ADVERTISEMENT
home / आरोग्य
यासाठी नियमित प्यायला हवा भेंडीचा रस, जाणून घ्या फायदे

यासाठी नियमित प्यायला हवा भेंडीचा रस, जाणून घ्या फायदे

भेंडीची भाजी पाहिल्यावर काहींना भुक लागते तर काहीजण नाक मुरडतात. कारण प्रत्येकाची आवडीची भाजी निरनिराळी असते. पण भेंडी खाणं चवीपेक्षा आरोग्यासाठी चांगलं असतं. यासाठीच अनेक आहारतज्ञ्ज भेंडीचा रस पिण्याचा सल्ला देतात. भेंडीच्या भाजीपेक्षा भेंडींचा रस पिण्याने तुम्हाला जास्त चांगला फायदा मिळु शकतो. कारण भेंडीच्या  रसात भेंडीच्या भाजीतील सर्व पोषक गुणधर्म असतात. यासाठीच जाणून घ्या भेंडीचा रस पिण्याचे फायदे

भेंडीचा रस पिण्याचे फायदे

निरोगी राहण्यासाठी व्यायामासोबतच आहारावरही लक्ष केंद्रित करणं गरजेंच आहे. नियमित फ्रेश आणि उत्साही राहण्यासाठी तुम्हाला भेंडीचा रस पिणे फायद्याचे ठरेल.

अशक्तपणा दूर होतो –

ज्यांच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी होते त्यांना अशक्तपणा अथवा अॅनिमियाचा त्रास होतो. शरीरात लोह, हिमोग्लोबिन आणि इतर पोषक घटक कमी होतात. यासाठीच अशा लोकांनी आहारात भेंडीचा समावेश करायला हवा. भेंडीचा रस नियमित पिण्यामुळे अशक्तपणा कमी होऊ शकतो. कारण भेंडीमध्ये व्हिटॅमिन्स, लोह आणि फोलेट असते. ज्यामुळे तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढते आणि लाल रक्त पेशी वाढण्यास मदत होते. 

ADVERTISEMENT

instagram

मधुमेह नियंत्रित राहतो –

जर तुम्ही मधुमेही असाल तर तुम्ही भेंडीचा रस पिणे गरजेचं आहे. कारण एका संशोधनानुसार भेंडीमध्ये अॅंटि ऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. जेव्हा तुम्ही ताणतणावात अशतात तेव्हा तुमच्या शरीरात इन्सुलीनची निर्मिती वाढण्याची शक्यता असते. शिवाय आजकालच्या धकाधकीच्या जीवनात सतत ताणतणावाला सामोरे जावे लागते. यासाठीच नियमित भेंडीचा रस पिऊन तुम्ही तुमची इन्सुलीनची पातळी नियंत्रित ठेवू शकता.

बद्धकोष्ठता कमी होते –

आजकाल खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि वेळ यामुळे अनेकांना बद्धकोष्ठतेचा त्रास खूप जाणवतो. पोट साफ नसेल तर त्यामुळे अनेक आरोग्य समस्या निर्माण  होतात. यासाठी दिवसभरात पोटाची स्वच्छता राखणं गरजेचं आहे. भेंडीच्या अर्कामध्ये  बद्धकोष्ठता कमी  करणारे गुणधर्म असतात. यातील फायबर्समुळे तुमचे पोट लवकर स्वच्छ होते. यासाठीच अशी समस्या असलेल्या लोकांनी दररोज सकाळी उठल्यावर एक कप भेंडीचा रस प्यावा. 

प्रतिकार शक्ती वाढते –

आजारपणापासून वाचण्यासाठी तुमची प्रतिकार शक्ती मजबूत असणं गरजेचं आहे.  मात्र यासाठी नियमित व्यायाम आणि योग्य जीवनशैलीसह तुम्ही कोणता आहार घेता यावर लक्ष द्यायला हवं. प्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी भेंडीचा रस नियमित घेणे नक्कीच फायद्याचे ठरेल. कारण भेंडीमध्ये आजारपण दूर ठेवणारे अॅंटि ऑक्सिडंट असतात.

ADVERTISEMENT

हाडांना बळकटी मिळते –

भेंडीमध्ये व्हिटॅमिन्स असतात. यातील के व्हिटॅमिनमुळे तुमची हाडे मजबूत आणि बळकट होतात. के व्हिटॅमिनमुळे तुमच्या हाडांना अन्नातील कॅल्शिअम शोषून घेण्याचे प्रोत्साहन मिळते. यासाठीच जर सतत तुमचे सांधे दुखत असतील अथवा हाडांच्या समस्या असतील तर दररोज भेंडीचा रस न चुकता प्या.

त्वचा चमकदार होते –

भेंडीचा रस तुमच्या आरोग्याप्रमाणेच तुमच्या त्वचेसाठईदेखील फायदेशीर ठरतो. कारण यातील अॅंटि ऑक्सिडंटमुळे तुमच्या त्वचेच्या पेशींची पुर्ननिर्मिती लवकर होते. सहाजिकच त्वचेवरील डेड स्किन निघून नवीन त्वचा पेशी निर्माण झाल्यामुळे तुमची त्वचा चमकदार आणि टवटवीत दिसते. 

instagram

ADVERTISEMENT

भेंडीचा रस कसा बनवाल

भेंडीचा रस तुम्ही नियमित तुमच्या घरी बनवू शकता. यासाठी तुम्हाला फक्त घरात ताजी आणि कोवळी भेंडी आणण्याची गरज आहे.

साहित्य –

  • तीन ते चार भेंडी
  • एक कप पाणी

भेंडीचा रस बनवण्याची पद्धत –

  • भेंडी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या
  • तिच्या दोन्ही टोकाकडील देठ आणि शेंडा काढून टाका
  • भेंडीचे मध्यभागी चिरून दोन भाग करा
  • एक कप पाण्यात भेंडीचे तुकडे मिक्सरमध्ये बारीक करा
  • तयार ज्युस तुम्ही न गाळता पिऊ शकता.

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

भेंडीची खाण्यामुळे होतील हे अफलातून फायदे

त्वचेसाठी उपयुक्त आहे भेंडी,असा तयार करा होममेड फेसपॅक

मधुमेहींनी यासाठी खायला हवी अळकुडीची भाजी

ADVERTISEMENT
23 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT