इंटरनॅशनल टूर स्वतःच प्लॅन करण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स

इंटरनॅशनल टूर स्वतःच प्लॅन करण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स

जग फिरायला कोणाला आवडणार नाही. इंटरनॅशनल टूर करणं ही विश तर प्रत्येकाच्या बकेट लिस्टमध्ये असतेच. जर तुमचीही अशी इच्छा असेल आणि तुम्ही देखील भारताबाहेर फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर ही माहिती जरूर वाचा. परदेशात जाण्याआधी तुम्हाला काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. खरंतर परदेशात जाणं आता पूर्वीप्रमाणे मुळीच कठीण नाही. योग्य प्लॅनिंग करून तुम्ही कोणत्याही ट्रॅव्हल पॅकेजशिवाय परदेशात फिरू शकता. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत काही टिप्स शेअर करत आहोत ज्या तुम्हाला परदेशात फिरण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील. 

परदेश दौरा करण्यासाठी काही टिप्स -

1. ज्या देशात जायचं आहे त्याबद्दल आधी रिसर्च करा -

भारताबाहेर फिरायला जाणं आता मुळीच कठीण नाही. त्यामुळे आधी तुमच्या बजेट नुसार एखादं डेस्टिनेशन ठरवा. एकदा तुमचं  डेस्टिनेशन ठरलं की बाकीच्या सर्वच गोष्टी सोप्या होत जातात. मग त्यानुसार प्लॅनिंगला लागा. ज्या देशात जाणार आहात त्याबद्दल माहिती गोळा करा. ऑनलाईन सर्च करून, पुस्तकं वाचून, ट्रॅव्हल व्लॉग पाहून तुम्ही ही माहिती गोळा करू शकता. त्या देशात जाण्यासाठी कोणता काळ चांगला आहे तो ठरवा आणि त्यानूसार तुमच्या विमानाचे टिकीट कमीत कमी तीन ते चार महिने आधीच बूक करा.  ज्यामुळे विमान खर्च तुमच्या बजेटमध्ये असेल. शिवाय तुमच्या ट्रिपची सहा महिने, तीन महिने आणि एक महिना आधी करण्यासारख्या काही गोष्टींची चेकलिस्ट तयार करा.

 

2. तुमच्या प्रवासासाठी लागणारी कागदपत्रे तयार करा -

परदेशात जायचं म्हणजे सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे पासपोर्ट आणि त्या देशाचा व्हिसा. यासोबतच तुम्हाला परदेशात प्रवास करताना तुमचं इंटननॅशनल ड्रायव्हिंग लायसन, त्या देशाचा नकाशा, विमानाची तिकीटं, हॉटेलचं बुकींग, ट्रॅव्हल इंन्शुरन्स या गोष्टींचीदेखील गरज लागू शकते. त्यामुळे ही कागदपत्र वेळीच तयार करा. ज्यामुळे ऐनवेळी तुमची धावपळ होणार नाही. 

 

हे ही वाचा -

कमी बजेटमध्ये परदेशी जायचं आहे, मग ही डेस्टिनेशन आहेत परफेक्ट

Instagram

3. हॉटेल अथवा राहण्याचं बुकिंग करा -

तुम्ही ज्या देशात जाणार आहात तिथुन तुम्ही कोणकोणत्या ठिकाणी जाणार त्यानुसार तुमच्या हॉटेलचं बुकिंग करा. जर तुमचं बजेट कमी असेल तर परदेशात हॉस्टेलची व्यवस्थादेखील असते. तुम्ही हॉस्टेल स्टे करून तुमची ट्रिप प्लॅन करू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ट्रॅव्हल प्लॅन आणि बजेटनुसार तुमच्या राहण्याच्या व्यवस्थेचं प्री बुकिंग करा. 

4. तुम्ही कुठे कुठे जाणार त्याचं प्लॅनिंग करा -

तुम्ही कोणत्या देशात आणि किती दिवस जाणार आहात यावरून तुमची आयटरनरी (आराखडा) तुम्हाला प्लॅन करावी लागेल. कारण त्या देशातील विविध ठिकाणी पोहचण्यासाठी वाहतुकीची कोणती साधने वापरली जातात. एखाद्या पर्यटन स्थळी भेट देण्यासाठी किती एन्ट्री फी आहे. तिथे कोणत्या वेळी जावं अशा अनेक गोष्टी तुम्ही रिसर्च करून ठरवू शकता. यासाठी ऑनलाईन रिसर्च करून माहिती मिळवा. 

Instagram

5. परदेशी करन्सी आधीच घ्या -

प्रत्येक देशाची करन्सी निरनिराळी असते. त्यामुळे तुम्ही ज्या देशात जाणार आहात त्या देशात कोणती करन्सी वापरली जाते हे आधीच पाहा. त्यानुसार तुमच्याजवळील खर्चाचे पैसे त्या करन्सीमध्ये एक्स्चेंज करून घ्या. तुम्ही परदेशात किती दिवस राहणार, त्यादरम्यान तुम्हाला अंदाजे किती खर्च येणार त्यानुसार तुमच्याजवळ पैसे जवळ ठेवा. परदेशात गेल्यावर डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड वापरणार असाल तर त्यानुसार तुमच्या बॅंक अंकाऊंटमध्ये पैसे आहेत याची खात्री करून घ्या. शिवाय कार्ड पेमेंट केल्यावर तुमची बॅंक तुमच्याकडून convenience fee घेणार हे लक्षात ठेवा. 

6. तुमचे गॅझेट तयार ठेवा -

परदेशात गेल्यावर तुम्हाला काही गॅझेट नक्कीच लागू शकतात. त्यामुळे आधीच त्याची व्यवस्था करा. परदेशात तुम्हाला युनिव्हर्सल चार्जर, कॅमेरा, मोबाईल, युएसबी केबल, वाचन करण्यासाठी किंडल, हेडफोन्स, आयपॅड, पोर्टेबेल स्पिकर्स, त्या देशात मोबाईल सेवा पूरवणारे सिम कार्ड या गोष्टी एका वेगळ्या पाऊचमध्ये ठेवा. काही देशांमध्ये जाणाऱ्या एअरलाईन्समध्ये पॉवर बॅंक आणि काही गॅझेट्सवर बंदी असते त्यामुळे जाण्याआधी त्याची माहिती घ्या. 

7. विमान प्रवासात लगेजचं वजन किती असावं याची माहिती घ्या -

परदेशात जायचं म्हणजे विमानाचा प्रवास हा करावाच लागतो. विमान प्रवास करताना प्रत्येक एअर लाईन्सचे काही नियम असतात. ज्यानुसारच तुम्हाला तुमच्यासोबत सामान कॅरी करावं लागतं. तुम्ही किती लगेज आणि हॅंडबॅगेत किती सामान घेऊ शकता हे तुमच्या एअर तिकीटावर लिहीलेलं असतं. त्यानुसार तुमच्या सामानाचं पॅकिंग करा. शिवाय एअर लाईन्सच्या नियमांनुसार तुमच्या हॅंडबॅगेत काय आणि किती सामान घेऊन जायचं हेदेखील ठरवा. हॅंडबॅगेत 100 मिली पेक्षा जास्त लिक्विड घेऊन जाऊ शकत नाही.

8. विमान प्रवासासाठी लागणारं साहित्य -

परदेशात जाण्यासाठी विमानाने किती वेळ लागणार याची आधीच माहिती काढा. कधी कधी परदेशात जाण्यासाठी खूप तास विमानात बसावं लागतं. प्रवासादरम्यान एक दोन वेळा विमान बदलावं लागतं. अशा वेळी प्रवासात झोपण्यासाठी आय मास्क, एअर प्लग, ट्रॅव्हल पिलो तुमच्या हॅंडबॅगेत असणं फार महत्त्वाचं आहे. किंडल अथवा एअर फोन्स जवळ असतील तर  तुमचे मनोरंजनही नक्कीच होऊ शकेल. शिवाय यामुळे विमानातील प्रवासात तुम्हाला नक्कीच कंटाळा येणार नाही. 

9. ट्रॅव्हल अॅप डाऊनलोड करा -

आजकालच्या आधुनिक जगात मोबाईल हे साधन तुमच्या नेहमीच उपयोगाचं आहे. कारण  मोबाईलवरून अनेक गोष्टी तुम्हाला सहज करता येतात. तुमची ऑइलाईन बुकींग चेक करण्यापासून ते गुगल मॅपवरून डेस्टिनेशन गाठण्यापर्यंत सर्वच गोष्टी तुम्ही मोबाईलवरून करू शकता. शिवाय ट्रॅव्हल अॅप ही आजकाल एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. यासाठीच काही महत्त्वाचे ट्रॅव्हल अॅप आधीच तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करा.

10. ज्या देशात जाणार तिथलं काही स्थानिक शब्द माहीत करून घ्या -

प्रत्येक देशाची स्वतःची स्थानिक भाषा आणि जीवनशैली असते.  जर तुम्हाला काही दिवस त्या देशात राहणार असाल तर त्या देशातील काही निवडक आणि प्रचलित शब्द तुम्हाला माहीत असालाच हवे. ज्यामुळे त्या ठिकाणी संवाद साधणं तुम्हाला सोपं जाईल. सर्व देशांमध्ये तुम्ही जरी इंग्रजी भाषेतून संवाद साधू शकत असला तरी तुम्हाला जर स्थानिक भाषा थोडी जरी येत असेल तर तुमचा प्रवास सुखाचा होऊ शकेल. शिवाय त्या देशातील नियमांचा अभ्यास करा ज्यामुळे तुमच्याकडून कोणतेही गैरवर्तन होणार नाही. 

Instagram

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा  -

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा -

कमी बजेटमध्ये भारतात फिरण्यासाठी '25' पर्यटन स्थळं

भारतात ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम आहेत ही ठिकाणं