ADVERTISEMENT
home / मनोरंजन
खतरो के खिलाडी

खतरों के खिलाडीमध्ये टीव्हीवरील आदर्श सून करतेय जबरदस्त स्टंट

मुली स्टंट करु शकत नाहीत. त्या बऱ्याच गोष्टींना घाबरतात वगैरे अशी खूप जणांची बरीच मत असतात. पण आता एक सेलिब्रिटी आहे जी टीव्हीवरील आदर्श सून म्हणून ओळखली जाते तिने सगळ्यांनाच आश्यर्याचा धक्काच दिला आहे.ही सेलिब्रिटी अन्य कोणी नाही तर टीव्हीवरील सुप्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आहे.  दिव्यांकांला पहिल्यांदा पाहिल्यानंतर ती असे काह करेल असे वाटले नव्हते. पण तिने पहिले काही स्टंट केल्यानंतर तिच्या जबरदस्त स्टंट करण्याच्या जिद्दीवर रोहित शेट्टीही खूश झाला आहे. आतापर्यंत या खेळातून निकी तांबोळी बाहेर पडली असून दिवसेंदिवस या खेळात खूपच रंगत येताना दिसत आहे.


करण जोहर करणार यंदाच्या बिग बॉस 15 सीझनचे सूत्रसंचालन

अजिबात घाबरत नाही दिव्यांका 

https://www.instagram.com/p/CSCjPHahv61/

दिव्यांकाने प्राण्याशी संबधित एक टास्क केला होता. यामध्ये स्पर्धकांना गाणे ओळखून येणाऱ्या नंबरच्या डब्यात जो प्राणी असेल तर तो प्राणी एका पिंजऱ्यातून दुसऱ्या पिंजऱ्यात न्यायचा होता. त्यामध्ये दिव्यांकाने स्टंट जिंकण्यासाठी प्राणी कोणता होता याचा अजिबात विचार केला नाही. तिने तिच्या हातात सुसर उचलली आणि सरळ जाऊन दुसऱ्या पिंजऱ्यात जाऊन ठेवली. तिला यावेळी मगरीची नखं लागली पण तरीदेखील ती घाबरली नाही. तिला तसे पाहून रोहित शेट्टीलाही काही काळासाठी आश्चर्य वाटले. इतकेच नाही तर तिने विमानावरुन फ्लॅग काढण्याचा स्टंटही एकदम मस्त केला. तिने या स्टंटमध्ये वेळ घेतला असला तरी आतापर्यंत तिने स्टंट करण्याआधी इतर कोणाप्रमाणेही विचार केला नाही. तिने बिनधास्त जाऊन तो स्टंट केला. 

ADVERTISEMENT

श्वेताही नाही कमी

https://www.instagram.com/p/CR_Bpw9BJks/

दिव्यांका त्रिपाठीच्या पाठोपाठ या शोमध्ये असलेली श्वेता तिवारी ही देखील यामध्ये कमी नाही. ती या शोमध्ये अनेक चांगले स्टंट करताना दिसत आहे. तिची प्राण्यांची भीती या स्टंट दरम्यान कमी होताना दिसत आहे. गाडीचा स्टंट सुद्धा तिने खूपच चांगल्या पद्धतीने केला होता. त्यामुळे दिव्यांका पाठोपाठ ती देखील या खेळात पुढे जातना दिसत आहे. 

निकीची नुसती हवा

बिग बॉसच्या घरात एकदम रफ टफ वाटणारी निकी तांबोळी मात्र या रिअॅलिटी शोमध्ये सपशेल फेल झालेली दिसत आहे.  कारण तिने अगदी पहिल्या स्टंटपासूनच कोणताही स्टंट करण्यास नकार दिला आहे. तिला अनेकदा संधी मिळून सुद्धा तिने अनेकदा खेळ सोडला आहे. त्यामुळे पहिल्याच आठवड्यात ती यातून बाहेर पडली. इतर स्पर्धकांनीही ती या स्पर्धेत उत्तम नाही असे सांगितले  त्यामुळे तिला घरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यामुळे ती स्टंटच्या बाबतीत नुसती हवा आहे हे सिद्ध झाले आहे.

‘सुपर डान्सर’ च्या मंचावर शिल्पा शेट्टी आता दिसणार नाही, वेगवेगळ्या सेलिब्रिटींची हजेरी

ADVERTISEMENT

राहुलही करतोय चांगले काम

बिग बॉसमधून सगळ्यांच्या मनात उतरलेला राहुल वैद्यही या खेळाचा भाग आहे. तोही या शोमध्ये खूप चांगले करताना दिसत आहे. त्याने या खेळात आतापर्यंत स्टंट केले आहेत. त्यामध्ये तो जिंकला नसला तरी देखील खूप चांगले प्रदर्शन केले आहे. त्यामुळेच त्याचे फॅन फॉलोविंगही अजून वाढलेले आहे. या शो दरम्यान अनेकदा राहुल- अभिनव शुक्ला यांची शाब्दिक जुगलबंदी पाहायला मिळत आहे. त्यामुळे अजूनही त्यांच्यामध्ये काही आलबेल नाही असेच दिसत आहे. 

आता तुम्ही अजूनही हा शो पाहिला नसेल तर नक्की पाहा.

अभिनेता संकर्षण कऱ्हाडेच्या घरी दुहेरी गोडवा, जुळ्या मुलांचा जन्म

02 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT