लहानपणी जर तुम्ही चुकून पातेलं, कढई अथवा तव्यावरील एखादा पदार्थ तसाच खाल्ला तर आई लगेच ओरडायची. अन्न शिजवलेल्या भांड्यात खाऊ नये असं सांगायची. मात्र असं का करू नये याचं शास्त्रीय कारण न देता तुम्हाला “शास्त्र असतं ते” असं सांगून पटवण्यात यायचं. काही जणांच्या घरी असं केल्याने आर्थिक संकट येतं असंही सांगितलं जायचं. असं सांगितल्यावर पुन्हा कढईत अथवा पातेल्यात खाण्याचं धाडस तुम्ही करणार नाही हे घरच्यांना माहीत असायचं. पण असं असलं तरी जर तुम्हाला फिट राहायचं असेल, आरोग्य नीट राहावं असं वाटत असेल तर चुकूनही अन्न शिजवलेल्या भांड्यात खाऊ नका. एखाद्या काल्पनिक कारणांपेक्षा एखादं तर्कशुद्ध कारण सांगितलं तर लहान मूल असो वा मोठी माणसं सर्वांना ते पटतं. यासाठीच जाणून घ्या अन्न शिजवलेल्या भांड्यात का खाऊ नये. तसंच वाचा आरोग्यदायी टिप्स मराठी | Health Tips In Marathi, सोप्या आणि उपयुक्त किचन टिप्स मराठी | Kitchen Tips In Marathi
अन्न शिजवलेली भांडी असतात चिकट
अन्न शिजवताना तेल, तिखट भरपूर प्रमाणात वापरण्यात येतं. ज्यामुळे पदार्थ रूचकर आणि चविष्ट होतात. पण असं करताना कढई, तवा अथवा पातेल्याच्या तळाशी त्या पदार्थांमधील तिखट तेल जमा होतं. अन्नपदार्थ संपल्यावरही ते तेल तळाशी तसंच राहतं. त्यामुळे जर एखाद्याने भांडे रिकामं झालं आहे म्हणून कढई अथवा तव्यात जेवण केलं तर ते सर्व तेल त्या व्यक्तीच्या पोटात जातं. आरोग्यासाठी हे मुळीच योग्य नाही. यामुळे अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.
अन्नसंस्कार
अन्न शिजवण्याची आणि जेवणाची एक पद्धत पूर्वजांनी घालून दिलेली आहे. अन्न शिजवणं आणि खाणं या केवळ साध्या क्रिया नसून शरीरावर केला जाणारा संस्कार आहे. त्यामुळे अन्न शिजवण्याची भांडी वेगळी आणि जेवणाची पाने, वाट्या, चमचे वेगळे असणं हे सभ्यतेचं लक्षण समजलं जातं. घरात असो वा समाजात आपण सभ्यतेने वागण्यासाठी घालून दिलेले हे संस्कार प्रत्येकाने सांभाळायला हवेत. म्हणून कधीच अन्न शिजवलेल्या भांड्यात जेवू नये.
पोटाचे आरोग्य बिघडू शकते
अन्न शिजवण्याची भांडी खूप चिकट असतात. त्यामुळे ती स्वच्छ करण्यासाठी जास्त साबणाची गरज लागते.पूर्वीच्या काळी चुलीतील राखेने भांडी स्वच्छ केली जात असत. चांगली स्वच्छ केल्यावरही कधी कधी अशा भांड्यांना काही अंश राखेचा अथवा साबणाचा राहत अते. अशा भांड्यात जेवल्यास तो साबण, राखेचा अंश पोटात जाऊन तुमचे पोट बिघडण्याची शक्यता वाढू शकते. यासाठी पूर्वीपासून मोठी माणसं अन्न शिजवलेल्या भांड्यात खाऊ नये असं सांगत असत.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक