गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी आज मुंबईच्या ब्रीच कँडी रूग्णालयात आज अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून लता मंगेशकर यांची तब्बेत खालावली होती. त्यांच्या तब्बेतीत काही सुधारणा झाल्याची घोषणा डॉक्टरांनी केली होती. मात्र तरीही अनेक वेळा लता मंगेशकर यांच्या तब्बेतसाठी प्रार्थना करण्यात यावी असेही त्यांच्या चाहत्यांना सांगण्यात येत होते. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जाण्यामुळे सगळ्यांच्या मनात कधी न भरणारी पोकळी निर्माण झाली आहे.
अधिक वाचा – जॉन अब्राहमचा ऍक्शन थ्रिलर चित्रपट अटॅक १ एप्रिलला प्रदर्शित होणार
1950 च्या दशकात झाला उत्कर्ष
पद्मविभूषण लता मंगेशकर यांनी अगदी लहानपणीच आपल्या अंगावर आलेल्या जबाबदारीमुळे गायला सुरूवात केली. वडिलांचे निधन झाल्यानंतर आपल्या खांद्यावर भावंडाची जबाबदारी झेलत लता मंगेशकर यांनी आपले आयुष्य वाहिले. लता मंगेशकर कायम अविवाहित राहिल्या आणि त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य हे गाण्याला वाहून घेतले असे सांगण्यात येते. ‘भारतरत्न’ पुरस्कार प्राप्त करणाऱ्या भारतातील एम एस सुब्बलक्ष्मी (भारतरत्न – 1998) नंतर दुसऱ्या महिला कलाकार आहेत. हा पुरस्कार त्यांना 2001 साली मिळाला.
लता मंगेशकर यांनी वयाच्या 13 व्या वर्षापासून आपल्या करिअरला सुरूवात केली. मास्टर विनायक यांनी लता मंगेशकरांना चित्रपटसृष्टीशी ओळख करून दिली. मास्टर विनायकांनी लताबाईंना नवयुगच्या पहिली मंगळागौर (इ.स. 1942) याा मराठी चित्रपटामध्ये एक छोटी भूमिका दिली. या चित्रपटात त्यांनी नटली चैत्राची नवलाई हे दादा चांदेकरांनी स्वरबद्ध केलेले गीत गायले. 1945 मध्ये जेव्हा मास्टर विनायकांच्या कंपनी-कार्यालयाचे स्थानांतर मुंबईस झाले, तेव्हा लताबाई मुंबईला आल्या. त्या उस्ताद अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) यांच्याकडून शास्त्रोक्त संगीत शिकू लागल्या.
अधिक वाचा – मौनी रॉयनंतर एकता कपूरची आणखी एक ‘नागिन’ अडकतेय लग्नाच्या बंधनात
1950 च्या दशकात झाला उत्कर्ष
1950 च्या दशकात लता दीदींनी अनिल विश्वास, शंकर-जयकिशन, नौशाद, सचिनदेव बर्मन, सी. रामचंद्र, हेमंत कुमार, सलिल चौधरी, खय्याम, रवी, सज्जाद हुसेन, रोशन, मदन मोहन, कल्याणजी आनंदजी, मास्टर कृष्णराव, वसंत देसाई, सुधीर फडके, हंसराज बहल आणि उषा खन्ना या संगीत दिग्दर्शकांनी स्वरबद्ध केलेली गाणी गायिली.
सुप्रसिद्ध संगीतकार जोडी शंकर-जयकिशन यांनी तर आपल्या जवळजवळ सर्व चित्रपटांच्या(विशेषतः राज कपूरनिर्मित) गाण्यांच्या गायिका म्हणून लता मंगेशकर यांचीच निवड केली. 1950 च्या दशकात लता मंगेशकर यांच्याबरोबर अतिशय लोकप्रिय गाणी बनवणाऱ्यांपैकी एक सलिल चौधरी होते. लतादीदीला “सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका” म्हणून सर्वप्रथम फिल्मफेअर पारितोषिक सलिल चौधरींनी स्वरबद्ध केलेल्या आजा रे परदेसी मधील गीतासाठी मिळाले. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
लता मंगेशकर यांचा आवाज इतका मधाळ आणि सुंदर का याचं उत्तर देताना एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की, प्रत्येक गायकाप्रमाणेच त्या रोज रियाज करायच्या. पण आपल्या मनाला जे वाटेल ते खायच्या. खाण्याच्या बाबतीत त्यांना कधीही स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही. 75 टक्के ही प्रतिभा आहे पण बाकी सर्व मेहनत आणि प्रशिक्षण असल्याचेही त्यांनी सांगितले होते.
अशा या प्रतिभावंत गानकोकिळेला मानाचा सलाम आणि भावपूर्ण श्रद्धांजली!
अधिक वाचा – पांघरूण’ च्या निमित्ताने रंगणार सांगितिक मैफल
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक