मुलं लहान असताना विशेषत: अशा वयात ज्या वेळात त्यांना काय दुखत खुपत त्यांना सांगता येत नाही. त्यामुळे त्यांना नेमका कसला त्रास होतोय हे कळायला बरेचदा वेळ जातो. अशातच काही लहान मुलं झोपेतून अचानक रडत उठतात. त्यांचे रडणे इतके असते की, त्यांना काय झाले हे आपल्याला काही वेळ कळत नाही. आधीच झोपमोड आणि लहान बाळांचे रडणे यामुळे पालकांनाही गोंधळायला होतो. पण झोपेत लहान मुलं रडण्यामागे काही ठराविक कारण असू शकतात. त्यानुसार पालकांनी तयारी केली तर तुम्हाला त्रासही होणार नाही आणि मुलांना शांत करणेही सोपे जाईल.
नुकतीच गर्भधारणा झाली असेल तर अशी घ्या काळजी
पोटदुखी
अनेकदा मुलांना पोटात कळ येते. त्यांनी जे दिवसभरात खाल्ले असेल ते अन्नपदार्थ त्यांना पचले की नाही की त्यांच्या पोटात गॅस तयार होतो. लहान मुलांच्या पचनाची शक्ती थोडी मंदच होत असते. त्यातच जर त्यांनी काही जंक फूड किंवा चीझ, बटाटा, डाळी असे काही पदार्थ खाल्ले असतील तर त्यांना गॅस होऊ शकतो. लहान मुलं खूप जास्त पादतात. पण रात्री झोपेत असताना त्यांना पोटात होणारी हालचाल कळत नाही. त्यांना पोटातून हवा जाण्याची संकल्पना नसल्यामुळे त्यांना अचानक रडू कोसळते. पोटात गॅस झाला की, हवा ही हळुहळू पास होते. कधी कधी लहान बाळ पादल्यानंतर हसते याचे कारण त्याला बरे वाटत असते. त्यामुळे पोटदुखीचा त्रास होत असेल तरी देखील मुलं झोपेतही भोकाड पसरतात.
कानदुखी
वातावरणाचा त्रास लहान मुलांना पटकन होेतो. थंडी किंवा उष्णता वाढली की, कानदुखीचा त्रास अनेकांना बळावतो. अगदी तान्हे बाळ असेल किंवा थोडे बोबडे बोलणारे बाळही कानदुखीच्या त्रासाने त्रस्त असेल तर त्याला काय होते हे सांगता येत नाही. अशावेळी बाळ रडत राहते. त्यांना काय होते हे सांगता येत नाही. कानदुखी झाली की बाळ सतत रडत राहते. कानदुखीसाठी काही ड्रॉप्स तुम्ही डॉक्टरांकडून घेऊ शकता. कानदुखीमुळे डोक्यात जाणारी सणक कमी होण्यास मदत मिळते. त्यामुळे बाळाला त्रासही होत नाही. वातावरणात असा बदल झाला असेल. खूप प्रवास झाला असेल तरी देखील लहान मुलांना असा त्रास होऊ शकतो.
भूक लागणे
लहान मुलांना पोट भरले हे कधीही नीट सांगता येत नाही. कधी कधी ते झोपेत अचानक उठून रडू लागतात. कारण त्यांना खूप भूक लागलेली असते. अशावेळी त्यांना दूधाची बाटली तोंडात दिली की ते पुन्हा शांत होतात. बहुतेकदा लहान मुलांच्या रडण्यामागे त्यांना लागलेली भूक असू शकते. तुमचेही तान्हे बाळ कमी जेवत असेल तर तुम्ही अगदी नक्कीच त्याला वेळोवेळी खायला द्यायला हवे. एकाचवेळी त्यांना भरवण्यापेक्षा तुम्ही त्याला थोड्या वेळाने भरवा. दूधावर असलेल्या बाळांना आईचे दूध किंवा दुधाची बाटली देखील तयार ठेवा. म्हणजे लहान बाळांची चिडचिड होणार नाही.
लहान मुलांना अजिबात शिकवू नका असे चुकीचे शब्द
वाईट स्वप्न
आपल्या सगळ्यांनाच स्वप्न पडतात. लहान मुलांनाही खूप स्वप्न पडत असतात. काही स्वप्न त्यांना हसवतात. त्यांना काही स्वप्न पडली की हसू येते. तर काही स्वप्नांमुळे त्यांना रडू येते. अशावेळी मुलांना उठवून त्यांना पुन्हा थोपटल्यास ती शांत देखील होतात. जर मुलं स्वप्नातून अशा प्रकारे उठत असतील तर तुम्ही त्यांना झोपताना चांगल्या गोष्टी किंवा गाणी म्हणून दाखवा.
आता झोपेतून लहान मुलं अचानक उठून रडत असतील तर या काही गोष्टींचा त्रास त्यांना असू शकतो.