ADVERTISEMENT
home / निरोगी जीवन
रात्री अचानक का जाणवते दातदुखी, जाणून घ्या कारण

रात्री अचानक का जाणवते दातदुखी, जाणून घ्या कारण

दातदुखी हा सर्वात भयंकर दुखण्याचा प्रकार आहे. कारण एकदा का दात दुखू लागला की माणसाला काहीच सुचत नाही. दात दुखण्याची कारणे अनेक असू शकतात. सतत अती थंड अथवा अती गरम पदार्थ खाणे, दातांची अस्वच्छता, कॅल्शिअमची कमतरता, तोंडात इनफेक्शन होणे, सायनस, अक्कलदात काढणे अशा अनेक कारणांमुळे तुमचे दात दुखू शकतात. मात्र बऱ्यादचा दात दुखी ही रात्री- अपरात्री जाणवते. यासाठी जाणून घ्या रात्री अचानक दात दुखण्याचे कारण आणि त्यावर काय उपाय करावे. 

रात्री अचानक का दुखतात दात

जर तुम्ही बऱ्याचदा दातदुखीचा अनुभव घेतला असेल तर तुमच्या लक्षात येईल की दात दुखी नेहमी संध्याकाळी, रात्री अथवा मध्यरात्री जाणवते. तसं पाहायला दिवसभर तुमचा दात दुखत असतो मात्र संध्याकाळ झाली की तुमचे दात दुखणे तीव्र स्वरूप धारण करते. यामागे अनेक शास्त्रीय कारणे आहे. यासाठीच जाणून घ्या तुमची दात दुखी संध्याकाळी अथवा रात्रीच का सुरू होते.

  • दात रात्री दुखू लागण्याचे महत्त्वाचे कारण तुमची झोपण्याची स्थिती असू शकते. कारण रात्री तुम्ही आडवे झोपता अशा स्थितीत झोपण्यामुळे तुमचा रक्तप्रवाह तुमच्या डोक्याच्या दिशेने होतो. सहाजिकच रक्तप्रवाह वाढल्यामुळे तुमच्या दातांवर जास्त दाब येतो. दात संवेदनशील झालेले असल्यामुळे त्यांना हा दाब सहन होत नाही. सहाजिकच उभे असताना अथवा बसलेले असताना तुमचे दात फार दुखत नाहीत मात्र रात्री झोपल्यावर दातांमधून भयंकर वेदना जाणवतात.
  • दात रात्री दुखण्याचं आणखी एक कारण म्हणजे रात्री आपलं शरीर जास्त संवेदनशील झालेलं असतं. सहाजिकच शरीरात होणारे साधे बदलही रात्री पटकन जाणवतात. या काळात मेंदूला शांतता आणि झोप हवी असते पण दातदुखीमुळे तुमची झोपमोड होते आणि दातदुखीवर जास्त लक्ष केंद्रित होते.
  • रात्रीच्या वेळी भरपूर जेवणे आणि जेवणानंतर गोड खाण्याची अनेकांना सवय असते. सहाजिकच गोड पदार्थांचे  कण दातात अडकून बसतात आणि रात्री  त्यामुळे तुमचे  दात दुखू लागतात
  • रात्री दात दुखण्याचे आणखी एक कारण म्हणजे काही लोकांना रात्री झोपेत दात चावण्याची सवय असते. या सवयीमुळे त्यांचे दात रात्री दुखू लागतात. 

रात्री अचानक दात दुखू लागला तर काय करावे

जर तुमचे संध्याकाळी उशीरा अथवा रात्री दात दुखू लागले तर तुम्ही डेंटिस्टकडे पटकन जाऊ शकत नाही. अशा वेळी तुम्हाला काही तरी घरगुती उपाय करूनच रात्री दाताचे दुखणे कमी करावे लागते. यासाठी हे काही घरगुती उपाय जरूर ट्राय करा. 

  • रात्री अचानक दात दुखू लागले तर मीठाच्या पाण्याने गुळण्या करा ज्यामुळे तुमच्या दात आणि दाढांमध्ये अडकलेले अन्नाचे कण, जीवजंतू  बाहेर टाकले जातील.
  • दात दुखत असलेल्या जागी तुम्ही लवंग अथवा  लवंग तेल लावू शकता. कारण लवंगमध्ये युजेनॉल नावाचा घटक असतो ज्यामुळे तुमच्या वेदना पटकन कमी होतात. कापसाच्या बोळ्यामध्ये लवंग तेल टाकून दातात ठेवा अथवा लवंग भिजवून ती दाताखाली ठेवा. 
  • रात्रीच्या वेळी तुमच्याजवळ कोणताच मार्ग नसेल तर घरातील पु्दिन्याची पाने चावून खा. पुदिना अॅंटि बॅक्टेरिअल असल्यामुळे तुमच्या दातातील वेदना पटकन कमी होतील.
  • रात्री दात दुखी कमी करण्यासाठी तुम्ही तोंड आणि जबड्यावर बर्फाने मसाज करू शकता. कोल्ड कंप्रेसमुळे तुमच्या दाताजवळील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि तुमचे दात काही काळ बधीर झाल्यामुळे वेदना कमी होतात. 
  • झोपेत दात दुखू  लागले तर डोकं जास्तीत जास्त वर राहिल अशा स्थितीत झोपा. ज्यामुशे डोक्याकडील रक्त प्रवाह वाढणा नाही आणि तुमचे दात दुखणार नाहीत.
  • मात्र लक्षात ठेवा हे सर्व उपाय काही काळासाठी आणि तात्पुरते आहेत. त्यामुळे लवकरात लवकर तुमच्या डेटिंस्टची भेट घ्या आणि तुमच्या दातांवर योग्य उपचार करा. 

फोटोसौजन्य – Pexels

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

का कीडतात लहान मुलांचे दुधाचे दात, करा हे उपाय

बाळाला दात येत असतील तर अशी घ्या त्याची काळजी

जाणून घ्या दात पांढरे करण्याचे उपाय (Teeth Whitening At Home In Marathi)

ADVERTISEMENT
13 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT