भेंडीची खाण्यामुळे होतील हे अफलातून फायदे

भेंडीची खाण्यामुळे होतील हे अफलातून फायदे

भेंडीची भाजी अनेकांची आवडती भाजी असते. ज्यामुळे ते कधीही भेंडीची भाजी खायला तयार असतात. अगदी रोजही भेंडीची भाजी काही लोक खाऊ शकतात. मात्र ज्यांना भेंडीची भाजी खायला आवडत नाही त्यांची तऱ्हा जरा निराळीच असते. कारण भेंडीच्या भाजीच्या नावाचीच त्यांना अॅलर्जी असते. तुम्हाला भेंडीची भाजी आवडो अथवा न आवडो पण या भाजीचे आरोग्यावर फार चांगले परिणाम होतात. भेंडीची भाजी निरनिराळ्या पद्धतीने बनवली जाते. भेंडी स्वच्छ धुवून, ती नीट पुसून, निरनिराळ्या पद्धतीने भेंडीची भाजी केली जाते. कुणी भरली भेंडी करतं तर कुणी भेंडी चांगली परतून भाजी करतं. कोणाला तळलेली कुरकुरीत भेंडी आवडतात तर कोणाला बार्बेक्यु केलेली भेंडी आवतात. तुम्ही भाजी कशीही खाल्ली तरी त्याचे चांगलेच परिणाम शरीरावर होतात. मात्र जर पहिल्यांदाच भेंडीची भाजी करणार असाल तर  घरातील मोठयांची मदर जरूर घ्या. कारण भेंडी नीट पुसून चिरली नाही तर भाजी ती गिळगिळीत होते.

भेंडीच्या भाजीचे आरोग्यावर होणारे फायदे -

भेंडीच्या भाजीत व्हिटॅमिन ए, सी आणि बी असतं. शिवाय त्यातून तुमच्या शरीराला पुरेसं कॅल्शियम, लोह, प्रोटिन, मॅग्नेशिअम, अॅंटिऑक्सिडंट, फॉलिक अॅसिड, फायबरही मिळतं. म्हणूनच निरोगी राहण्यासाठी आहारात भेंडीच्या भाजीचा समावेश जरूर करा. 

Shutterstock

पचनसंस्था सुधारते -

आजकालच्या धावपळीच्या काळात सर्वांच्याच आहारात जंकफूड आणि अपथ्यकारक पदार्थांचा समावेळ हळूहळू वाढू लागला आहे. मात्र त्यामुळे तुमच्या पचनसंस्थेवर त्याचा दुष्परिणाम दिसून येतो. जर तुम्हाला सतत अॅसिडिटी, पोट दुखीचा त्रास असेल तर आठवड्यातून एक दोनवेळा भेंडीची भाजी जरूर खा. कारण या भाजीत पुरेसे फायबर आहेत. ज्यामुळे तुमची पचनसंस्था नक्कीच सुधारते.

ह्रदयाच्या विकारांपासून बचाव होतो -

आजकाल तेलकट आणि अयोग्य पदार्थ खाण्यामुळे शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. ज्यामुळे भविष्यात ह्रदयविकार होण्याचा धोका निर्माण होतो. मात्र भेंडीमधील फायबर्स या कोलेस्ट्रॉलला नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. शिवाय यातील मॅग्नेशियममुळे तुमचा रक्तदाबही नियंत्रणात राहतो. 

कर्करोगाचा धोका कमी होतो -

आजकाल कर्करोगाच्या आजाराचे प्रमाण वाढत आहे. ज्यामुळे या रोगापासून आपला बचाव करण्याची नक्कीच गरज आहे. भेंडीच्या भाजीत लॅक्टिन नावाचे एक प्रोटिन असते. काही संशोधनात असं आढळून आलं आहे की या प्रोटिनमुळे ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशी कमी होण्यास मदत होते. शिवाय यातील फोल्वाइटमुळे तुम्हाला इतर काही प्रकारचा कर्करोग होण्याचा धोका कमी होऊ शकतो.

मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते -

एका जागतिक संधोधनानुसार आजकाल प्रत्येक दहा माणसांमधील तीन माणसांना मधुमेह हा आजार असल्याचे प्रमाण आढळून आले आहे. भारतात मधुमेहाचे प्रमाण सर्वात जास्त आहे. म्हणूनच जर मधुमेहींनी नियमित भेंडीच्या भाजीचा आहारात समावेश केला तर त्यांच्या रक्तातील साखर नक्कीच नियंत्रणात राहू शकते. 

अस्थमाचा त्रास कमी होतो -

संशोधनात असं आढळलं आहे की ज्या लोकांच्या आहारात व्हिटॅमिन सीचा वापर अधिक असतो त्या लोकांना अस्थमाचा त्रास होण्याचा धोका कमी असतो. म्हणून आहारात व्हिटॅमिन सीयुक्त भेंडीच्या भाजीचा समावेश करा. 

रोगप्रतिकार शक्ती वाढते -

भेंडीच्या भाजीत असलेल्या व्हिटॅमिन के मुळे तुमची हाडे तर मजबूत होतातच शिवाय तुमची रोगप्रतिकारशक्तीही वाढते. भेंडीची भाजी खाण्यामुळे शरीरातील हाडे आणि सांधे बळकट होतात.

किडनी विकारापासून बचाव होतो -

ज्या लोकांच्या आहारात नियमित भेंडीची भाजी असते त्यांना किडनी विकार कमी होतात असं एका संशोधनात आढळलं आहे. वास्तविक किडनी विकाराचं महत्त्वाचं कारण मधुमेह असणं  हे आहे. मात्र भेंडीच्या भाजीमुळे तुमचा मधुमेह नियंत्रित राहतो आणि किडनी विकार दूर राहतात.

गरोदरपणात फायदेशीर -

गरोदरपणात  बाळाच्या वाढ,विकासासाठी तुमच्या शरीराराल पुरेशा फॉलेटची गरज असते. ज्यामुळे तुमचे शरीर अशक्त होत नाही आणि बाळाचे पोषण होते. भेंडीच्या भाजीत असलेल्या पोषक घटकांचा तुम्हाला गरोदरपणात नक्कीच फायदा होतो. 

दृष्टी सुधारते -

भेंडीच्या भाजीत व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटिन हे दोन महत्त्वाचे पोषक पदार्थ असतात. ज्याची तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी गरज असते. भेंडी खाणाऱ्या लोकांना दृष्टी दोष कमी प्रमाणात होतात. 

मासिक पाळीचा त्रास कमी होतो -

मासिक पाळीच्या काळात बऱ्याचजणींना पोट आणि कंबरेतून वेदना होणे,  अपचन, अस्वस्थता, मळमळ, अशक्तपणा, अती रक्तस्त्राव असा त्रास होतो. जर तुम्हाला या सर्व समस्यांपासून आराम हवा असेल तर या काळात भेंडीची भाजी जरूर खा. कारण या भाजीतून तुमच्या शरीराला पुरेसे पोषक घटक मिळतात. ज्यांची तुमच्या शरीराला या काळात जास्त गरज असते. 

मायग्रेनचा त्रास कमी होतो -

मायग्रेन ही अशी एक आरोग्य समस्या आहे ज्यामुळे तुमचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ शकते. अचानक सुरू होणाऱ्या त्रासाला वेळीच बरं करण्यासाठी भेंडीची भाजी खायला सुरूवात करा. ज्याचा तुम्हाला भविष्यात  चांगला परिणाम नक्कीच दिसून येईल. 

नैराश्यावर मात करता येते -

भेंडीच्या भाजीत मोठ्या प्रमाणावर मॅग्नेशिअम आणि अमिनो अॅसिड असते. ज्याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होतो. 

एवढंच नाही तर भेंडीच्या भाजीचे तुमच्या त्वचा आणि केसांवरही अनेक चांगले फायदे दिसून येतात. म्हणूनच आजपासूनच भेंडीची भाजी खायला सुरूवात करा.

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक

हे ही वाचा -

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा -

डाएटमध्ये असतील असे चमचमीत पदार्थ तर जंक फूड खाण्याचा होणार नाही मोह

फॅटी लिव्हरचा त्रास, तुमच्या आयुष्याचा करेल घात

या' कारणांमुळे लागते उचकी