ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
vastu-tips-for-kitchen-colours-in-marathi

वास्तुशास्त्रानुसार द्या तुमच्या स्वयंपाकघराला रंग, येईल सुखसमृद्धी

वास्तुशास्त्र हे असे एक प्राचीन शास्त्र आहे जे घरातील गोष्टी योग्य दिशा आणि योग्य पद्धतीने ठेवण्यासाठी वापरण्यात येते. विशेषतः स्वयंपाकघरातील वस्तूंसाठी याचे वेगळेच महत्त्व आहे. स्वयंपाकघरातील ठेवलेल्या वस्तू आणि दिशा, अगदी भिंतींचा रंगदेखील वास्तुशास्त्रानुसार असणे म्हणजे घरातील सुखसमृद्धीसाठी चांगले मानण्यात येते. ज्याप्रकारे स्वयंपाकघरातील गॅस शेगडी ठेवण्याची दिशा योग्य असायला हवी त्याचप्रमाणे स्वयंपाकघराचा रंग निवडतानाही आपल्याला वास्तुशास्त्राच्या काही नियमांचे पालन करावे लागते. स्वयंपाकघरात असाच रंग निवडावा जेणेकरून घरातील व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील आणि घरातील सुखशांती समाधान व्यवस्थित राहू शकेल. स्वयंपाकघरासाठी नक्की कोणते रंग वास्तुशास्त्रानुसार योग्य आहेत ते जाणून घेऊया. 

नारिंगी रंग (Orange Colour)

नारिंगी रंग हा आशावाद प्रोत्साहित करण्यासाठी आणि नाते व शक्ती अधिक घट्ट करण्यासाठी योग्य मानला जातो. त्यामुळे तुम्ही स्वयंपाकघराचा रंग निवडताना स्वयंपाकघरातील कपाटांसाठी या रंगाचा वापर करू शकता. हा रंग स्वयंपाकघरात बनविण्यात येणाऱ्या जेवणामध्ये सकारात्मक ऊर्जा आणतो. तसंच नारिंगी रंग हा स्वयंपाकघरातील दक्षिण पूर्व दिशेसाठी एक आदर्श असा रंग मानण्यात येतो. 

पांढरा रंग (White Colour)

White Color for Kitchen

वास्तुनुसार पांढरा रंग हा पवित्रता आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. तसंच हे स्वच्छता आणि प्रकाश यासहदेखील जोडलेले आहे. स्वयंपाकघरातील सर्वात आदर्श असा रंग कोणता असेल तर तो म्हणजे पांढरा रंग. वास्तुशास्त्रानुसार, पांढरा रंग हा सकारात्मकतेची ऊर्जेचा प्रसार करतो आणि भिंती अथवा लादीसाठी हा एक चांगला आणि योग्य रंग आहे. तुमचे स्वयंपाकघर जर उत्तर – पश्चिम दिशेला असेल तर तुम्ही पांढऱ्या रंगाचा वापर करून घरातील सकारात्मक ऊर्जा अधिक वाढवू शकता आणि घरात सुख समाधान अधिक राहील. 

हिरवा रंग (Green Colour)

वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघराचा रंग निवडताना तुम्ही हिरव्या रंगाचाही वापर करू शकता. कारण हा रंग आशा आणि सद्भावनाचा रंग मानला जातो. तसंच हा रंग निसर्गाशी अधिक जोडलेला आहे, जो तुमच्या आरोग्यासाठी अधिक लाभदायक मानला जातो. स्वयंपाकघराच्या भिंतींचा रंग हिरवा तुम्ही देऊ शकता. कारण या रंगाला वास्तुशास्त्रासह फेंगशुईमध्येही मान्यता देण्यात आली आहे. हा रंग तुम्हाला आयुष्यात अधिक प्रोत्साहित करण्यास मदत करतो. 

ADVERTISEMENT

पिवळा रंग (Yellow Colour)

Yellow Color For Kitchen

पिवळा रंग हा नेहमीच ताजातवाना आणि रिफ्रेशिंग असा रंग मानण्यात येतो. वास्तुशास्त्राुसार, पिवळ्या रंगामध्ये ऊर्जा, ताजेपणा आणि आनंद भरभरून असतो. हा रंग स्वयंपाकघरात सकारात्मकता तर आणतोच याशिवाय घरात अधिक प्रकाश देण्याचे कामही करतो. या रंगामुळे घरात अधिक आनंदाचे वातावरण निर्माण होते आणि कायम आनंदी वातावरण राहाते. तसंच घराच्या भिंतींना पिवळा रंग दिल्यास, सूर्याचे किरण डायरेक्ट त्रासदायक ठरत नाहीत. 

गुलाबी रंग (Pink Colour)

Pink Color For Kitchen

गुलाबी रंग हा प्रेमाचे प्रतिनिधित्व करतो. घरातील व्यक्तींमध्ये सामंजस्य राखण्यासाठी आणि जेवणाचा स्वाद अधिक चांगला ठेवण्यासाठी स्वयंपाकघरातील भिंतींना गुलाबी रंग देणे चांगला पर्याय आहे. याशिवाय तुमचा आनंद आणि मूड चांगला राखण्यासाठीही या रंगाचा उपयोग होतो. याशिवाय आपल्या स्वयंपाकघराला गुलाबी रंग देणे हा नक्कीच एक चांगला विचार आहे. 

चॉकलेट ब्राऊन रंग (Chocolate Brown Colour)

वास्तविक स्वयंपाकघराचा रंग निवडताना चॉकलेटी हा एक अत्यंत कॉमन रंग आहे. पण वास्तुशास्त्रानुसार हा एक चांगला पर्याय आहे. वास्तुशास्त्रानुसार हा एक खूपच चांगला रंग मानण्यात येतो. खरं तर हा रंग स्वयंपाकघरासाठी अत्यंत उत्तम आहे. कारण हा रंग उष्णतेपासून वाचवतो आणि समाधान देतो. एक सकारात्मकता कायम स्वयंपाकघरातामध्ये राहाते. स्वयंपाकघरात ब्राऊन टोन दक्षिण – पश्चिम दिशेच्या दिशेला आणि भिंतींना अगदी योग्य आहे. घरात सुखसमाधान राखण्यास याची मदत मिळते. 

लादीचा पांढरा रंग 

वास्तुशास्त्रानुसार, कोणत्याही स्वयंपाकघरासाठी सिरेमिक टाईल्स, मोजेक अथवा संगमरवर हे चांगले पर्याय समजण्यात येतात. यामुळे जेव्हा वास्तुशास्त्रामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात येतो तेव्हा लादीसाठी पांढरा रंग, हलकासा चॉकलेटी अथवा अन्य लाईट रंगाचा वापर करायला हवा. तर किचन स्लॅबसाठी हिरव्या रंगाचा वापर करावा. वास्तुशास्त्रानुसार नैसर्गिक दगड अर्थात क्वार्ट्झ अथवा ग्रेनाईटचा वापर करण्याचा सल्ला देण्यात येतो. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही किचन काऊंटर टॉप दोन रंगांचा ठेऊ शकता. तसंच पिवळा, नारिंगी यासाठी हिरवा रंग हा चांगला पर्याय ठरतो. 

ADVERTISEMENT

स्वयंपाकघरात वापरू नका हे रंग 

आपल्या स्वयंपाकघरात सकारात्मक ऊर्जेचा संचार कायम राहणं गरजेचे आहे. त्यामुळे स्वयंपाकघरामध्ये काळा, करडा, निळा, लाल या रंगाचा वापर अधिक प्रमाणात करू नये. सहसा या रंगांचा वापर स्वयंपाकघरामध्ये टाळावा. 

तुम्ही वास्तुशास्त्रानुसार रंगाची निवड करणार असाल तर आम्ही सांगितलेल्या या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवा. हे सर्व योग्यच आहे असा आमचा दावा नाही. मात्र वास्तुशास्त्रातील काही टिप्सचा संदर्भ घेऊन आम्ही या गोष्टी तुम्हाला या लेखामार्फत सांगितल्या आहेत हे लक्षात ठेवावे. 

21 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT