अभिनेत्री उर्मिला आणि अभिनेता आदिनाथ कोठारे यांची क्यूट मुलगी आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांची नात जिजा कोठारेचा आज पहिला वाढदिवस आहे. जीजाच्या वाढदिवसाबद्दल उर्मिलाने संक्रातीलाच सांगितलं होतं की, जिजाच्या पहिल्या वाढदिवसापासून उर्मिला तिच्या मातृत्वाच्या प्रवासाचे आणि जिजाचे अनेक न पाहिलेले फोटोही तिच्या इन्स्टा अकाउंटवर शेअर करणार आहे.
आम्हीही जिजाच्या पहिल्या वर्षातील काही खास क्षणांचा घेतलेला हा सुंदर आढावा –
उर्मिला आणि मातृत्व
मातृत्व हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील महत्वाचा आणि अविस्मरणीय टप्पा असतो. अभिनेत्री उर्मिलाने तिच्या आयुष्यातील ही महत्त्वपूर्ण घडामोड अक्षरक्षः जगली आहे. तिने मातृत्वाचा प्रत्येक क्षण आपल्या फॅन्सबरोबर ही शेअर केला आहे.
मग तो बेबीबंपसोबतचा अवॉर्ड मिळाल्यावरचा फोटो असो वा प्रेग्नन्सी टॉक्स शेअर करणं असो
अगदी प्रेग्नन्सीमुळे वाढलेल्या वजनामुळे तिच्यावर टीका झाली तेव्हाही तिने अशा पोस्टने सहज उत्तर दिले.
प्रेग्नन्सी आणि पोस्ट प्रेग्नन्सी काळातील योगा करतानाचे उर्मिलाचे फोटोज आणि व्हीडीओज
View this post on Instagram
View this post on InstagramHappy International Yoga Day #yoga #fitnessmodel #fitness #fitmom PC : @adinathkothare
डोहाळे जेवण आणि बेबी शॉवरचे सुंदर फोटोज
उर्मिला आणि आदिनाथने या काळात पेंच अभयारण्याची सफर करत बेबीमूनही साजरा केला.
आपल्या प्रेग्नन्सीचे क्षण अविस्मरणीय करण्यासाठी तिने खास फोटोशूटही केलं.
View this post on Instagram
जिजाचा जन्मल्यानंतरचा पहिला फोटो
जिजाचं बारसं
जिजाचं बारसंही अगदी थाटामाटात साजरं करण्यात आलं. बारश्याच्यावेळी गुलाबाच्या फुलांनी सजवलेल्या पाळण्यात खणाचं परकर पोलकं घातलेली जिजा फारच गोड दिसत होती.
View this post on Instagram#माझी लेक जिज़ा !!! #aboutlastnight #बारसं #namingceremony of our #daughter #Jiza
जिजाची पहिली ट्रीप
जिजाच्या पहिल्या आऊटडोर ट्रीपला उर्मिला आणि कोठारे कुटुंबिय कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शनाला गेले होते. तेव्हा उर्मिलाने जिजासोबतचा शेअर केलेला हा क्यूट सेल्फी
आईबरोबर स्वीमिंग करणारी क्यूट जिजा
असं म्हणतात की, बाळांना जन्मतःच स्वीमिंग येत असतं. जिजाने ही आपल्या आईबरोबर छानपैकी स्वीमिंगचे धडे घेतले तो क्षण
आणि आज जिजाच्या वाढदिवसानिमित्त उर्मिलाने शेअर केलेला हा सुंदर फोटो.
पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ‘जिजा कोठारे’.