आजकाल अनेक मुलींच्या एकाच पायात काळा धागा बांधलेला दिसून येतो. आपल्याकडे भारतात मुलांना नजर लागते असा समज आहे. पण खरंच सगळ्यांनी काळा धागा बांधणं योग्य आहे का? असाही प्रश्न पडतो. ज्योतिषशास्त्रानुसार, पायावर काळा धागा बांधल्याने येणारी संकटे नाहीशी होतात. पण हल्ली ही फॅशनही झाली आहे. महिलांसाठी ज्योतिषशास्त्रानुसार काळा धागा बांधणं हीच एक बाब नाही तर त्यांच्यासाठी ही फॅशनदेखील आहे. त्यामुळे अनेकदा अनेक महिला कोणत्याही माहितीशिवाय पायात काळा दोरा बांधतात. पण त्यामुळे त्यांना आयुष्यात अनेक संकटांचा सामनाही करावा लागू शकतो. काळा धागा योग्य वेळी आणि योग्य ठिकाणीच घालायला हवा असे ज्योतिषशास्त्रात मानण्यात येते. याबाबत अधिक माहिती घ्या जाणून
पायावर काळा दोरा (धागा) कधी बांधावा
काळा धागा अर्थात काळा दोरा हा शनि देवतेचे प्रतिनिधित्व करतो. आयुष्यात नकारात्मक शक्तीचा प्रभाव अथवा वाईट नजरेचा दोष दूर करण्यासाठी याचा वापर करण्यात येतो. हात, दंड अथवा पायावर हा काळा दोरा बांधण्यात येतो. तुम्ही जर पायात काळा दोरा बांधणार असाल, तर तुम्ही शनिवारच्या दिवशी शनिदेवाच्या मंदिरात जाऊन हा काळा दोरा बांधायला हवा.
कसा बांधावा काळा दोरा
काळा दोरा हा नजरेचा दोष आणि आयुष्यातील संकटे दूर करण्यासाठी बांधण्यात येतो. त्यामुळे कोणत्याही शनिवारी हा दोरा बांधावा. कोणताही काळा दोरा उचलून तुम्ही पायाला बांधू शकत नाही. मंदिरातील पुजाऱ्याकडून घेतलेला अभिमंत्रित काळा धागाच तुम्ही पायावर बांधावा. काळा धागा बांधण्यापूर्वी तुम्ही गायत्री मंत्राचा जप करावा असेही सांगण्यात येते. तर मुलींनी काळा दोरा पायाला बांधताना 7 गाठी माराव्यात आणि प्रत्येक गाठ बांधताना ॐ शनये नमः हा मंत्र जपावा. तर हा काळा धागा जेव्हा बदलायचा असेल तेव्हादेखील शनिवारच्या दिवशीच हा बदलावा. आपल्या पायातील पहिला काळा धागा हा वाहत्या पाण्यात सोडावा. एका वर्षात तुम्ही एक वेळ आपल्या पायातील काळा दोरा बदलू शकता.
कोणत्या पायात मुलींनी काळा धागा बांधावा
ज्योतिषशास्त्रानुसार, महिलांनी आणि मुलींनी डाव्या पायात काळा धागा बांधावा. वास्तविक महिलांचे डावे अंग हे शास्त्रामध्ये अशुभ मानण्यात येते. त्यामुळे मुलींनी नेहमी डाव्या पायावर काळा धागा बांधावा असे सांगण्यात येते.
पायात काळा दोरा बांधण्याचे फायदे
नजरेच्या दोषापासून वाचण्यासाठी सहसा काळा दोरा बांधण्यात येतो. पण नक्की कोणत्या नजरेपासून हा काळा दोरा तुम्हाला वाचवतो हे जाणून घ्या
- तुम्हाला सतत आर्थिक नुकसान होत असेल तर तुम्ही काळा दोरा पायात बांधावा
- तुमच्या लग्नात सतत अडचणी येत असतील अथवा वैवाहिक जीवनात सतत त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या पायात काळा धागा बांधावा
- तुम्हाला यश मिळण्यात उशीर होत असेल आणि मेहनत केल्यानंतरही त्याचा काहीही फायदा होत नसेल तर तुम्ही काळ्या दोऱ्याचा नक्की वापर करावा
- तुमच्या कुंडलीमध्ये राहू – केतू अथवा शनि हे ग्रह कमजोर असतील तर तुम्हाला काळा दोरा पायात बांधण्याचा नक्की फायदा होतो
टीप – आम्ही कोणत्याही अंधश्रद्धेला पाठिंबा देत नाही. मात्र ज्योतिषशास्त्र हा एक अभ्यास आहे आणि त्यामध्ये देण्यात आलेल्या काही गोष्टीनुसार ही माहिती आम्ही दिली आहे. यावर विश्वास ठेवणं अथवा न ठेवणं हा तुमचा स्वतःचा प्रश्न आहे याची नोंद घ्यावी.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक