केस निरोगी राहण्यासाठी तुम्ही केसांची योग्य काळजी नक्कीच घेत असाल. केसांना हॉट ऑईल मसाज करणं, केस नियमित स्वच्छ करणं आणि केसांना कंडिशनिंग करणं यासाठी गरजेचं आहे. साधारणपणे केसांवर कंडिशनरचा वापर शॅम्पू केल्यावर केला जातो. ज्यामुळे कोरडे झालेले केस पुन्हा मऊ आणि चमकदार दिसू लागतात.पण जर तुमचे केस कायम सुंदर आणि चमकदार दिसावे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही केसांना प्री-कंडिशनिंग करणं तितकंच गरजेचं आहे. यासाठी जाणून घ्या प्री- कंडिशनिंग म्हणजे काय आणि केसांवर याचा काय चांगला परिणाम होतो. यासोबतच वाचा केस सिल्की करण्यासाठी घरगुती उपाय (Silky Hair Tips In Marathi)
प्री-कंडिशनिंग म्हणजे काय
केसांना शॅम्पू करण्याआधी कंडिशन करणं म्हणजे प्री- कंडिशनिंग होय. हा केसांची निगा राखण्याचा एक चांगला प्रकार आहे. आजकाल प्री-कंडिशनिंग करणं खूप ट्रेंडमध्ये आहे. कारण जेव्हा तुम्ही केस शॅम्पू केल्यावर केस कंडिशनिंग करता तेव्हा तुमचे केस आणि केसांची मुळं चिकट होतात. ज्यामुळे एखादे कंडिशनिंग प्रॉडक्ट तुमच्या केसांच्या मुळांमध्ये जाऊन केसांचे नुकसान होण्याची शक्यता असते. मात्र यापेक्षा प्री-कंडिशनिंग करणं जास्त लाभदायक आहे. कारण यामुळे तुमचा स्काल्प स्वच्छ होतो आणि केस मऊ राहतात. यासाठी तुम्ही केस धुण्याआधी तुम्ही कोरड्या अथवा ओल्या केसांवर कंडिशनर लावू शकता. जर तुम्हाला बाजारातील कंडिशनर नको असेल तर प्री-कंडिशनिंगसाठी तुम्ही घरातील नैसर्गिक कंडिशनरचा वापर करू शकता. केस धुण्याआधी वीस मिनीटे केसांना कंडिशनर लावा आणि केस बांधून ठेवा अथवा टॉवेलने झाकून ठेवा. त्यानंतर वीस मिनीटे अथवा अर्धा तासाने केस शॅम्पू करा. यासाठीच वाचा केसगळती थांबवण्यासाठी उत्तम हेअर कंडिशनर (Best Anti Hair Fall Conditioner)
प्री-कंडिशनिंगचे केसांवर होणारे फायदे
निरोगी आणि सिल्की राहण्यासाठी केस कंडिशन करणं खूप गरजेचं आहे. पण जर तुम्हाला शॅम्पू नंतर केस कंडिशनर करून चांगला फायदा होत नसेल तर तुम्ही प्री-कंडिशनिंगचा फायदा नक्कीच घेऊ शकता.
- प्री-कंडिशनिंग केल्यामुळे केस हायड्रेट राहण्यास मदत होते. ज्यामुळे केसांचा कोरडेपणा कमी होतो आणि केस नैसर्गिक पद्धतीने मऊ होतात.
- हिवाळ्याच्या काळात अथवा रूक्ष केसांवर प्री-कंडिशनर करणं फायदेशीर ठरू शकतं.
- ज्यांचे केस कुरळे आहेत अथवा फार गुंतणारे आहेत ज्यांनी प्री-कंडिशनिंग केल्यास केस मॅनेज करणं सोपं जातं.
- केसांना नैसर्गिक पद्धतीने चमकदार करायचं असेल तर केस प्री-कंडिशनिंग जरूर करा.
- ज्या लोकांना केस गळण्याचा खूप त्रास होतो त्यांनी प्री-कंडिशनिंग केल्यास केस गळणे नक्कीच कमी होते.
- केस कंडिशनिंग करताना कंडिशनर वीस मिनीटांपेक्षा जास्त वेळ केसांवर ठेवू नका
- प्री-कंडिशनिंगसाठी शक्य असल्यास नैसर्गिक कंडिशनरचा वापर करा. यासाठी वाचा घरी स्वतःच तयार करा तुमच्या केसांसाठी कंडिशनर (Homemade Hair Conditioner In Marathi)
- बाजारातील प्री-कंडिशनर केसांवर वापरण्यापूर्वी तुमच्या केसांचा प्रकारानुसार प्रॉडक्ट निवडा.
- कंडिशनर कधीच केसांच्या मुळांवर आणि स्काल्पवर लावू नका.