ADVERTISEMENT
home / मनोरंजन
विकी कौशलचा बदलला लुक, आगामी चित्रपटासाठी केले ट्रान्सफॉर्मेशन

विकी कौशलचा बदलला लुक, आगामी चित्रपटासाठी केले ट्रान्सफॉर्मेशन

बॉलीवूड अभिनेता विकी कौशल अभिनयासोबतच त्याच्या लुकसाठीही लोकप्रिय आहे. कैतरिना कैफसोबत असलेलं नातं यामुळे काही दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर विकीबाबत एक वेगळीच चर्चा सुरु आहे. विकीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये तो इंटेस वर्कआऊट करताना दिसत आहे. या फोटोमध्ये त्याचा संपूर्ण लुकच बदलेला दिसत आहे. विकीचे इन्स्टाग्राम अकाऊंट वर्क आऊट फोटो आणि रिल्सनी भरलेलं दिसत आहे. ज्याला चाहत्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. विकी कौशलने त्याच्या आगामी चित्रपटासाठी हे ट्रान्सफॉर्मेशन केल्याची चर्चा सुरू आहे.

विकीचा नवा अवतार

विकी कौशलने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्याचा हा नवा लुक शेअर केला आहे. ज्यामध्ये तो जीममध्ये  खूप घाम गाळत वर्क आऊट करताना दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावरील हावभावावरून तो या लुकसाठी प्रंचड मेहनत घेताना दिसून येत आहे. या फोटोसोबत विकीने शेअर केलं  आहे की Wip म्हणजेच ‘वर्क इन प्रोग्रेस’ विकीचा हा हेव्ही वेट लिफ्ट करताना फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत. ज्यामुळे विकीचा फोटो सध्या व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामुळे विकी एवढी मेहनत कोणत्या चित्रपटासाठी करत आहे आणि त्याचा नवा लुक कसा असेल याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. विकीच्या फोटोवर चाहत्यांनी दम लगा के हइशा, भाई डोले के बीच नीबू डाल के शिकंजी बना दो अशा भन्नाट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. 

विकी या चित्रपटासाठी करतोय एवढी मेहनत

विकीच्या इन्स्टाग्राम रील्सला मागील काही दिवसांपासून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. सहाजिकच विकी त्याच्या इंटेस वर्क आऊटमुळे सध्या सोशल मीडियावर खूप लोकप्रिय होताना दिसत आहे. काही दिवसांपासून त्याचा कोणताही नवा चित्रपट पाहिला मिळाला नसला तरी  विकी एवढी मेहनत नक्कीच त्याच्या एखाद्या आगामी चित्रपटासाठी घेतोय हे सिद्ध होत आहे. विकीचा आगामी चित्रपट ‘इम्मॉर्टल अश्वत्थामा’ लवकरच येत आहे.  ज्यामध्ये  तो मुख्य भूमिकेत असणार आहे. आदित्य धर या  चित्रपट दिग्दर्शित करत असून विकी त्यामध्ये सुपरहिरो असणार आहे. सुपरहिरोच्या भूमिकेसाठीच विकीने त्याच्या  लुकमध्ये एवढा अफलातून बदल केला आहे. याशिवाय विकी लवकरच सूजित सरकारच्या उधम सिंह या बायोपिकमध्येही दिसेल. विकी आणि भूमी पेडणेकर मिस्टर लेले या चित्रपटातही दिसतील. ज्याचे दिग्दर्शन शशांक खेतान करत आहे. या चित्रपटात वरूण धवन आणि जान्हवी कपूरही असणार आहे. विकी सैम मानेक शॉची बायोपिक सैम बहादूरमधूनही प्रेक्षकांसमोर येणार आहे. थोडक्यात विकी पुढील वर्षात अनेक चित्रपट आणि विविध भूमिकांमधून दिसण्याची शक्यता आहे. 

जान्हवी कपूरचा वेडिंग प्लॅन, या पद्धतीने पार पडणार लग्नसोहळा

ADVERTISEMENT

खण मंगळसूत्राचा ट्रेंड, समिधा गुरूचा मराठमोळा साज

खतरों के खिलाडीमध्ये टीव्हीवरील आदर्श सून करतेय जबरदस्त स्टंट

03 Aug 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT