ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
#MeToo प्रकरणात नानाविरोधात साक्ष गोळा करण्यात तनुश्री अपयशी

#MeToo प्रकरणात नानाविरोधात साक्ष गोळा करण्यात तनुश्री अपयशी

भारतात #MeToo प्रकरणाची मुहुर्तमेढ रोवणाऱ्या तनुश्री दत्ता समोर आता या प्रकरणी नव्या अडचणी येण्याची शक्यता आहे. कारण नाना पाटेकर विरोधात तनुश्री एकही सबळ पुरावा सादर करु शकली नाही, असे पोलिसांनी सांगितले आहे.  7 महिन्यापूर्वी तनुश्रीने नानाविरोधात ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल केल्यापासून आज पर्यंत त्या दिवशी तनुश्रीसोबत काय घडले? हे सांगणारा एकही सबळ पुरावा सादर न झाल्यामुळेच तनुश्री या प्रकरणी अपयशी ठरली असे म्हणावे लागेल.

साक्षीदारही फिरले?

10 वर्षांपूर्वी झालेल्या अन्यायासाठी तनुश्रीने 2018 साली आवाज उठवला. सेटवर तिच्यासोबत झालेल्या असभ्यवर्तनाबाबत तिने मिडियाला इंटरव्ह्यू दिले. तिने नाना पाटेकरवर आरोप देखील केला. तिच्या बाजूने सबंध इंडस्ट्री उभी राहिली. पण प्रत्यक्षात ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये जबाब नोंदवताना साक्षीदारांनाही त्या दिवशी घडलेली घटना नीट आठवत नाही. यामध्ये प्रामुख्याने नाव होते डेझी शहाचे.. ती या सेटवर असिस्टंट कोरिओग्राफर होती. तिने देखील त्या दिवशी काय झाले हे मला स्पष्ट आठवत नाही असे सांगितले. शिवाय इतर 15 साक्षीदारांनीही अशाच पद्धतीचा जवाब नोंदवला आहे. त्यामुळे तनुश्रीने नानावर केलेले आरोप सिद्ध होऊ शकत नाही अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

कान्समध्ये फडकणार मराठी पताका

साक्षीदार नानाचे मित्र

t

ADVERTISEMENT

नानावरील आरोप सिद्ध होत नाही तोच तनुश्री मात्र साक्षीदार हे नानाचे मित्र असल्यामुळे साक्ष द्यायला पुढे येणार नाहीत असे म्हणाली आहे. सत्य बाहेर आणण्यासाठी मला साक्षीदारांची काहीच गरज नाही. माझ्यावर लैंगिक अत्याचार झाला आहे आणि मी तो कितीही अडचणी आल्या तरी सिद्ध करेन, असे तिने एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.

फिल्मी करिअरमधून घेतला अनुष्काने संन्यास

तपासात येत आहेत अडचणी

ओशिवरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटना जुनी आहे. त्यामुळे लोकांना त्या दिवशी काय झाले हे आठवत नाही. त्यामुळे साक्षीदारांच्या साक्षी नोंदवताना नानांवरील आरोप सिद्ध होत नाही. आतापर्यंत 12 ते 15 जणांनी साक्ष नोंदवल्या आहेत. सात महिन्यांपासून यावर काम सुरु आहे. पण ठोस पुरावा असा हाती लागलेला नाही

सैफला पद्मश्री पुरस्कार करायचा होता परत पण नेमकं काय घडलं.. जाणून घ्या

ADVERTISEMENT

नेमंक प्रकरण काय?

metoo

2008 साली ‘Horn ok please’ या चित्रपटाच्या सेटवरील एक आयटम साँग शूट करताना को स्टार नाना पाटेकर याने तिला असभ्य पद्धतीने हात लावला. त्यानंतर चिडलेली तनुश्री शूट सोडून व्हॅनेटीमध्ये जाऊन बसली. शूट पूर्ण करण्यासाठी तिला विनवणी करण्यात आली. पण ती पुन्हा सेटवर गेली नाही. त्यावेळी नाना पाटेकर यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन मला नेमकं काय झालं ते माहीत नाही? पण ती अचानक सेटवरुन निघून गेली. ती असे आरोप का करत आहे हे देखील मला कळत नाही, असे नाना पाटेकर यांनी 2008 सालीच स्पष्ट केले होते. त्यानंतर तब्बल 10 वर्षांनी तिने पुन्हा हा वाद उकरुन काढला. तिने #MeToo चळवळ सुरु केली. या नंतर बी टाऊनमध्ये घडलेल्यां अनेक अभिनेत्रींनी त्यांची आपबीती सांगितली. तनुश्रीने उचलेले पाऊल अनेक जणांसाठी प्रेरणा बनले. पण ती आतापर्यंत नाना पाटेकर यांच्यावरील आरोप सिद्ध करु शकली नाही.

(सौजन्य- Instagram)

15 May 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT