ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
विद्युत जामवाल  आणि नंदिता मेहतानीचा  झाला साखरपुडा, नेहा धुपियाने दिल्या खास शुभेच्छा

विद्युत जामवाल आणि नंदिता मेहतानीचा झाला साखरपुडा, नेहा धुपियाने दिल्या खास शुभेच्छा

बॉलीवूडचा अॅक्शन हिरो विद्युत जामवाल सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. मात्र ही चर्चा त्याच्या आगामी चित्रपटासाठी नसून त्याने गुपचूप केलेल्या साखरपुड्याबाबत आहे. तीन दिवसांपूर्वीच विदयुतने त्याची गर्लफ्रेंड फॅशन डिझायनर नंदिता मेहतानीसोबत एंगेंजमेंट केल्याची चर्चा आहे. विद्युत आणि नंदिताच्या फोटोवर अभिनेत्री नेहा धुपियाने कंमेट केल्यामुळे या गोष्टीचा खुलासा झाला आहे. विद्युतने याबाबत अधिकृत घोषणा केली नसली तरी नेहाच्या  या कंमेटमुळे विद्युतच्या चाहत्यांनी याबाबत शुभेच्छा देण्यास सुरूवात केली आहे.

विद्युत आणि नंदिताने गुपपूच केला साखरपुडा

एखाद्या सेलिब्रेटीचे प्रेम, साखरपुडा, लग्न याबाबत जाणून घेण्यास चाहते नेहमीच उत्सुक असतात. मालिका आणि चित्रपटातील भूमिकांप्रमाणेच खऱ्या  खुऱ्या आयुष्यातील कलाकारांवर चाहत्यांचे मनापासून प्रेम असते. त्यामुळे आपल्या आवडत्या कलाकाराच्या आनंदात चाहतेही आपला आनंद शोधत असतात. नुकतंच अभिनेता विद्युत जामवालच्या साखरपुड्यामुळे चाहत्यांच्या आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मात्र त्यांच्या  लाडक्या हिरोने त्याच्या साखरपुड्याची अधिकृत घोषणा मात्र अजून केलेली नाही. विद्युत आणि नंदिताचा एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये  ते  दोघं आग्र्याच्या ताजमहल समोर हातात हात घेऊन उभे आहेत. मात्र या फोटोमध्ये नंदिताच्या हातातील एंगेजमेंट रिंग स्पष्ट दिसत आहे. शिवाय अभिनेत्री नेहा धुपियाने यावर कंमेट केल्यावर या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालं आहे. नेहाने आतापर्यंतची सर्वात चांगली बातमी… अभिनंदन असं म्हणत विद्युत आणि नंदिताला  टॅग केलं आहे. काही दिवसांपूर्वीच नंदिताने विद्युतच्या निर्माता म्हणून पहिल्या चित्रपटासाठी शुभेच्छा देखील दिल्या होत्या. तिने कंमेट केलं होतं की, “अभिनंदन व्ही! यश, प्रेम आणि गुडलक तुझ्या आणि तुझ्या टीमसाठी…” यावर विद्युतने “थॅंक यु नंदी बेबी” म्हणत कंमेट केली होती.. 

रीना जिंकत आहे ‘मन उडू उडू झालं’ मधून प्रेक्षकांचे मन

एकता कपूरची मराठमोळी ‘कुसुम’ शिवानी बावकर

ADVERTISEMENT

कोण आहे नंदिता मेहतानी 

विद्युतची गर्लफ्रेंड नंदिता मेहतानी एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. नंदिता सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव्ह असते. नंदिताचे याआधी लग्न झालेले आहे. संजय कपूरसोबत तिचे लग्न झाले होते. नंदिताचा घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्री करिष्मा कपूरने नंदिताचा आधीचा पती संजय कपूरसोबत लग्न केलं होतं. मात्र काही वर्षातच करिष्मा आणि संजयदेखील वेगळे झाले. आता नंदिता आणि विद्युत एकमेकांना डेट करत आहेत. विद्युत सध्या लखनऊमध्ये ‘खुदा हाफिज 2’  चं शूटिंग करत आहेत. शूटिंगच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढत त्याने नंदितासोबत साखरपुडा केला असून त्यानंतर ते दोघं प्रेमाची निशाणी  ताजमहलला भेट देण्यासाठी एकत्र गेले होते. या दोघांचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. विद्युतच्या लग्नासाठी आणि आगामी चित्रपटांबाबत जाणून घेण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक आहेत. 

असं काय घडलं की पापाराझीवर एवढी भडकली यामी गौतम

06 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT