14 फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन्स डे. हे आतापर्यंत सगळ्यांनाच माहीत आहे. पण हा दिवसच नाही तर त्याची तयारी अगदी आठवड्याभरापासून सुरु असते. याला प्रेमाचा आठवडा किंवा ‘व्हॅलेंटाईन वीक’ म्हणतात. प्रेम व्यक्त करण्यासाठी हा एकदम रोमँटीक काळ आहे असे म्हणतात. म्हणूनच ज्यांना आपल्या प्रेम भावना व्यक्त करायच्या आहेत ते खास या दिवसाचा मुहूर्त साधत आपले प्रेम व्यक्त करतात. हा दिवस ख्रिश्चन परपंरेतील असून संत व्हॅलेंटाईनच्या आठवणीत हा दिवस साजरा केला जातो. काळ बदलला तसे प्रेम व्यक्त करण्याच्या अनेकांच्या पद्धती बदलल्या आहेत. प्रेम व्यक्त करण्यासारखे सोपे काम आता फारच कठीण झालेले आहे. कारण सेलिब्रेशन करण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. व्हॅलेंटाईन डे हा आता एक दिवस म्हणून साजरा केला जात नाही तर आता तो आठवडाभर साजरा करण्याचा सण झाला आहे. त्यामुळेच हल्ली व्हॅलेंटाईन वीक अगदी उत्साहात साजरा केला जातो. यंदा तुम्हीही हा आठवडा तुमच्या प्रेमासाठी साजरा करण्याचा विचार करत असाल तर या ‘व्हॅलेंटाईन वीक’ची माहिती तुम्हाला हवी.
व्हॅलेंटाईन वीक म्हणजे काय? (What is Valentine Week)
व्हॅलेंटाईन वीक म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या आधी आठवडाभर वेगवेगळे दिवस साजरे करणे. साधारण 7 फेब्रुवारीपासून वेगवेगळे दिवस साजरे करण्याची सध्या सगळीकडेच पद्धत आहे. या आठवड्याची सुरुवात रोझ डे अर्थात गुलाबाच्या फुलाने करायची असते असे म्हणतात. तुम्ही या आठवड्याच्या प्रत्येक दिवशी काहीना काही करायला हवे. तुमच्या प्रेमाला स्पेशल वाटायला हवे. यासाठी रोझ डे, प्रपोझ डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे असे काही दिवस साजरे केले जातात. हे दिवस साजरे करण्याची प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी आहे. यंदा तुम्हीही हा व्हॅलेंटाईन आठवडा साजरा करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही प्रत्येक दिवसाचे महत्व आणि तुम्हाला या दिवशी नेमके काय करता येईल ते जाणून घेऊ
असा साजरा करा तुमचा व्हॅलेंटाईन वीक (Valentine’s Week & Ideas To Celebrate It)
वर सांगिल्याप्रमाणे व्हॅलेंटाईनचा आठवडा साजरा करण्याची इच्छा असेल तर तुम्ही वेगवेगळ्या दिवशी मस्त प्लॅन करु शकता. फक्त मुलींना सरप्राईज देण्यासाठीच नाही तर कधी कधी तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडलाही अशा प्रकारे सरप्राईज देऊ शकता. आता या व्हॅलेंटाईन वीकमध्ये येणारा प्रत्येक दिवस आणि तो साजरा करण्याची आयडिया जाणून घेऊया.
रोझ डे (Rose Day)
व्हॅलेंटाईन वीकमधील तुमचा पहिला दिवस असतो तो म्हणजे ‘रोझ डे’. प्रेमाचे प्रतिक म्हणून लाल गुलाबाचे फुल देण्याची आजही पद्धत आहे. दरवर्षी हा दिवस 7 फेब्रुवारीला साजरा केला जातो. पूर्वी कोणाच्या हाती गुलाबाचे लाल फुल असेल तर ते कोणीतरी खास व्यक्तीने दिले यावर शिक्कामोर्तब व्हायचे. आता लाल गुलाबाचे फुल आणि व्हॅलेंटाईन असे एक समीकरणच बनून गेले आह. मनातील भावना सांगण्याआधी त्याची सुरुवात करण्यासाठी गुलाबाचे फुल देऊन तुम्ही थोडासा अंदाज तुमच्या जोडीदाराला नक्की देऊ शकता. त्यासाठीच हा खास दिवस असतो. व्हेलेंटाईन वीक साजरा करताना प्रपोझ करायचा विचार असेल तर प्रपोझ शुभेच्छा संदेश पाठवून तुम्ही मनातील भावना व्यक्त करायला हव्यात
असे करा प्लॅनिंग :
- या दिवशी तुमच्या जोडीदाराला तुम्हाला गुलाबाचे फुल द्यायचे असेल पण त्यामधील सस्पेन्स कायम ठेवायचा असेल तर त्यांच्या घरी थेट गुलाबाचा गुलदस्ता पाठवून द्या. त्यावर कोणतेही नाव टाकू नका. नव्याने प्रेमाला सुरुवात करणाऱ्यांसाठी याहून रोमँटीक काय असेल.
- जर तुम्ही आधीच तुमच्या जोडीदारासोबत असाल तर त्यांना प्रत्यक्ष गुलाबाचे फुल द्या किंवा एखाद्या पुस्तकातूनही अशा प्रकारे गुलाबाचे फुल देण्यास हरकत नाही.
- तुम्हाला हा क्षण अधिक रोमँटीक आणि उत्कंठावर्धक करायचा असेल तर तुम्ही वेगवेगळ्या रंगाचे गुलाबाचे फुल देऊनही तुमचे प्रेम व्यक्त करु शकता. आधी पांढऱ्या गुलाबापासून सुरु करा.त्यावर काय प्रतिक्रिया येते ते पाहा आणि मग पिवळा अर्थात मैत्री आणि लाल अर्थात प्रेमाच्या गुलाबाकडे वळा.
प्रपोझ डे (Propose Day)
व्हॅलेंटाईन वीकमधील दुसरा दिवस म्हणजे ‘प्रपोझ डे’ प्रेमाच्या भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे प्रपोझ डे. हा दिवस 8 फेब्रुवारी रोजी येतो. पहिल्या दिवशी गुलाबाचे फुल देऊन जरी तुम्ही तुमचे प्रेम व्यक्त केले असले तरी त्याला शब्दबद्ध करणे किंवा तो खास करण्यासाठी प्रपोझ महत्वाचा असतो. अनेकदा काही गोष्टी या आपोआप घडत असतात. कोणी प्रेमात पडले हे एकमेंकाना सांगण्याची फारशी गरज अनेकांना वाटत नाही. पण जर तुमच्या प्रेमाच्या भावनेला शब्दाची जोड मिळाली तर तो दिवस अधिक खास होऊन जातो. त्यामुळे या दिवशी तुम्ही प्रपोझ करा.प्रपोझ करण्यासाठी हा दिवस एकदम उत्तम आहे असं समजून आपल्या भावना व्यक्त करा. जर एखादी मुलगी तुमच्यावर प्रेम करत असेल तर मुलीही प्रेमाचे काही संकेत देतात.
असे करा प्लॅनिंग :
- जर तुम्ही पहिल्यांदा तुमच्या भावना शेअर करणार असाल तर तुम्ही मस्तपैकी एक छानसे ग्रिटींग घ्या. त्यावर तुमच्या भावना लिहा आणि ते कार्ड तुमच्या प्रेयसीला किंवा प्रियकराला पाठवा.
- हल्ली मेसेज हे उत्तम माध्यम आहे. ज्यातून तुम्ही तुमचा संदेश पाठवू शकता. पण जर तुम्ही दूर असाल तर अशापद्धतीने मेसेज पाठवला तर चालू शकेल. त्याला थोडे जास्त इंट्रेस्टिंग करण्यासाठी तुम्ही एक एक मेसेज वेगवेगळ्या पद्धतीने पाठवू शकता.
- जर तुम्हाला थोडे आणखी कष्ट घ्यायचे असतील तर एखाद्या ट्रेजर हंटप्रमाणे तुम्ही तुमचा हा मेसेज खजिन्याप्रमाणे लपवून तुम्ही शोधायला लावू शकता.
चाॉकलेट डे (Chocolate Day)
कोणत्याही नात्याची सुरुवात ही गोड खाऊन करायची असते. ज्यावेळी एखादे रिलेशनशीप किंवा प्रेमाचे नाते येते त्यावेळी चॉकलेट देऊन हा आनंद साजरा केला जातो. तुमच्या जोडीदाराला चॉकलेट देऊन तुम्ही हा दिवस साजरा करायला हवा. तुम्ही किती मोठं चॉकलेट देता यापेक्षा चॉकलेट देणं आणि आपली भावना महत्वाची त्यामुळे जर तुम्ही हा दिवस साजरा करायचा विचार करत असाल तर तुम्ही काही सोपे प्लॅन्स करु शकता. हा दिवस 9 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.
असे करा प्लॅनिंग :
- तुमच्या जोडीदाराला किंवा प्रियकराला चॉकलेट खूप जास्त आवडत असेल तर चॉकलेटचा मस्त बुके तयार करा आणि हा बुके तुम्ही गिफ्ट म्हणून द्या.
- जर तुम्हाला स्वत:हून काही करायला आवडत असेल तर तुम्ही घरीही चॉकलेट किंवा चॉकलेटपासून तयार केलेले पदार्थ बनवू शकता. कारण हाताहून काही बनवून देणे ही त्या दिवसासाठी स्पेशल काही गिफ्ट देऊ शकता.
- चॉकलेट डेवर तुम्ही तुमच्या प्रियकराला किंवा प्रेयसीला चॉकलेट डेटवर घेऊन जाऊ शकता. फक्त डिझर्टवाली डेट करु शकता. कॉफी आणि मस्त चॉकलेट केक हे देखील एक उत्तम कॉम्बिनेशन आहे.
टेडी डे (Teddy Day)
चॉकलेट डे नंतर जो दिवस साजरा केला जातो तो म्हणजे टेडी डे. गुलाबी प्रेमामध्ये येणारी आणखी एक गोष्ट म्हणजे टेडी. टेडी हे एक सॉफ्ट टॉय असून त्याच्याप्रमाणेच प्रेमाच्या भावना या कोमल आणि नाजूक असतात. हा दिवस 10 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. अशा प्रेमाच्या भावना व्यक्त करण्याचे प्रतीक म्हणजे टेडी. टेडी हे वेगवेगळ्या आकारात मिळतात. अगदी छोटासा टेडी घेऊनही तुम्हाला असे प्रेम व्यक्त करता येईल. जर तुम्हाला बॉयफ्रेंडला काय द्यावे सुचत नसेल तर बॉयफ्रेंडला गिफ्ट देण्याच्या आयडियाज माहीत हव्यात
असे करा प्लॅनिंग :
- टेडी डे साजरा करण्याच्या अनेक वेगळ्या पद्धती आहेत. तुम्ही प्रत्यक्ष छोटासा टेडीबेअर देऊन साजरा करु शकता.
जर तुम्हाला अशा गोष्टी करायच्या नसतील तर तुम्ही काही वेगळ्या पद्धतीनेही सरप्राईज करु शकता. - एखाद्या केक कंटिगचा कार्यक्रम करण्यासही तुम्हाला काहीच हरकत नाही. कारण त्यामुळेही हा दिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करता येतो.
प्रॉमिस डे (Promise Day)
प्रेम व्यक्त करण्यासोबतच त्या नात्यामध्ये विश्वास निर्माण करणे महत्वाचे असते. त्यानंतरच हे नाते पुढे जाऊ शकते. जर तुम्ही नात्यात पुढचे पाऊल टाकण्याचा विचार करत असाल तर त्या नात्याची सुरुवात विश्वास देऊन करा. नात्यात राहताना तुम्ही एकमेकांना मान देऊन कधीच साथ सोडणार नाही हा विश्वास देणे महत्वाचे असते. हा प्रॉमिस डे हाच विश्वास निर्माण करण्याचा दिवस आहे. दरवर्षीचा 11 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.
असे करा प्लॅनिंग:
- प्रेम करणे आणि ते नाते टिकवणे या दोन गोष्टी वेगळ्या आहेत.तुमचे नाते तुम्हाला अधिक दृढ करायचे असेल तर तुम्ही तो दिवस खास करा. प्रेमाचे पुढचे पाऊल हे आयुष्य भराची साथ देणे असते. जर तुम्ही अशी साथ जोडीदाराला देणार असाल तर त्या दिवशी प्रपोझ करा.
- प्रॉमिस डे तुम्हाला थोडा वेगळ्या पद्धतीने करायचा असेल आणि लग्नासाठी तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही प्रेमातील वेगळा विश्वास आणि वेगळ्या पायऱ्यांचे प्रॉमिस द्या
हग डे (Hug Day)
प्रेम करणाऱ्यांच्या मिठीत विसावण्याचे सुख काही वेगळेच असते. एक प्रेमाची मिठी प्रत्येकाला जगण्याची एक वेगळी उमेद देते. हग डे अर्थात मिठीचा दिवस तुमच्या नात्यामधील ही जवळीक वाढवण्यासाठी मदत करु शकतो. हग डे हा अत्यंत रोमँटीक असा दिवस आहे. जो 12 फेब्रुवारीला सेलिब्रेट करतात. हा दिवस दोघांनी एकमेकांसोबत घालवायला पाहिजे. या दिवसाचे प्लॅनिंग करण्याचा विचार करत असाल तर थोडा खास करा. कारण या दिवसामुळे तुमचे प्रेम जास्त वाढू शकते.
असे करा प्लॅनिंग :
- शक्य असेल तर तुमच्या जोडीदाराला घेऊन तुम्ही छान रोमँटीक जागी जा. त्याच्यासोबत मस्त आपला दिवस घालवा. तुमचा दिवस छान रोमँटीक जाईल.
- ऑफिस आणि इतर कामांच्या वेळी बाहेर जाणे शक्य नसेल तर तुम्ही त्या दिवशी वेळ काढून एक भेट तर करायलाच हवी. तुमच्या प्रेमाची एक मिठी देखील जोडीदारासाठी सुखावणारी असते. त्यामुळे या दिवशी एकमेकांसाठी थोडासा वेळ काढा.
- अंतर जास्त असेल आणि भेटणे शक्य नसेल तरी देखील तुम्हाला हा दिवस साजरा करता येऊ शकतो. तुम्ही थोडा वेळ देऊन जर जोडीदारासोबत संवाद साधला तरी देखील त्यांच्यासाठी हा दिवस खास होऊ शकतो.
किस डे (Kiss Day)
एका मिठीच्या पुढे जाऊन ज्यावेळी नाते अधिक दृढ आहे असा विश्वास निर्माण होतो. त्यावेळी एकमेकांचे चुंबन घेण्याची इच्छा होते. तुमचे प्रेम सगळ्या अडचणी आणि पायऱ्या पार पाडत पुढे गेले असेल आणि आता तुम्हाला थोडे आणखी पुढे जायचे असेल. आयुष्यातील पहिली किस करण्यासाठी तुम्ही तयार असाल तर हा दिवस तुम्ही साजरा करायलाच हवा. व्हॅलेंटाईन डेच्या आदल्या दिवशी म्हणजेच 13 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.
असे करा प्लॅनिंग :
- किस डे चा शब्दश: अर्थ घेऊन तुम्ही काही प्लॅनिंग करणार असाल तर या दिवशी तुम्ही तुमचे प्रेम चुंबनातून व्यक्त करा. एखादी रोमँटीक डेट आखा.
- जर तुम्हाला प्रत्यक्ष असं काही करायचं नसेल तर ओठांशी संबंधित चांगले प्रॉडक्ट जोडीदाराला देऊन तुमचा हेतू सांगा. त्यामुळे तुमच्यामध्ये रोमान्स नक्कीच वाढेल.
व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day)
व्हॅलेंटाईन अर्थात हाच तो दिवस जो असतो सगळ्यात महत्वाचा. 14 फेब्रुवारी अर्थात व्हॅलेंटाईन डे या दिवासाची उत्सुकता अनेकांना असते. जर आठवड्याभरात काहीही वेगळे प्लॅन करता आले नसतील तर तुम्ही या दिवशी मस्त प्लॅन करु शकता.या दिवशी बाहेर छान वातावरणही असते. तुम्हाला अनेक गोष्टी करता येऊ शकतात. प्रेमाचा दिवस अशी या दिवसाची ओळख आहे. पण हल्ली आठवडाभर हा फेस्टिवल सारखा सेलिब्रेट करावा लागत असल्यामुळे या व्हॅलेंटाईन वीकची सांगता या दिवसाने होते. या दिवशी तुम्ही काहीतरी मोठे करण्याचा विचार करत असाल तर जोडीदाराला प्रेमाचे संदेश नक्की पाठवत आपले प्रेम पाठवून द्या
असे करा प्लॅनिंग:
- सगळ्या दिवसाचे प्रेम तुम्हाला एकाच दिवशी व्यक्त करायचे असेल तरी देखील हा दिवस उत्तम आहे. वरील सगळ्या दिवसाचे छोटे छोटे गिफ्ट घेऊन तुम्ही एकमेकांना द्या.
- या दिवशी एखादी छान रोमँटीक डेट प्लॅन करा. त्यासाठी एखादे छान ठिकाणं निवडा. धकाधकीच्या जीवनापासून थोडे लांब जात जर तुम्हाला थोडं वेगळ्या पद्धतीने प्लॅनिंग करायचे असेल तरी देखील तुम्ही कॅम्पेन किंवा असा प्रकार करु शकता.
- कुटुंबासोबतही हा दिवस साजरा करता येऊ शकतो. त्यामुळे एखादे छान रेस्टॉरंट निवडून छान जेवणाचा आणि गप्पांचा आनंद लुटू शकता.
तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ)
व्हॅलेंटाईन वीक वगळता त्यानंतर ही काही काळ हा दिवस साजरा केला जातो असे म्हणतात. म्हणजे प्रेमाची कबुली दिल्यानंतर हे नाते टिकतेच असे नाही. त्यामुळे त्याच्या पुढे जाऊन स्लॅप डे, ब्रेकअप डे असे काही दिवस असतात असे म्हणतात. पण हा सगळा सोशल मीडियावरील खेळ आहे. प्रत्यक्षात असे काही दिवस साजरे केले जात नाहीत. हा आठवडा साजरा करणे अनेकांना आवडत नाही. म्हणूनच या आठवड्यानंतरही उपहासाने काय काय साजरे करायला हवे त्याचे काही दिवस तयार केलेले दिसतात. पण यात काही तथ्य नाही.
गुलाबाचे फुल हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळेच प्रेम व्यक्त करण्यासाठी या फुलांचा उपयोग होतो. गुलाबामध्येही वेगवेगळे रंग असतात. पांढरा रंग हा शांततेसाठी, पिवळा रंग हा मैत्रीसाठी आणि लाल रंग हा प्रेमासाठी दिला जातो. गुलाबाव्यतिरिक्त असे कोणतेही फुल नाही जे प्रेम व्यक्त करण्याचा तो फिल आणू शकेल. म्हणूनच कदाचित गुलाब देणेच योग्य राहील.
व्हॅलेंटाईन डे हा साजरा करण्यासाठी संपूर्ण आठवडा साजरा करण्याची मुळीच गरज नाही. 14 फेब्रुवारीला देखील तुम्ही तो साजरा करु शकता. सात दिवस साजरा करण्याची ही पद्धत जास्त करुन तरुणांमध्ये दिसून येते. त्यामुळे तुम्ही तुम्हाला अगदी हवा त्या पद्धतीने हा दिवस किंवा जमेल तसा आठवडा साजरा करु शकता. यामध्ये कोणत्याही प्रकारे जबरदस्ती नाही.
यंदाचा प्रेमाचा आठवडा अर्थात तुमचा व्हॅलेंटाईन करा एकदम खास. बनवा छान छान प्लॅन. मुंबईत राहूनही तुम्ही तुमचा व्हॅलेंटाईन डे साजरा करु शकता. मुंबईत व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी चांगल्या जागा आहेत. त्यामुळे मुंबईत व्हॅलेंटाईन डे साजरा करा. टॅग करा तुमच्या अशा मित्रमैत्रिणींना ज्यांना खरंच आहे हा दिवस साजरा करण्याची गरज.