ADVERTISEMENT
home / Uncategorized
Vastu Shastra For Pooja Room In Marathi

जाणून घ्या कसं असावं वास्तुशास्त्रानुसार देवघर (Vastu Shastra For Pooja Room In Marathi)

घर असो दुकान असो वा ऑफिस असो सगळेकडे छोटं का असेना देवघर हे असतंच. घरामध्ये तर देवघर असलंच पाहिजे. कारण प्रत्येक घरातील हा मुख्य भाग आहे. जो आपल्या आध्यात्मिक प्रगती आणि मनशांतीशी निगडीत असतो. त्यातही लाकडी देवघर डिझाईन असेल तर बऱ्याच जणांना आवडतं. खरं तर देवघर हे आपण आपल्या आवडीनुसार बनवून घेत असतो. मन प्रसन्न राहावं आणि देवघराजवळ आल्यानंतर कोणतीही चिंता सतावू नये असं वातावरण आपल्याला हवं असतं. त्याप्रमाणेच देवघर अनेक घरांमध्ये तयार करण्यात येतं. पण वास्तुशास्त्रानुसार (Vastu shastra devghar in marathi) नक्की देवघर कसं असावं याची माहितीदेखील काही जणांना हवी असते. वास्तुशास्त्रानुसार काही घरांमध्ये बदल करण्यात येतात. त्यानुसार देवघर नक्की कसं हवं याची माहिती आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे देण्याचा प्रयत्न करत आहोत. वास्तुशास्त्रानुसार घरातील पूजा घर (Vastu Shastra For Pooja Room In Marathi) कसं बांधण्यात यावं त्याचे नक्की काय फायदे आहेत ते आपण जाणून घेऊया.  

घरातील मंदिरकरिता वास्तू टिप्स (Vastu Shastra Tips For Devghar In Marathi)

घरातील मंदिरकरिता वास्तू टिप्स -Vastu tips for temple at home

Instagram

ADVERTISEMENT

घरातील मंदिराकरिता नक्की कोणत्या वास्तू टिप्स फॉलो करायच्या हे जाणून घ्या. वास्तू टिप्स आपण फॉलो करत असतो. कधी घरात बासरी ठेवतो, तर कधी मोरपीस – याचे अनेक फायदेही आपल्याला अनुभवायला मिळतात. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरातील मंदीर कसे तयार करून घ्यावे यासाठी काही महत्वाच्या टिप्स – 

  • देवघर बनविण्यासाठी योग्य जागा म्हणजे हॉल अथवा स्वयंपाकघर. अनेक जणांच्या घरात स्वयंपाकघरातच देवघर असते. स्वयंपाकघरातील ईशान्य दिशेचा कोपरा अर्थात उत्तर – पूर्व दिशेच्या ठिकाणी तुम्ही देवघर बनवा. या दिशेला पूजा केल्याने देवी – देवता अधिक लवकर प्रसन्न होतात असं वास्तुशास्त्रात सांगण्यात येते. ईशान्य कोपऱ्यातून ईश्वरीय शक्ती प्रवेश करते असा समज आहे आणि नैऋत्य दिशेने अर्थात पश्चिम – दक्षिण दिशेने ही शक्ती बाहेर जाते. त्यामुळे या दिशेला कधीही देव्हारा असू नये. 
  • देवघरामध्ये अति मोठ्या मूर्ती ठेऊ नयते. वास्तुशास्त्रानुसार तुम्ही देव्हाऱ्यात शिवलिंग अजिबात ठेऊ नये. शिवलिंग असेलच ते अगदी लहान अर्थात अंगठ्याच्या आकाराइतके असावे. तसंच एकच शिवलिंग देव्हाऱ्यात ठेवावे. एकापेक्षा अधिक शिवलिंग ठेवणे घरासाठी चांगले मानण्यात येत नाही. तसंच लहान मूर्ती असाव्यात अथवा तुम्ही देवाचे फ्रेम केलेले फोटो ठेवावेत 
  • काही वेळासाठी तरी किमान सूर्यप्रकाश पोहचेल अशा ठिकाणी देव ठेवावे. सूर्यप्रकाश आणि ताजी हवा ज्या देवघरांमध्ये येत राहते त्या घरांमध्ये दोष आपोआप नाहीसे होतात असं म्हटलं जातं. तसंच सूर्यप्रकाशामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा घरामध्ये अधिक राहण्यासही मदत मिळते. सूर्यप्रकाश वास्तूसाठी आवश्यक आहे.
  • वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये देवघर असणाऱ्या ठिकाणी कोणत्याही चामड्याच्या वस्तू अर्थात चप्पल, बेल्ट, बूट जवळपास ठेऊ नयेत. तसंच देवघरात वा देवघराजवळ कोणत्याही मृत व्यक्तीचे अथवा पूर्वजांचे फोटो लावणे चुकीचे ठरते.
  • पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी तुम्ही दक्षिण दिशा निवडा. तसंच देवघराच्या ठिकाणी केवळ पूजेशी आणि देवाशी निगडीत सामानच ठेवावे. इतर कोणत्याही वस्तू तिथे ठेऊ नयेत
  • देवघराजवळ शौचालय अथवा बाथरूम असणे हे अशुभ ठरते. त्यामुळे देवघर बाथरूमपासून दूर आहे की नाही याची खात्री करून घ्या 
  • देवघराच्या जवळ ईशान्य कोनात झाडू किंवा कचऱ्याची कुंडी ठेवू नये. शक्य असल्यास देवघर स्वच्छ करण्यासाठी वेगळा झाडू आणि फडकं ठेवावं. ज्या फडक्याने घरातील इतर खोल्यातील लादी पुसली जाते. त्याचा फडक्याचा वापर देवघर पुसण्यासाठी वापरात आणू नये
  • देवघरात जर यज्ञ करण्याची व्यवस्था असेल तर ते नेहमी आग्नेय कोनातच असावं. 
  • देवघरांमध्ये कधीही पैसे किंवा महागड्या वस्तू ठेवू नयेत
  • देवघराच्या भिंतीचा रंग कधीही गडद नसावा. पांढरा, हलका पिवळा किंवा निळा असावा. 
  • देवघरातील लाद्यासुद्धा पांढऱ्या किंवा हलक्या पिवळ्या रंगांच्या असाव्यात. 
  • देवघरात ब्रह्मा, विष्णू, शिव, इंन्द्र, सूर्य आणि कार्तिकेय यांंचं मुख पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावं. 
  • देवघरात गणपती, कुबेर, दुर्गा यांचं मुख दक्षिण दिशेकडे असावं. 
  • देवघरातील हनुमानाच्या मूर्तीचं मुख हे नैऋत्य कोनात असावं. 
  • देवघरातील प्रतिमा कधीही घराच्या मुख्य प्रवेश द्वारासमोर नसाव्यात. 
  • देवघरांमध्ये प्राचीन मंदिरातून आणलेल्या फोटो किंवा स्‍थिर फोटो लावू नयेत. शक्यतो देवघरात देवांच्या धातूंच्या मूर्ती असाव्यात
  • घरात रोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा करणे आवश्यक आहे. या दोन्हीवेळी घंटानाद करावा. असे केल्याने घरातील नकारात्मकता नाहीशी होते
  • पूजा करताना शिळे, सुकलेले अथवा खराब फूल अथवा पान देवाला अर्पण करू नये. स्वच्छ आणि ताज्या पाण्याचाच उपयोग करावा. जे फूल अर्पण करायचे आहे त्याचा कधीही वास घेऊ नये. 

वास्तुशास्त्रानुसार मंदिराची योग्य दिशा (Ideal Mandir Directions As Per Vastu)

वास्तुशास्त्रानुसार मंदिराची योग्य दिशा - Ideal mandir directions as per Vastu

Instagram

ADVERTISEMENT

वास्तुशास्त्रानुसार मंदिराची योग्य दिशा ठरविण्यात आलेली नाही. देवघर बनविण्यासाठी योग्य जागा म्हणजे हॉल अथवा स्वयंपाकघर. अनेक जणांच्या घरात स्वयंपाकघरातच देवघर असते. स्वयंपाकघरातील ईशान्य दिशेचा कोपरा अर्थात उत्तर – पूर्व दिशेच्या ठिकाणी तुम्ही देवघर बनवा. या दिशेला पूजा केल्याने देवी – देवता अधिक लवकर प्रसन्न होतात असं वास्तुशास्त्रात सांगण्यात येते. ईशान्य कोपऱ्यातून ईश्वरीय शक्ती प्रवेश करते असा समज आहे आणि नैऋत्य दिशेने अर्थात पश्चिम – दक्षिण दिशेने ही शक्ती बाहेर जाते. त्यामुळे या दिशेला कधीही देव्हारा असू नये. त्यामुळे सहसा ईशान्य दिशा अथवा पूर्व दिशेकडे तोंड करून देव्हारा ठेवण्याची पद्धत आहे. ही दिशा देव्हाऱ्यासाठी योग्य समजण्यात येते. ईशान्य दिशेला मंदिर असल्यास, घरात भरभराट होते असं वास्तुशास्त्रानुसार सांगण्यात येते. तसंच देवघर मध्यभागी असावे. म्हणजे घराच्या मधल्या जागेत. जेणेकरून घरामध्ये सुखसमृद्धी नांदते. कारण या मध्यस्थानाला ब्रम्हस्थान असे संबोधण्यात येते. 

वास्तुप्रमाणे मंदिर कसे बांधावे (How Should A Temple At Home Be Constructed As Per Vastu)

वास्तुप्रमाणे मंदिर कसे बांधावे - How should a temple at home be constructed as per Vastu

Instagram

ADVERTISEMENT

जेव्हा घरात देवघर अथवा मंदिर बांधायचे तुम्ही ठरवता तेव्हा एक महत्वाची गोष्ट तुम्ही पाळायला हवी. ती म्हणजे कधीही नुसत्या जमिनीवर देवघर अथवा मंदिर बांधू नका. त्याऐवजी एखादा प्लॅटफॉर्म तयार करून त्यावर मंदिर बांधा. मार्बल अथवा लाकडी प्लॅटफॉर्म तयार करून त्यावर बांधलेले मंदिर हे अधिक लाभदायक ठरते. काचेचे मंदिर बांधण्याची जोखीम अजिबात घेऊ नका. तसंच एकाच देवाच्या अनेक मूर्ती मंदिरामध्ये ठेऊ नका. बसलेले अथवा उभे असणारे असे एकच देव मंदिरात असू नये याचीही तुम्ही काळजी घ्या. मंदिर तयार करण्यापूर्वी तुम्ही त्यामध्ये नक्की कोणकोणते आणि कशा पद्धतीने देव ठेवणार आहात याचा एकदा आराखडा आखून घ्या. त्यानुसारच तुम्ही वास्तुशास्त्राप्रमाणे देवाची जागा निश्चित करा. कोणताही फोटो अथवा मूर्तीला तडा गेला असेल तर ती मूर्ती वा फ्रेम अजिबात मंदिरामध्ये ठेऊ नका. 

तसंच घरात मोठी पूजा असेल तेव्हा संपूर्ण कुटुंबीय व्यवस्थित बसून पूजा करू शकेल याची व्यवस्था मंदिर बांधताना नीट लक्षात घ्यावी. पूजा करताना सहसा बसून करावी असे म्हटले जाते. त्यामुळे मंदिर बांधताना खाली बसून नीट व्यवस्थित पूजा करता येईल की नाही याची व्यवस्थित बांधणी आखून घ्यावी. देवघर नियमित स्वच्छ करता येईल अशाच ठिकाणी देवघर बांधावे. अडगळीच्या जागेमध्ये बांधू नये. 

घरात देवघर बनवताना काय करावे आणि काय करू नये (Do’s And Don’ts For Decorating A Temple At Home)

घरात देवघर बनवताना काय करावे आणि काय करू नये या गोष्टीही तितक्यात महत्वाच्या आहेत. देवघर तयार झाल्यानंतर ते आपण अगदी व्यवस्थित सजवतो. त्यासाठी आधी काय करावे जाणून घेऊया 

काय करावे

  • पूजा नेहमी सकाळी लवकर करावी 
  • देवाला ताजी फुले नेहमी अर्पण करावीत 
  • गंध, धूप, अगरबत्ती, तूप या साहित्याचा विचार करूनच देवघराचे कप्पे बनवावे 
  • देवघराच्या सजावटीचे सामानही तिथेच राहील याचाही नीट विचार करावा 
  • देवघरात प्रकाश व्यवस्था आणि हवा खेळती राहील याचाही तुम्ही नीट विचार करून मगच देवघर बांधावे 
  • देव्हाऱ्यातील सर्व मूर्तीची तोंडे ही पश्चिम दिशेला असावीत
  • शंख असल्यास, त्याचे निमुळते टोक हे दक्षिणेकडे असावे 
  • टाक असल्यास, पंचधातूचा असावा 

काय करू नये

  • शंकराची मूर्ती अथवा लिंगाची पूजा करू नये 
  • शनिची पूजा करू नये 
  • मारूतीचा फोटो कधीही देवघरात ठेऊ नये 
  • देवघरात गायत्री देवीची पूजा करणे वर्ज्य आहे 
  • गुरू आणि शिष्यांनी एकाच वेळी देवघरात पूजा करू नये 
  • यंत्रे असल्यास ती कधीही उभी मांडू नयेत, नेहमी जमिनीशी समांतर मांडावीत 
  • एकाच देवाच्या दोन – तीन मूर्ती वा फोटो ठेऊ नयेत 

ADVERTISEMENT

देवघर तयार करताना लक्षात ठेवायच्या महत्वाच्या गोष्टी (Points To Remember When Installing A Temple At Home)

देवघर तयार करताना लक्षात ठेवायच्या महत्वाच्या गोष्टी

Instagram

जर तुमच्या घरात देवघराची वेगळी खोली असेल तर वास्तुशास्त्रानुसार बांधण्यात आल्यास संपूर्ण कुटुंबाला त्याचा चांगला परिणाम प्राप्त होतो. काही वास्तू सिद्धांतानुसार तुम्ही तुमचे देवघर अधिक प्रभावशाली बनवू शकता. जर हे झाल्यास ते अधिक शुभ फळ देतं आणि जीवनातील अनेक दोष समाप्त होतात. बहुतेकदा लोकं घर बनवतात किंवा इंटीरिअर करून घेताना देवघराबाबत वास्तू नियमांची उपेक्षा करतात. पण काही छोट्या छोट्या उपायांनी तुम्ही ते वास्तुनुसार करू शकता आणि आपल्या जीवनात खुशाली आणू शकता. लाकडी देवघर डिझाईन असेल तर तुम्हाला ते दिसायलाही सुंदर दिसते. देवघरात येताच आपल्यामध्ये सकारात्मक उर्जेचा संचार होतो आणि नकारात्मकता संपते. देवघरात किंवा देवघरासमोर बसल्यावर आपल्याला ईश्वराशी नतमस्तक होता येतं आणि त्या दैवीशक्तीप्रती आपल्या मनातील आस्था व्यक्त करता येते. म्हणूनच देवघरसुद्धा वास्तुशास्त्रानुसार (vastu shastra tips for devghar in marathi) असल्यास ते जास्त योग्य ठरतं. कारण त्याचा सकारात्मक परिणाम आपल्यावर आणि आपल्या घरात जाणवेल. घरातील देवघर फोटो ठेऊनही सजवता येते. लाकडी देवघर डिझाईन असेल तर घरातील देवघर फोटोमध्ये नक्कीच तुम्हाला सजवता येऊ शकते. 

पूजाघरातील वास्तूदोष काढण्याकरिता सोपे उपाय (Simple Remedies For Vastu Dosh In Your Puja Room)

तुम्हाला तुमचे पूजाघर अर्थात देवघर आहे त्या जागेवरून हलवायचे नसेल आणि वास्तूदोषही नको असेल तर काही सोपे उपाय आम्ही तुम्हाला सांगतो. तुम्ही याचा नक्की वापर करा 

ADVERTISEMENT
  • मूर्ती एकमेकांच्या समोर तोंड करून असतील तर त्यात बदल करा. मूर्तींची तोंडे कधीही एकमेकांसमोर असू नयेत 
  • मूर्ती देवघरात एखाद्या उंचीवर ठेवाव्यात 
  • भिंतीपासून किमान एक इंच लांब मूर्ती असाव्यात. भिंतीला चिकटून कधीही मूर्ती ठेऊ नयेत 
  • देवघरातील प्रकाश आणि दिवे, समई या नेहमी दक्षिण – पूर्व दिशेला असावेत 
  • तडा गेलेली अथवा तुटलेली फ्रेम वा मूर्ती कधीही देवघरात ठेऊ नका 
  • पूजाघरामध्ये नेहमी प्रसन्न वातावरण राहील याची काळजी घ्या 

प्रश्नोत्तरे (FAQ’s)

1. वास्तुप्रमाणे पूजाघरासाठी योग्य रंग कोणता?

वास्तुशास्त्राप्रमाणे मनाला आल्हाददायक ठरणारे रंग हे पूजाघरासाठी योग्य आहेत. पांढरा, लाईट निळा, पिवळा, लाईट चॉकलेटी असे रंग देवघराला शोभून दिसतात. शक्यतो गडद रंग पूजाघराला देणे टाळा. तसंच फ्लोअरिंग करणार असाल तर पांढऱ्या अथवा एखाद्या लाईट रंगाच्या मार्बलचा वापर करा.

2. देवघरात देवाचे तोंड कोणत्या दिशेला असावे?

देवघरात देवाचे तोंड अर्थात मूर्ती असो वा फ्रेम असो नेहमी पश्चिम दिशेला असावे. जेणेकरून पूजा करणारी व्यक्ती पूजा करायला बसल्यानंतर त्यांचे तोंड पूर्व दिशेले साहजिक असेल. त्यामुळे घरात समृद्धी आणि भरभराट येते असं सांगण्यात येते.

3. देवघरात कोणत्या देवाच्या मूर्ती ठेवाव्यात?

देवघरात गणपती बाप्पा, कृष्ण, अन्नपूर्णा देवी, लक्ष्मी देवी, सरस्वती देवी, स्वामी समर्थ, तिरूपती बालाजी अशा अनेक मूर्ती वा फोटो आपण ठेऊ शकतो. काही देव देवघरात ठेवणे वर्ज्य आहे. मारूती, शिवलिंग, शनि हे देव देवघरात ठेऊ नयेत.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

19 Aug 2019
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT