ताज्या आणि सुंगधित फुलांनी घर सजवलं की घराला एक प्रकारचा टवटवीतपणा येतो. एखाद्या कुंडीत अथवा बाऊलमध्ये ठेवलेली फुलं पाहून तुमचा मूड पटकन फ्रेश होतो. फुलांमध्ये मन प्रसन्न करण्याची जादू असते. मात्र वातावरणाचा फुलांवर परिणाम होतो आणि ती कोमेजतात. ज्यामुळे अनेकजण सजावटीसाठी कुत्रिम फुलांचा वापर करतात. मात्र ताज्या नैसर्गिक फुलांची किमया कुत्रिम फुलांमधून साधता येत नाही. कारण जरी ही कुत्रिम फुलं दिसायला आकर्षक आणि टिकायला चांगली असली तरी त्यामुळे हवा तसा फ्रेशनेस नक्कीच मिळत नाही. यासाठीच या टिप्स फॉलो करा ज्यामुळे तुमच्या घरात सजावटीसाठी वापरलेली नैसर्गिक फुलं जास्त काळ टिकतील.
फुलांचा टवटवीतपणा टिकवण्यासाठी टिप्स
घरात फुलदाणी अथवा बाऊलमध्ये ठेवलेली फुलं जास्त काळ टवटवीत दिसण्यासाठी या टिप्स नक्कीच फायद्याच्या आहेत.
सोड्याचा वापर करा
घरात सोडा स्वयंपाकासाठी, स्वच्छतेसाठी अशा अनेक कारणांसाठी वापरला जातो. मात्र तुम्हाला माहीत आहे का या सोड्याचा वापर तुम्ही फुलांचा ताजेपणा टिकवण्यासाठीदेखील वापरू शकता.
कसा कराल वापर –
- यासाठी पाव कप सोडा पाण्यात मिसळून ते पाणी फुलदाणी अथवा बाऊलमध्ये भरा.
- या पाण्यात फुलं ठेवल्यामुळे ती जास्त काळ फ्रेश दिसतील.
- सोड्यामधील साखरेच्या घटकांमुळे फुलांचा टवटवीतपणा टिकून राहतो.
- जर तुम्ही काचेची फुलदाणी अथवा बाऊल वापरणार असाल तर त्यासाठी क्लब सोडा वापरा ज्यामुळे त्यातील पाणी कायम स्वच्छ दिसेल.
हेअर स्प्रेचा करा वापर
सोडा ठीक होतं पण हेअर स्प्रे ऐकून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. पण होय हेअर स्प्रे फक्त हेअर स्टाईलसाठीच नाही तर तुम्ही फुलं ताजी ठेवण्यासाठीदेखील वापरू शकता.
काय कराल –
- फुलदाणीत फुलं ठेवा आणि थोड्या अंतरावरून त्या फुलांवर हेअर स्प्रे मारा.
- हेअर स्प्रेमुळे तुमची हेअर स्टाईल जशी सेट होते अगदी तसंच तुमच्या फुलदाणीतील फुलंही काही काळासाठी सेट होतील आणि आहेत तशीच राहतील.
अॅपल सायडर व्हिनेगर वापरा
सणासुदीला अथवा तुमच्या घरी एखादा खास कार्यक्रम असेल तर अशा वेळी घरात सजावटीसाठी वापरलेली फुलं जास्त काळ टिकावी असं तुम्हाला नक्कीच वाटू शकतं. यासाठी तुम्ही अॅपल सायडर व्हिनेगरचा वापर करू शकता.
काय कराल –
- फुलदाणी अथवा फुलं ठेवलेल्या भांड्यातील पाण्यात दोन चमचे साखर आणि दोन चमचे व्हिनेगर मिसळा.
- ज्यामुळे तुमच्या सजावटीतील फुलांचा ताजेपणा एक ते दोन दिवस टिकून राहिल.
तांब्याची नाणी वापरा
तांब्याची नाणी आजकाल सर्वांकडे असतातच असं नाही. पण जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही फुलांचा टवटवीतपणा टिकवण्यासाठी या नाण्यांचा वापर करू शकता.
कसा कराल वापर –
- फुलदाणीतील पाण्यात तांब्याची नाणी आणि साखर मिसळा.
- तांबे हे एखाद्या एसिडिफायरप्रमाणे काम करते. ज्यामुळे फुलांना जीवजंतूचा संपर्क होत नाही आणि फुलं लवकर खराब होत नाहीत.
फोटोसौजन्य – इन्साग्राम
अधिक वाचा –
घरातील तुळशीचं रोप नेहमी टवटवीत ठेवण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स
घरात गुडलकसाठी खरेदी करत असाल विंड चाइम तर लक्षात ठेवा या गोष्टी
वास्तुशास्त्रानुसार सुख-समृद्धीसाठी घरात असावेत हे पाळीव प्राणी (Pets For Home In Marathi)