशुभ तीळ तुमच्या शरीरावर लहानपणापासूनच असतील असं अजिबात नाही. बऱ्याचदा व्यक्तीच्या कर्मानुसार आणि आचरणानुसारही हे तीळ शरीरावर येतात आणि काहीवेळा पूर्वी असणारे तीळ निघूनही जातात.
छातीवर असणारा तीळ
कोणत्याही महिलेच्या छातीवर डाव्या बाजूला तीळ असेल तर त्यानुसार ही स्त्री आपल्या वैवाहिक आयुष्यात सुखी राहू शकत नाही. तिच्या जोडीदारासह तिचे कायम मतभेद राहतात आणि लहान अथवा मोठी कोणतीही गोष्ट असो आपल्या जोडीदारासह तिचा कायम वाद होत राहील असे ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे. तसंच डाव्या बाजूला असणारा तीळ या महिलेला आयुष्यात कोणतेही सुखसमाधान मिळू देत नाही असंही म्हटले जाते.
पोटावरील तीळ
एखाद्या महिलेच्या पोटावरील बेंबीच्या जवळ असेल तर तिला सतत कोणत्या ना कोणत्या शारीरिक आजाराला सामोरे जावे लागते. शारीरिक आजारामुळे ही महिला कायम अस्वस्थ राहते आणि या कारणामुळे कायम तिचे पैसे आजारांवर खर्च होत राहतात. ज्यामुळे पैसाही टिकू शकत नाही. वास्तविक पैसा टिकला नाही तरीही अशा महिलांजवळ कोणत्या ना कोणत्या पद्धतीने पैशाची तरतूद मात्र नक्की गरजेच्या वेळी नक्की होते. पैशाची कमतरता भासत नाही.
कपाळावर असणाऱ्या तिळाचा परिणाम
कोणत्याही स्त्री च्या कपाळावर डाव्या बाजूला तीळ असेल तर बऱ्याचदा तिला बुद्धिमान समजण्यात येते. पण ज्योतिषशास्त्रानुसार असा तीळ असणारी महिला ही अत्यंत खर्चिक प्रवृत्तीची असते आणि अशा महिलांजवळ अजिबात पैसे टिकू शकत नाहीत असे सांगण्यात येते. तसंच या महिलांना अधिक बोलण्याची सवय असते आणि कोणाच्याही सांगण्यावर या महिला पटकन विश्वास ठेऊन आपले स्वतःचे नुकसान करून घेतात. जर कपाळाच्या मध्यभागी तीळ असेल आणि असा तीळ अधिक गडद असेल तर तेदेखील महिलांसाठी अशुभ मानण्यात येते.
हातावर असणारा तीळ
हातावर मुठीत असणारा तीळ हा नेहमी तुम्हाला धनप्राप्तीसाठी लाभदायक असतो असे म्हटले जाते. मात्र त्यातही हातावरील कोणत्या पर्वतावर तीळ आहे यानुसार त्याचा लाभ आणि नुकसान ठरते. जर तीळ सूर्य पर्वतावर असेल तर तो अशुभ मानण्यात येतो. सूर्य पर्वत हा अनामिका बोटाच्या (रिंग फिंगर) खाली असतो. या ठिकाणी तीळ असेल तर अशा महिलांना नोकरीसंबंधित अनेक अडचणी येत राहतात. तसंच जर चंद्र पर्वतावर महिलांच्या तीळ असेल तर अशा महिलांना नैराश्याच्या त्रासाला आणि आजाराला सामोरे जावे लागते.
डोळ्यांवरील तीळ
ज्या महिलेच्या उजव्या डोळ्यावर तीळ आहे त्या महिलेचा स्वभाव हा तीळ दर्शवितो. अशा महिला दुस्वासी स्वभावाच्या असतात. त्यांना दुसऱ्यांचे चांगले झालेले पाहता येत नाही. तर ज्या महिलेच्या डोळ्याच्या किनाऱ्यावर तीळ असतो ती महिला अधिक घमेंडी आणि गर्विष्ठ असते. त्याचा तिला आयुष्यात खूपच त्रास भोगावा लागतो.
ओठावरील तीळ
ओठावर तीळ असणे सौंदर्यासाठी नेहमीच आकर्षक आणि उठावदार समजण्यात येते. काही महिला तर तीळ नसतानाही काजळाच्या सहाय्याने ओठावर तीळ काढतात. पण ज्या महिलांच्या वरच्या ओठांवर तीळ आहे त्या महिलांना ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जोडीदाराचा पाठिंबा कधीच मिळत नाही. तसंच त्यांच्या आयुष्यात वैवाहिक सुख नसते.
तुम्हीदेखील तुमच्या शरीरावर नक्की कुठे कुठे तीळ आहे हे आता तपासून घ्या. त्यानुसार जाणून घ्या हे शुभ आहे की अशुभ. तुम्हाला जर आमचा हा लेख आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक