home / मनोरंजन
what-did-adinath-kothare-say-about-broken-relationship-with-wife-urmila-kothare-in-marathi

अखेर उर्मिलासह बिनसलेल्या नात्यावर आदिनाथने तोडली चुप्पी

गेल्या काही दिवसांपासून आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) आणि उर्मिला कोठारे (Urmila Kothare) हे कुठेही एकत्र दिसत नसल्यामुळे त्यांच्या नात्यात काहीतरी बिनसलं आहे अशा चर्चेने जोर धरला आहे. तर एकाच इमारतीमध्ये दोन वेगवेगळ्या घरामध्ये राहात असल्याचेही सुत्रांकडून कळले आहे. याशिवाय मिळालेल्या माहितीनुसार उर्मिला आणि आदिनाथ दोघांचेही आई – वडील त्यांची मुलगी जिजा हिचा सांभाळ सध्या करत असल्याचे सांगण्यात आले आहे. तर उर्मिला सध्या तिच्या नव्या मालिकेच्या चित्रिकरणात व्यस्त असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून या जोडीमध्ये काहीच ठीक नाही अशा चर्चांनी सध्या जोर धरला आहे. तर दोघांमधील नातं पुन्हा एकदा सुरळीत व्हावं यासाठी दोन्ही कुटुंबाकडून सध्या प्रयत्न करण्यात येत असल्याचंही म्हटलं जात आहे. 12 वर्षांनी कमबॅक करताना उर्मिलाने स्वतःचं होम प्रॉडक्शन न निवडता वेगळ्या प्रॉडक्शनची निवड केली आणि या चर्चेला अधिक सुरूवात झाली असल्याचं दिसून आलं आहे. मात्र आता या चर्चांवर आदिनाथने चुप्पी तोडली असून स्पष्टीकरण दिले आहे. 

सर्वकाही आलबेल असल्याचे आदिनाथचे म्हणणे

एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना आदिनाथने आता या प्रकरणावर मौन सोडले आहे. त्याने आपल्या आणि उर्मिलाच्या नात्याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. ‘उर्मिला आणि मी दोघंही अशा अफवांच्या बातम्यांकडे लक्ष देत नाही. आम्ही दोघांमध्येही सर्वकाही चांगलं सुरू असून दोघेही एकमेकांबरोबर अत्यंत आनंदी आहोत. आमच्या नात्याबाबत चुकीच्या बातम्या पसरल्या आहे. पण सध्या दोघेही चित्रीकरणामध्ये व्यस्त असल्यामुळे एकमेकांसोबत दिसत नाही इतकंच कारण आहे.’ आदिनाथने जरी असे स्पष्टीकरण दिले असले तरीही उर्मिलाने मात्र कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही आणि ती प्रसारमाध्यमांनाही सध्या सामोरी जात नाहीये. याशिवाय आदिनाथने नुकताच्या उर्मिलाच्या झालेल्या वाढदिवसालाही सोशल मीडियावर शुभेच्छा दिलेल्या नाहीत अथवा उर्मिलाने चंद्रमुखीसारख्या इतक्या मोठ्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी स्वतःच्या सोशल मीडियावर एकही पोस्ट अथवा आदिनाथसाठी शुभेच्छा व्यक्त केलेल्या नाहीत याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे आदिनाथचं स्पष्टीकरण म्हणावं तसं चाहत्यांनाही रूचलेलं नाही. आदिनाथ सांगत आहे तेच खरं असावं अशीच प्रार्थना सध्या दोघांचे चाहते करत आहेत असं म्हणावं लागेल. तर लवकरच ही जोडी पुन्हा एकदा एकत्र समोर दिसेल तेव्हाच चाहत्यांचाही जीव भांड्यात पडेल असंही म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 

उर्मिला आणि आदिनाथ आपापल्या कामात व्यस्त

आदिनाथ सध्या चंद्रमुखीचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. तर सध्या या मराठी चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतले आहे. तर दुसऱ्या बाजूला उर्मिला सध्या आपल्या कमबॅक करत असलेल्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मराठी मालिकेच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. हे जरी असलं तरीही दोघांनी कोणतीही एकमेकांबद्दल पोस्ट न केल्यामुळे त्यांच्या नात्यात काहीही व्यवस्थित नसल्याचाच अंदाज सध्या काढला आहे. याशिवाय उर्मिला याबाबत काहीही बोलत नसल्यामुळेही चाहत्यांना काहीही अंदाज लागत नाहीये. मात्र ही बातमी खोटीच निघावी अशीच सर्वांची मनोमन इच्छा आहे आणि जे काही असेल ते दोघांनी विसरून जाऊन पुन्हा एकदा जिजासाठी योग्य विचार करावा असंही सध्या म्हटलं जात आहे. तर आज आदिनाथच्या वाढदिवसाच्या (Adinath Kothare Birthday) निमित्तानेही त्याच्या चाहत्यांनी त्याच्या भविष्यासाठी प्रार्थना केल्या असून लवकर सर्व काही चांगलं व्हवां असं म्हटलं आहे.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

13 May 2022

Read More

read more articles like this
good points logo

good points text