लग्न हे एक प्रत्येकाच्याच आयुष्यातील एक खास बंधन असते. असे म्हणतात ‘शादी के लड्डू जो खाए वह पछताए जो न खाए वह भी पछताए’. म्हणजेच लग्न करून सुद्धा अनेक लोक पस्तावतात कारण त्यांना ते नाते नीट सांभाळता येत नाही किंवा त्यांचा जोडीदार ते नाते नीट सांभाळू शकत नाही. आपल्या सर्वांनाच माहित आहे की हे नाते चांगले असले तर खूप घट्ट आणि अतूट असते पण तितकेच ते नाजूक देखील असते त्यामुळे ते हाताळणे खूप कठीण आहे. तुमची एक छोटीशी चूक तुमच्या नात्यातील आनंद नष्ट करू शकते. त्यामुळे प्रत्येकाने हे नाते जपले पाहिजे.
अर्थात जर काही समस्या असतील नेहेमीच पती किंवा पत्नीचीच चूक असते असे नाही. काही वेळेला आजूबाजूची माणसे किंवा परिस्थिती वाईट असते. तर कधी वैवाहिक जीवन चांगले नसेल आणि त्रास असतील किंवा पती-पत्नीमध्ये नेहमी भांडणे होत असतील तर त्यामागे वास्तुदोष हे एक कारण असू शकते. तुमच्या बेडरूममध्ये जर वास्तुदोष असेल तर त्याचा वैवाहिक जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. म्हणूनच या वास्तु टिप्स वाचा आणि तुमचा विश्वास असल्यास त्यांचे शक्य तितके पालन करा जेणे करून तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेम, आनंद आणि घरात सुख समृद्धी टिकून राहील.
सुखी वैवाहिक जीवनासाठी वास्तू टिप्स
- घराच्या ईशान्य कोपऱ्यात निळ्या किंवा जांभळ्या रंगछटांचा वापर करावा. यामुळे जोडीदारांची एकमेकांशी विचारांची देवाणघेवाण अधिक चांगल्या रीतीने होण्यास मदत होते असे मानले जाते.
- आग्नेय दिशेला अग्नी तत्व असते. त्यामुळे या दिशेला स्वयंपाकघर असावे. यामुळे महिलांना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या स्थिर राहण्यास मदत होते. तसेच सकारात्मक परिणाम मिळवण्यासाठी घरात या दिशेला केशरी रंग वापरा.
- मास्टर बेडरूम नैऋत्य दिशेला असावी. यामुळे माणसाची मानसिक स्थिती स्थिर राहण्यास मदत होते. तसेच बेडरूममधील पलंग घराच्या नैऋत्य किंवा वायव्य दिशेला ठेवावा. असे म्हटले जाते की यामुळे जोडप्यामध्ये प्रेम आणि कम्पॅटिबिलिटी वाढण्यास मदत होते. घरात जोडप्याची बेडरूम पश्चिम, दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला असावी. ही अशी दिशा आहे जिथे प्रेम प्रबल होते, ज्यामुळे नाते मजबूत होण्यास मदत होते.
- वास्तूशास्त्राप्रमाणे लाकूड उबदार उर्जा उत्सर्जित करते तर धातूचे बेड थंड ऊर्जा उत्सर्जित करतात. तुमच्या शयनकक्षात उबदार आणि आरामदायी राहण्यासाठी नेहमी लाकडी पलंग निवडा. म्हणूनच धातूचा पलंग वापरू नये कारण तो झोपेमध्ये अडथळा आणतो आणि जोडप्यामध्ये तणाव निर्माण करतो.तसेच जोडप्याने कधीही दोन बेड किंवा गाद्या एकत्र जोडून झोपू नये. एकच अखंड सिंगल किंवा क्वीन साइजच्या बेडची निवड करा. अशी वास्तुशास्त्रानुसार बेडरूम डिझाईन करा.
- नवविवाहित जोडप्यांनी ईशान्य दिशेला असलेल्या खोलीत झोपू नये. कारण या दिशेला असलेली मजबूत चुंबकीय ऊर्जा अडथळा म्हणून काम करते. जर तुम्ही बाळासाठी प्रयत्न करत असाल तर तुम्ही या दिशेने झोपणे देखील टाळले पाहिजे.
- बेडरूमच्या भिंतीचे रंग हलके आणि सुखदायक असावेत. खोलीच्या नैऋत्य कोपऱ्यासाठी गुलाबी किंवा पीच रंगाची निवड करा. तसेच खोलीच्या ईशान्य कोपऱ्यात अनावश्यक वस्तूंचा पसारा नसावा.
- बिछान्याच्या थेट समोर कधीही आरसा लावू नये. आरसा जितका मोठा असेल तितकी वैवाहिक नात्यात ताणतणाव येण्याची शक्यता जास्त असते.
- आजकाल आपण भरपूर फोटो काढतो. त्यापैकी काही सुंदर आणि स्पेशल आठवणी असलेले फोटो निवडा आणि ते घराच्या पूर्वेकडील भिंतीवर लावा. यामुळे जोडप्याचे एकमेकांवरील प्रेम वृद्धिंगत होण्यास मदत होते. वास्तुशास्त्रानुसार घराची पूर्वेकडील भिंत सकारात्मक वातावरण पसरवण्यासाठी ओळखली जाते, त्यामुळे तुमचे सुंदर आठवणी टिपलेले फोटो घरात सकारात्मक ऊर्जा आणतील.
या टिप्स विवाहित जोडप्यामधील नाते चांगले ठेवण्यास मदत करतील.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक