हिवाळा सुरू झाला की वातावरणात अचानक थंडावा वाढतो. वातावरणातील गारवा, थंड वारा यामुळे नियमित अंघोळ करणे, केस धुणे याचे प्रमाण नेहमीपेक्षा कमी होते. शिवाय वातावरणातील कोरडेपणाचा परिणाम तुमच्या त्वचा आणि केसांवर होतो आणि ते रूक्ष आणि निस्तेज दिसू लागतात. हिवाळ्यात तुमचे केस वाढणे तर दूरच उलट सतत गळू लागतात. या आणि अशा अनेक कारणांमुळे हिवाळ्यात केसांची वाढ खुंटते आणि केस अशक्त, कमजोर होतात. मात्र जर तुम्ही नियमित केसांची योग्य काळजी घेतली आणि हिवाळ्यातील हेअर केअर टिप्स नियमित पाळल्या तर तुमचे केस गळणे नक्कीच कमी होते. यासाठी फॉलो करा या सोप्या विंटर हेअर केअर टिप्स (Winter Hair care tips)
हिवाळ्यात केस धुण्यासाठी तुम्ही कोणते पाणी वापरता
हिवाळा सुरू झाला की अंग शेकवण्यासाठी बऱ्याच लोकांना खूप गरम पाण्याने अंघोळ करण्याची सवय असते. मात्र लक्षात ठेवा त्वचा आणि केसांसाठी असे कडक गरम पाणी नुकसानकारक ठरते. यासाठीच अगदीच थंड अथवा सामान्य तापमानाच्या पाण्याने अंघोळ करायची नसेल तर कमीत कमी या काळात कोमट पाण्याने अंघोळ करा आणि केस धुवा. कारण अती गरम पाण्याने तुम्हाला काही काळ बरं वाटेल पण त्यामुळे तुमच्या त्वचेची छिद्रे मोकळी होतील आणि केसांच्या मुळांचे नुकसान होईल. ज्यामुळे केस गळणे थांबवणे मग तुमच्या हाताबाहेर जाईल.
केस सिल्की करण्यासाठी घरगुती उपाय (Silky Hair Tips In Marathi)
हिवाळ्यात केसांची अशी घ्या काळजी
केस धुण्यासोबत काही गोष्टींचा काळजी घेतली तर हिवाळ्यातही तुमचे केस गळणे थांबू शकते.
- केसांना नियमित कोमट तेलाने मालिश करा. केसांना तेल लावणं हिवाळ्यात खूप गरजेचं आहे. कारण त्यामुळे केसांचे योग्य पोषण होते आणि मजबूत झाल्यामुळे केस गळत नाहीत.
- केस धुताना जास्त वेळ केसांवर शॅंपू ठेवू नका. कारण यामुळे हेअर वॉशसोबत तुमच्या केसांमधील सीबम निघून जाते.
- हेअर वॉश केल्यावर केसांना कंडिश्नर करायला मुळीच विसरू नका. कारण या काळात केसांना पोषण आणि मऊपणाची जास्त गरज असते. केस सरळ करण्यासाठी घरगुती उपाय (Kes Saral Karnyasathi Upay)
- केस धुतल्यावर ते टॉवेलने घासून पुसू नका. कारण मुळातच या काळात केसांची मुळे कमजोर झालेली असतात. असं केल्यामुळे केस जास्त गळतात.
- केसांना हेअर सीरम लावण्यास विसरू नका. कारण त्यामुळे केसांचे वातावरणातील अचानक होणाऱ्या बदलापासून संरक्षण होते.
- केस आठवड्यातून कमीत कमी दोनदा धुवा. कारण अस्वच्छतेमुळे केसांमध्ये कोंडा होऊन केस गळणे वाढू शकते.
- केस सतत घट्ट बांधून ठेवू नका यामुळेही केस गळणे वाढू शकते.
- केसांना उष्णता देणारी उपकरणे जसे की स्ट्रेटनर, ड्रायर कमी प्रमाणात वापरा.
आयुर्वेदिक पद्धतीने घ्या केसांची काळजी (Ayurvedic Hair Care Tips In Marathi)