ADVERTISEMENT
home / International Travel
जगभरातील या विचित्र म्युझियमविषयी तुम्हाला माहीत आहे का

जगभरातील या विचित्र म्युझियमविषयी तुम्हाला माहीत आहे का

जगभरात पर्यटन करताना अनेक विचित्र अथवा न ऐकलेल्या गोष्टींचा खुलासा होत असतो. फिरताना संग्रहालये ही नेहमी पर्यंटकांचे आकर्षण असतात. कारण एखाद्या नवीन ठिकाणी गेल्यावर तिथली संस्कृती, भौगोलिक परिस्थिती, इतिहास अशा अनेक गोष्टींचा खुलासा अशा म्युझियमधून होत असतो. जगभरात आजवर अशी हजारो म्युजियम आहेत ज्यामधून त्या देशांच्या संस्कृतीचं दर्शन घडतं. खरंतर प्रत्येक संग्रहालय निर्माण करण्यामागे एक खास उद्दिष्टं नक्कीच असतं. मात्र जगात अशी काही विचित्र म्युझियम आहेत जी पाहून तुम्ही तोंडात बोटच घालाल. यासाठीच जाणून घ्या जगभरातील या विचित्र म्युझियमविषयी…

सुलभ इंटरनॅशनल म्युझियम ऑफ टॉयलेट्स ( भारत)

जगभरातील म्युझियमचा विषय निघालाच आहे तर सुरूवात आपल्या देशापासूनच करू या. भारतात सुलभ इंटरनॅशनल म्युझियम ऑफ टॉयलेट या नावाचे एक विचित्र संग्रहालय आहे. भारताची राजधानी दिल्लीमध्ये असलेले हे संग्रहायल स्वच्छता आणि शौचालयांचा वैश्विक इतिहास तुमच्यासमोर मांडतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे संग्रहालय जगातील दहा विचित्र संग्रहालयापैकी एक महत्त्वाचे संग्रहालय आहे. या संग्रहायलाचे उद्धाटन 1992 मध्ये डॉ. बिंदेश्वर पाठक यांनी केले होते. या संग्रहालयात एकूण पन्नास देशातील शौचालये आणि त्यासंबधीत माहिती देण्यात येते. शिवाय प्राचीन काळातील यामागचा इतिहासही या ठिकाणी सांगण्यात येतो. 

Instagram

ADVERTISEMENT

इंटरनॅशनल स्पाय म्युझियम (वॉशिंग्टन)

वॉशिंग्टनमध्ये असलेल्या या आंतरराष्ट्रीय संग्रहालयात जगभरातील स्पाय म्हणजेच गुप्तचर कलाकृतींचा संग्रह करण्यात आलेला आहे. हे संग्रहायल जगभरातील सर्व गुप्तचर व्यवसाय आणि त्यासाठी लागणारे साहित्य यावर प्रकाश टाकते. गुप्तचराचे  काम करण्यासाठी लागणारे मिनी कॅमेरा, नकली पैसे, हत्यारे, मशिन्स या ठिकाणी संग्रहित करण्यात आले आहेत. या ठिकाणी येणारे पर्यंटक स्वतः काही इंटरअॅक्टिव्ह सेशनमध्ये सहभागी होऊन गुप्तचर होण्याचा अनुभव घेऊ शकतात. शिवाय या ठिकाणी जगभरातील गुप्तचरांच्या मायावी कथांची माहिती तुम्हाला मिळू शकते.

Instagram

हेअर म्युझियम ( टर्की)

टर्की मध्ये एक विचित्र संग्रहायल आहे. जिथे अनेक प्रकारच्या केसांचा संग्रह करण्यात आलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला जवळजवळ सोळा हजारपेक्षा जास्त प्रकारचे केस दिसू शकतात. तुर्कस्थान अथवा टर्की हा मध्यपूर्वेकडील एक मोठा देश आहे. या देशातील अवानोस या शहरामध्ये  हे संग्रहालय आहे. हे शहर प्राचीन काळापासून मातीच्या भांड्यांसाठी आधीच प्रसिद्ध आहे. ज्या ठिकाणी हे विचित्र आणि असामान्य असं म्युझिअम आहे. या संग्रहालयातील भिंतींवर सोळा हजारांपेक्षा जास्त प्रकारचे केस ठेवण्यात आले आहेत. ज्यांच्या खाली त्या महिलांचे नाव आणि पत्ते देखील आहेत. 

ADVERTISEMENT

Instagram

म्युझियम ऑफ बॅड आर्ट ( अमेरिका)

आर्ट म्युझियम अथवा कला संग्रहालय म्हणजे तिथे तुम्हाला जगभरातील सुंदर कलांचे दर्शन घडते. मात्र अमेरिेकेतील हे म्युझियम मात्र अगदीच वेगळं आणि विचित्र आहे. कारण या संग्रहालयात फक्त त्याच कलाकृतींचा समावेश केला जातो ज्या लोकांकडून नाकारल्या जातात अथवा लोकांना ज्या कलाकृती आवडत नाहीत. आतापर्यंत या संग्रहालयात जवळजवळ अशा सहाशे कलाकृतींचा समावेश करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

Instagram

अंडर वॉटर म्युझियम ( मॅक्सिको )

हे संग्रहालय म्हणजे विज्ञान आणि निसर्गाचा एक अप्रतिम मेळ आहे. कारण हे म्युझिअम चक्क समुद्राच्या आत निर्माण करण्यात आलं आहे. यामध्ये जवळजवळ पाचशे मुर्ती आहेत आणि तीन गॅलरीज आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे यातील काही मुर्तीचे नुकसान झालेले आहे. सोळाशे स्वेअरफूटवर पसरलेल्या या म्युझियमध्ये  असलेल्या मुर्तीचे प्रत्येकी वजन जवळजवळ एकशे वीस टनहून अधिक आहे. मात्र हे म्युझिअम पाहण्यासाठी तुम्हाला पोहता येणं गरजेचं आहे. 

Instagram

ADVERTISEMENT

आहेत की नाही ही संग्रहालये थोडी विचित्र आणि पाहण्याजोगी. तेव्हा पर्यंटनासाठी या देशांमध्ये गेल्यावर या विचित्र म्युझियम्सनां जरूर भेट द्या. शिवाय तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कंमेटमध्ये जरूर कळवा. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम 

अधिक वाचा –

मुंबईतील ही ’10’ संग्रहालये तुम्हाला माहीत आहेत का (Top 10 Museums In Mumbai)

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळे (Historical Places In Maharashtra In Marathi)

इंटरनॅशनल टूर स्वतःच प्लॅन करण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स

12 Jan 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT