ADVERTISEMENT
home / Festival
गौरीपुजनात नववधूंसाठी का महत्त्वाचा असतो ‘ओवसा’

गौरीपुजनात नववधूंसाठी का महत्त्वाचा असतो ‘ओवसा’

गौरीगणपतीचा सण महाराष्ट्रात अगदी मोठ्या भक्तीभावात आणि उत्साहात साजरा केला जातो. गणेश चतुर्थीनंतर तिसऱ्या-चौथ्या दिवशी गौरी स्थापना केली जाते. गौरीला गणपतीच्या आईचे रूप मानले जाते. त्यामुळे शंकर भगवान, पार्वती माता आणि गणपती बाप्पा सहकुटुंब आपल्या घरी आल्याची भावना या प्रथेमागे दडलेली असते. त्यात गौराईला घरातील माहेरवाशिणीचे स्थान दिले जाते. ज्यामुळे तिचा पाहुणाचार त्याप्रमाणेच केला जातो. गाजत वाजत गौराईला घरी आणले जाते, गौरीला साडी नेसवली जाते, तिला नटवले जाते, गौरीची स्थापना आणि इतर तयारी घरातील माहेरवाशिणीच्या हातून केली जाते. काहींच्या घरी खड्यांची, तेरड्याची गौर बसवली जाते तर काहींकडे जेष्ठा-कनिष्ठा, महालक्ष्मींची पुजा केली जाते. कोकणातील काही भागात गौरीपुजनामध्ये ‘ओवसा’ ही एक परंपरा दिसून येते. ‘ओवसा’ म्हणजे ओवसणे अथवा ओवाळणे.  काही लोक ओवशाल्या ‘ववसा’ असंही म्हणतात. विशेषतः कोकणात रत्नागिरी, रायगडमधील काही प्रांतात ही पद्धत अगदी मोठ्या श्रद्धेने केली जाते. लग्नानंतरच्या ज्यावर्षी गौरी पुर्व नश्रत्रांंमध्ये येतात तेव्हा घरातील नववधूचा पहिला ओवसा करण्याची पद्धत आहे. लग्नानंतर एकदा हा विधी झाल्यावर ती प्रत्येकवर्षी गौरीसमोर तिचा ओवसा भरू शकते. जर लग्नानंतर पहिल्याच वर्षी ओवसा नाही झाला तर मग पुढील ज्या वर्षी  गौरी पुर्व नक्षत्रात येतात तोपर्यंत तिला ओवसा करण्याची वाट पाहावी लागते. म्हणूनच पहिला ओवसा हा प्रत्येक नववधूसाठी नक्कीच महत्त्वाचा असतो. शिवाय या विधीमधून घरात आलेल्या सुनेला मानसन्मान, आदर आणि तिच्या आवडीच्या भेटवस्तू देण्याची पद्धत आहे. ज्यामुळे लग्नानंतरचा पहिला ओवसा हा प्रत्येकीसाठी खासच असतो.

कसा असतो पहिला ‘ओवसा’

ओवशाला नववधू तिच्या माहेरची आणि सासरची काही ठराविक सुपं गौराईसमोर ओवासते. ही सुपं बांबूपासून तयार केलेली असतात. काहींच्या घरी पाच तर काहींच्या घरी दहा सुपांचा ओवसा असतो. या प्रत्येक सुपाला दोरा गुंडाळला जातो. हळदकुंकू लावले जाते. सुपात रानभाज्यांच्या पाने ठेवून मग त्यावर पाच प्रकारची फळे, सौभाग्यलेणी, पावसाळ्यात उपलब्ध असणाऱ्या भाज्या, सुकामेवा, धान्य आणि गौरीची ओटी ठेवली जाते. ही पाच अथवा दहा सुपे गौरीपुजनाच्या दिवशी नववधू गौराईला ओवसून तिची भक्तीभावाने ओटी भरते. त्यानंतर ही सुपं ती तिच्या माहेरच्या आणि सासरच्या मोठ्या मंडळींना देते. आई-वडील, सासू-सासरे, काका-काकू, मामा-मामी, दादा-वहिनी अशा घरातील मानाने मोठ्या असलेल्या मंडळींना ही सुपे दिली जातात. या सुपांच्या बदल्यात त्या नववधूला साडी, पैसे, सोने- चांदीच्या भेटवस्तू दिल्या जातात. या पद्धतींमुळे घरातील सुनेचे आणि माहेरवाशिणीचा मानसन्मान आणि कौतुक करण्याची पद्धत कोकणात आहे. 

ADVERTISEMENT

ओवसा प्रथेमागचं महत्त्व

गौरीला आदिशक्तीचे रुप मानले जाते. अशा शक्ती स्वरूप गौराईची ओटी भरून तिच्यासारखे सामर्थ्य मुली आणि सुनांना मिळावे यासाठी ही प्रथा केली जाते. गौराईची पुजा अर्चना करून तिच्याकडून आर्शिवाद घेण्यासाठी हा सण प्रत्येक नवीन लग्न झालेल्या सुनेसाठी फारच महत्त्वाचा मानला जातो. शिवाय सुप घरातील सुबत्तेचं लक्षण मानलं जातं. भरलेलं सुप देणं हे ऐश्वर्याचं आणि मांगल्याचं प्रतिक असतं. या निमित्ताने ही सुपे वाटताना  घरात आलेल्या नव्या सुनेला तिच्या घरातील थोरामोठ्यांची ओळख करून दिली जाते. मात्र आता काळानुरूप या प्रथेमध्ये अनेक बदल झाले आहेत. पारंपरिक पद्धतीने विणलेली सुपे आजकाल मिळत नाहीत. बाजारीकरणामुळे या सुपांची किंमत गौरी-गणपतीत फारच अधिक असते. ज्यामुळे ओवशातील सुपांचे प्रमाण आता हळूहळू कमी कमी होत चालले आहे. शिवाय आता महिला नोकरी-व्यवसाय करणाऱ्या असणाऱ्या असल्यामुळे त्यांना सुपे वाटण्यासाठी पुरेसा वेळ देणं शक्य होत नाही. त्यामुळे थोडक्यात आणि अगदी परंपरेपुरती ही प्रथा सध्या पाळण्यात येते. वास्तिविक  प्रथा अथवा परंपरा कोणतीही असो मात्र ती करण्यामागचं  मुळ उद्दीष्ट लक्षात  ठेवून ती केल्यास त्यातून खरा आनंद मिळू शकतो. 

फोटोसौजन्य – इन्साग्राम

अधिक वाचा

#POPxoMarathiBappa : अंबानींकडे गणपतीचं जंगी सेलिब्रेशन

ADVERTISEMENT

गणपतीसाठी वेगळ्या आणि सोप्या Modak Recipes

अष्टविनायकाची महत्त्वपूर्ण माहिती जाणून घ्या

04 Sep 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT