ADVERTISEMENT
home / नातीगोती
प्रेमातील विविध भाव व्यक्त करणाऱ्या सुंदर चारोळ्या (Love Poems For Valentines Day In Marathi)

प्रेमातील विविध भाव व्यक्त करणाऱ्या सुंदर चारोळ्या (Love Poems For Valentines Day In Marathi)

वर्षातील दुसऱ्या महीन्यातला दुसरा आठवडा जरा जास्तच स्पेशल असतो, तो म्हणजे व्हॅलेंटाईन डे वीक असल्यामुळे. या दिवशी आपल्या मनातील गोष्ट तिला किंवा त्याला सांगण्यासाठी अनेकजण वाट पाहत असतात. पण प्रेम हे सदाबहार आहे. या प्रेमाची अनेक रूपं आहेत. अनेक गोष्टीतून प्रेम तुम्ही व्यक्त करू शकता. मग तो एखादा व्हॉटसअॅप मेसेज असो गुलाबांचा गुच्छ असो… एखादी सुंदर चारोळी अथवा प्रेमाचा संदेश (valentine’s day quotes in marathi) लिहा आणि तुमच्या आवडत्या व्यक्तीला द्या.

1. Love Poems For Valentines Day In Marathi

व्हॅलेंटाईन डे साठी प्रेम कविता (Love Poems For Valentines Day)

मराठीतील प्रेम कविता तुम्ही वाचल्या असतील. पण आज आम्ही तुमच्यासाठी खास व्हॅलेंटाईन डे च्या अखेरीला घेऊन आलो आहोत, प्रेमातील अनेक भावना आणि त्यावरील कविवर्य चंद्रशेखर गोखले यांच्या सुंदर चारोळ्या.

2. Love Poems For Valentines Day In Marathi
Valentine Day Quotes In Marathi

Also Read How To Decorate Home On Valentines Day In Marathi

व्हॅलेंटाईन्स डे… आज त्याने ठरवलेलं की तिला गाठून मनातल सांगायचंच. मित्रांनीही त्याला धीर दिला होता. अखेर त्याने तिला गाठलं आणि गुलाबाचं फुल तिच्या हाती दिलंच. तिनेही काहीही न बोलता सहज होकार दिला.

ADVERTISEMENT

ओठात गुदमरलेले शब्द
अलगद डोळ्यांकडे वळले
पापण्य़ा जरा थरथरल्या
म्हणून गुपित तुला कळले…#चंगो

पापण्या झुकल्याशिवाय…
संवाद पूर्ण होत नाही
अन गालात हसू दाटल्याशिवाय
त्याला अर्थ येत नाही…#चंगो

मला नाही जमत शब्दात मांडायला
मनातल्या सगळ्या गोष्टी
उगीच वाटतं एखादी नाजूक भावना
शब्दानं होईल उष्टी…#चंगो

तो तिच्याकडे पहायचा तेव्हा
नेमकं तिचं लक्षच नसायचं
खरंतर तो पाहतोय की नाही
यावर तिचं बारीक लक्ष असायचं…#चंगो

ADVERTISEMENT

प्रेमातल्या काही गोष्टी खरंच किती गोड असतात नाही का….

तुझं हे नेहमीचं झालंय
आल्या आल्या निघणं
मी जाते, मी निघते म्हणताना
मी थांबवतोय का बघणं….#चंगो

जेव्हा ‘ती’बसते
प्राजक्ताकडे करून पाठ
तेव्हा समजावं ‘ती’ बघतेय
कुणाच्या येण्याची वाट…#चंगो

नसते उगीच भास होतात
तू यायची असलीस की
मग डोळे म्हणतात हा भासच आहे
तू येताना दिसलीस की…#चंगो

ADVERTISEMENT

ते दोघं
बोलण्यासाठी भेटायचे
अन त्या आधी बराच वेळ
भेट ठरवण्यासाठी बोलायचे…#चंगो

भेट झाली…’आय लव्ह यू’ म्हणून झालं…दिवस कसा अगदी पटकन गेला. पण घरी आल्यावरही तो अजून तिच्याच विचारात आहे.

तू समोर असलीस की
नुसतचं तुला बघणं होतं
आणि तू जवळ नसताना
तुझ्यासोबत जगणं होतं…#चंगो

मिठी या शब्दात
केवढी मिठास आहे
नुसता उच्चारला तरी
कृतीचा भास आहे….#चंगो

ADVERTISEMENT

तेव्हा कसं तू यायच्या वेळी
झुळूक वहायची वाऱ्याची
अन मंजूळ खळखळ सुरू व्हायची
मनातल्या झऱ्याची…#चंगो

आज व्हॅलेंटाईन डे आहे, पण कालच नेमकं त्यांचं भांडण झालं. त्यामुळे मॅडम जरा गरम आहेत. अशा वेळी त्याच्या मनातील भावना व्यक्त करणारी ही चारोळी. तसंच आवडतं माणूस आजारी पडल्यावर उपयोगी पडतात ते लवकर बरे व्हा (Get Well Soon In Marathi) सांगणारे संदेश

तिचं गप्प बसणं
त्याला सहन होत नाही
आणि काहीतरी बोल असं
सांगताही येत नाही…#चंगो

त्याने अडवलं नाही
तरी तिची पावलं अडली
तो तर काही बोलला नाही
मग अशी कोणती गोष्ट घडली ….#चंगो

ADVERTISEMENT

कितीतरी कारणं देऊन आणि आटोकाट प्रयत्न करून शेवटी आज त्यांची व्हॅलेंटाईन स्पेशल भेट झाली. तसं प्रेम तर आपण प्रत्येक दिवशीच करतो एकमेंकावर. पण तिचा आपला हट्ट सूरूच होता, आज भेटायचंच म्हणून. भेटल्यावरचे ते क्षण काही औरच असतात नाही का. आजूबाजूच्या लोकांच्या कोलाहलातही ते दोघं मात्र त्यांच्याच जगात असतात.

कधीकधी मन मला
खोल तळ्यासारखं वाटतं
जेव्हा तुझं बघणं
मनाचं तळ गाठतं…….#चंगो

सगळ्यांच्या नजरा कशा
आपल्याकडेच वळतात
अन कुणाकडे न पाहता
आपल्याला त्या कळतात….#चंगो

निथळत राहतो परिसर
पाऊस पडून गेल्यावर
माझंही काहीसं असंच होतं
तू हात हाती दिल्यावर…#चंगो

ADVERTISEMENT

दोघं सोबत असले की
दोघे जगावेगळे दिसतात
मला विचाराल तर खरंच
दोघे वेगळ्या जगात असतात….#चंगो

माझ्यासारखंच तेव्हा
तिचंही होत असेल
गप्पा रंगात आलेल्या असताना
नेमकं समोर घर येत असेल…#चंगो

आयुष्य अगदी बदलून गेलंय तिला भेटल्यापासून. तिचं बोलणं, तिला भेटणं, तिच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवणं. काही दिवसांपूर्वी तिला फक्त लांबून बघणारा आणि प्रेमाची कबुली तिच्याकडे कशी करू याचा विचार करणारा तो. आता मात्र तिच्यासोबत प्रत्येक क्षण जगतोय.

माझ्या आयुष्याचे दोन भाग पडतात
एक तू दिसण्याआधी दुसरा तुला पाहिल्यानंतर
आणि तसं पाहिलं तर दोघात
फक्त एका श्वासाचं अंतर… #चंगो

ADVERTISEMENT

नेहमीच तो तिच्या
आधी येऊन बसायचा
अन कितीदा ती गेल्यावर
तो तिथेच बसलेला दिसायचा…#चंगो

माझ्या आठवणीत सगळं आहे
तुझं रागावणं आणि रुसणं
फक्त आता मला बघायचंय तुझं
एकांतात मला आठवत बसणं….#चंगो

मी आसवाला म्हंटलं…
तो समोर असेपर्यंत थांब
तू काय आत्ता ओघळून जाशील
पण त्याला जायचंय बरंच लांब….#चंगो

3. Love Poems For Valentines Day In Marathi
Valetines Day Poem In Marathi

वाचा – व्हॅलेंटाईन डे कोट्स

ADVERTISEMENT

भांडण झालं नाहीतर प्रेमात रंगत तरी कशी येणार नाही का…..प्रेमातील भांडणातही एक वेगळीच मज्जा आहे.

तिचं गप्प बसणं
त्याला सहन होत नाही
आणि काहीतरी बोल असं
सांगताही येत नाही….#चंगो

ती दिसली की तो दिसायचा
जरा मागे पुढे
एकाच दिशेने जताना…
दोघात अंतर थोडे…..#चंगो

नजरेआड होईर्यंत ..
तुला मी पाहिलं
आणि नंतर कितीतरी वेळ
नजरेला मागे खेचायचं राहिलं…#चंगो

ADVERTISEMENT

आज तिला कळलं की, त्याचं तिच्यावर प्रेम नव्हतं. खरंतर हे तिला अनेकदा तिच्या मित्रमैत्रिणींनी सांगण्याचा प्रयत्नही केला होता. पण तिचं त्याच्यावर भाबडं प्रेम होतं आणि राहीलंही. कारण त्याच्याशिवाय जगणंही तिला शक्य नाहीये. भलेही त्याचं तिच्यावर प्रेम नसलं तरीही तिची प्रेमाची भावना मात्र कायम राहणार आहे. कारण प्रेमाला सीमा नाहीत.

तू फसवतोयस हे कळायचं
तुझ्या डोळ्यात बघून..
पण मी म्हणायचे जाऊदे..नाहीतर
मी स्वता:ला फसवत राहीन तुझ्याशिवाय जगून…#चंगो

तुझी सावलीसुद्धा ओळखेन
कधी हरवलास तर
अरे पण मी मागे राहीनच कशी?
तू कधी माझ्यापासून दुरावलास तर…#चंगो

आठवणी जपल्या जातात
स्वप्नं राखली जातात अन कधी
स्वप्नासकट दु:खसुद्धा
बंद पापणीआड झाकली जातात…#चंगो

ADVERTISEMENT

मला माझी हार मान्य आहे
म्हणजे तू जिंकलास असं होत नाही …
डाव तुझ्याहाती देऊनही
जिंकता तुला येत नाही…#चंगो

नुसतं दिसणं पुरेसं असतं
बोलायची गरज नसते
अशी नजरभेट मग कितीवेळ
मागल्यादारी मी आठवत बसते…#चंगो

मनातल्या मनात भुयार
खणता यायला हवं
कुणाला न विचारता तुझ्याबद्दल
जाणता यायला हवं…#चंगो

तू विझत असताना
तुझ्याभोवती मी ओंजळ धरली
तू तेवत राहिलास
नि प्रकाशाने माझी ओंजळ भरली…#चंगो

ADVERTISEMENT

माझं कसं होअील हा प्रश्न
आता मला पडत नाही
कारण सूर्य बुडताना दिसला
तरी खरा तो बुडत नाही….#चंगो

40539998 538452979900971 30441822859687280 n
त्यांच्या लग्नाला आज 50 वर्ष पूर्ण झाली. आज व्हॅलेंटाईन डे ला नातवांनी आग्रह केल्याने ते दोघंही बाहेर पडले. त्याने तिला बरेच वर्षांनंतर आज गजरा घेऊन दिला. तिच्या केसांत अलगद माळला. तिच्याही डोळ्यात इतक्या वर्षांचा सहजीवनाचा सुंदर प्रवास आठवून भरून आलं.

तिला भरून आलं की
त्यालाही येतं जरासं भरून
मग तो डोळे कोरडे ठेवायला धडपडतो
काहीही करून….#चंगो

प्राजक्त फुलताना पहायचा म्हणून
आपण पहाटेपर्यंत जागायचो
कसं ना, तेव्हा आपण…
अगदी वेड्यासारखे वागायचो….#चंगो

ADVERTISEMENT

तू माझं असणं
किती छान आहे
नाहीतर हे जग म्हणजे…
नुसतचं माणसांचं रान आहे….#चंगो

दिवसाची सुरुवात म्हणजे
एकदा आरशात बघायचं
आणि ठरवून टाकायचं
बास! आता आपण जगायचं…#चंगो

लक्षात ठेवा की, आपल्या भावनांना व्यक्त करतानाच दुसऱ्यांच्या भावनांचाही आदर करा. शेवटी काय….प्रेम करा आणि आनंदी राहा. कारण बाकी सब झूट आहे.

फोटो सौजन्य – Instagram/Twitter

ADVERTISEMENT

हेही वाचा –

10 गोष्टींतून मुली व्यक्त करतात प्रेम, जाणून घ्या या गोष्टी

Valentines Day: नातं प्रेमाचं

Valentines Day : ‘व्हॅलेंटाईन्स डे’ चा अर्थ तुम्हाला कळलाय का

ADVERTISEMENT
14 Feb 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT