ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
lipstick shades

कपड्यांच्या रंगानुसार कोणती लिपस्टिक आहे तुमच्यासाठी परफेक्ट

आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की, लिपस्टिक आपला लुक एकदम बदलून टाकते. आजकाल बाजारामध्ये इतक्या लिपस्टिक उपलब्ध आहेत की, नक्की कोणत्या रंगाची लिपस्टिक (Lipstick) आपल्या कोणत्या रंगाच्या कपड्यांवर चांगली दिसेल आणि अधिक आकर्षक दिसेल हे समजतच नाही. त्यामुळे बऱ्याच महिला अशावेळी लाल रंगाची लिपस्टिक लावण्याला प्राधान्य देतात. पण प्रत्येक वेळी एकाच रंगाची लिपस्टिक लावणंदेखील कंटाळवाणे नक्कीच होते. तुम्हाला स्वतःलाही काहीतरी नाविन्य प्रत्येक गोष्टीत हवं असतं तसं ते लिपस्टिकच्या बाबतीत नको का? कोणत्या रंगाची लिपस्टिक लावायची यासाठी महत्त्वाची भूमिका असते ती तुम्ही घातलेल्या कपड्यांची अर्थात आऊटफिट्सची (Colorful Outfits). बऱ्याच महिला या आपण घातलेल्या कपड्यांप्रमाणे लिपस्टिक निवडतात. पण प्रत्येक वेळी कपड्यांच्या रंगाप्रमाणेच लिपस्टिक लावायला हवी असेही नाही. तुम्ही तुमच्या लुकमध्ये बदल करण्यासाठी अनेक रंगाच्या लिपस्टिक्सचा समावेश करून घेऊ शकता. या लिपस्टिक शेड (Lipstick Shades) कशा निवडायच्या जाणून घेऊया. 

काळ्या पांढऱ्या रंगाचे कपडे (Black and White Outfits)

कोणत्याही ठिकाणी जाताना काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे कपडे हे नेहमीच क्लासी लुक देतात. त्यामुळे तुम्ही या रंगाच्या कपड्यांवर लाल रंगापासून ते गुलाबी, ऑरेंज, कॉफी आणि न्यूड रंगाच्या कोणत्याही लिपस्टिक शेड्स वापरू शकता. काळ्या आणि पांढऱ्या रंगावर कोणत्याही शेड्सच्या लिपस्टिक तुम्ही बिनधास्त अप्लाय करू शकात. तुमचा लुक तितकाच क्लासी आणि अप्रतिम, आकर्षक दिसणार यात काहीही शंका नाही. 

पिवळ्या रंगाचे कपडे (Yellow Outfits)

पिवळ्या रंगामध्ये अनेक शेड्स आहेत. तुम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमांना पिवळ्या रंगाचे कपडे नक्कीच घालत असाल. तर या रंगाच्या कपड्यांसह तुम्हाला ऑरेंज रंगाची लिपस्टिक शेड अधिक चांगली आणि उठावदार दिसते. तुम्हाला ऑरेंज रंग आवडत नसेल तर त्याशिवाय तुम्ही गडद गुलाबी लिपस्टिक शेड्स अथवा राणी रंगाच्या लिपस्टिक शेड्सचा वापर करावा. तुमचा लुक अधिक आकर्षक दिसण्यासाठी तुम्हाला या लिपस्टिक शेडचा नक्कीच फायदा मिळतो. तुम्ही नेहमीच्या कपड्यांसाठी सटल लुक शोधत असाल तर तुम्ही त्यासाठी न्यूड रंगाच्या लिपस्टिकचा वापर करावा. 

हिरव्या रंगाचे कपडे (Green Colour Outfits)

तुम्ही नेहमीच्या वापरासाठी अथवा कोणत्याही पार्टीसाठी हिरव्या रंगाचे कपडे अथवा साडीची फॅशन करणार असाल, पण यावर नक्की कोणती लिपस्टिक लावायची याबाबत तुम्ही गोंधळात असाल तर हिरव्या रंगासह गुलाबी रंगाची लिपस्टिक अथवा गडद लाल रंगाची लिपस्टिक अधिक चांगली दिसते. तुम्ही गुलाबी आणि लाल रंगाच्या शेड्समधील कोणत्याही लिपस्टिकचा वापर या रंगासह करू शकता. फिका हिरवा रंग असल्यास तुम्ही गडद लिपस्टिक वापरावी. हे अधिक उठावदार दिसते. 

ADVERTISEMENT

निळ्या रंगाचे कपडे (Blue Colour Outfits)

भगवा आणि निळा रंग हे कॉम्प्लिमेंटर रंग आहेत. त्यामुळे एकमेकांसाठी हे परफेक्ट मानले जातात. त्यामुळे तुम्ही जर निळ्या रंगाचे कपडे घालणार असाल तर तुम्ही ऑरेंज शेड्समधील लिपस्टिकची निवड करा. त्याशिवाय तुम्ही अशी लिपस्टिक निवडा ज्यामध्ये ऑरेंज रंगाचा हलकासा टच असेल. तुम्हाला अजिबातच ऑरेंज रंग आवडत नसेल तर मात्र तुम्ही त्याऐवजी गुलाबी रंगातील एखाद्या शेडची निवड करावी. 

लाल रंगाचे कपडे (Red colour Outfits)

तुम्हाला बोल्ड आणि स्टायलिश लुक हवा असेल तर तुम्ही बोल्ड रेड लिप्स (bold red lips) चा वापर करावा. पण जर तुम्ही चेहऱ्यावरील अन्य मेकअप न्यूड ठेवावा याची काळजी घ्यावी. जेणेकरून तुमची लिपस्टिक अधिक आकर्षक दिसून येईल. तुम्ही लाल रंगाच्या कपड्यांचा लुक करत असाल तर तुम्ही न्यूड लिपस्टिकचा वापरही करू शकता. पण हा शेड तुमच्या स्किन टोनपेक्षा दोन शेड अधिक गडद असायला हवा ही बाब नक्की लक्षात ठेवा. 

इतर कोणत्याही रंगांवर त्या रंगानुसार तुम्ही चॉकलेटी, कॉफी अथवा अन्य रंगाचा वापर करू शकता. मात्र आपल्या वॉर्डरोबमध्ये शक्यतो याच रंगाचे कपडे जास्त असल्यामुळे आम्ही तुम्हाला या रंगाच्या हिशेबाने लिपस्टिकच्या शेडची कल्पना दिली आहे. तुम्हीही याचा वापर करून नक्की पाहा. तसंच तुम्ही आमच्या MyGlamm च्या संकेतस्थळावरूनही लिपस्टिकच्या शेड्सची निवड करू शकता. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
20 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT