खरंच का अनुष्का शर्माने घेतला फिल्मी करियरमधून संन्यास

खरंच का अनुष्का शर्माने घेतला फिल्मी करियरमधून संन्यास

एखाद्या अभिनेत्रीचं लग्न झालं आणि ती बरेच दिवस एखाद्या चित्रपटात दिसली नाही की, चर्चा रंगते ती तिच्या प्रेग्नसीची किंवा तिच्या करिअरमधून संन्यास घेण्याची. असंच काहीसं सध्या विराट कोहलीची बायको आणि बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या अनुष्का शर्माबाबत घडत आहे. पण अनुष्कानेही या चर्चांना सडेतोड उत्तर देत विराम दिला आहे.


झिरोच्या पुढे काय?
 

 

 


View this post on Instagram


 

 

Sun soaked and stoked ☀️💞 #throwback


A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on
अनुष्का शर्माचा शेवटचा आलेला सिनेमा म्हणजे शाहरूख खानसोबतचा जीरो. जो 2018 साली रिलीज झाला पण बॉक्स ऑफिसवरही त्याला जीरोच प्रतिसाद मिळाला. या चित्रपटानंतर अनुष्काने आतापर्यंत एकाही सिनेमाची घोषणा केलेली नाही. ज्यामुळे तिने आपल्या फिल्मी करियर बाय बाय केल्याची चर्चा रंगतेय. आजकाल अनुष्का जास्तीत जास्त वेळ आपला नवरा विराट कोहलीसोबत घालवताना दिसते. त्यामुळे या चर्चांना अजूनच उधाण आलं. अशाही बातम्या होत्या की अनुष्का प्रेग्नंट तर नाही ना.


अनुष्काचं सडेतोड उत्तर
 

 

 


View this post on Instagram


 

 

You're only always one breath away from Bliss ... ☺️💏💜


A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनुष्काने या सर्व प्रश्नांना विराम दिला आहे. ‘मला सध्या माझ्या कामावर फोकस करायचं आहे. तसंच मागे केलेल्या कामाबद्दलही आढावा घ्यायचाय. मी आता माझ्या करिअरच्या अशा टप्प्यावर आहे जिथे मला दर महिन्याला किंवा वर्षाला चित्रपट करण्याची गरज नाहीयं. मी नेहमी तेच केलं जे मला करायचं होतं.’ अनुष्काने अनेक चित्रपटांसाठी निर्मात्याची भूमिकाही बजावली आहे. सुत्रानुसार, अनुष्का सध्या डिजीटल प्लेटफॉर्मसाठी शो बनवत आहे. तसंच एका चित्रपटावरही काम करत आहे. या सर्व गोष्टींवर ती सध्या प्रकर्षाने लक्ष देत आहे. कारण हे सर्व तिच्यासाठी नवीन आहे.


अनुष्का- विराटने केली स्पीडबोटची सफर, पाहा व्हिडिओ


अनुष्काची 10 वर्षांची बॉलीवूड घौडदौड
 

 

 


View this post on Instagram


 

 

All in one frame 🌟#ZeroPromotions @iamsrk @katrinakaif @aanandlrai


A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on
अनुष्काने तिच्या फिल्मी करियरला शाहरूख खानसोबत रब ने बना दी जोडी या सिनेमाने 2008 साली केली होती. तर मागच्या वर्षीच आलेल्या जीरो सिनेमामध्येही ती शाहरूख खान आणि कटरीनासोबत झळकली होती. या 10 वर्षांच्या काळात तिने अनेक चांगले चित्रपट आणि चांगल्या भूमिका केल्या. अनुष्का मागच्या वर्षी तीन चित्रपटात झळकली होती. परी हा तिचा चित्रपट खास चालला नाही. तर सुई धागा ने प्रेक्षकांना इंप्रेस केलं. तर जीरोची ही खूप चर्चा झाली पण तोही खास चालला नाही. यानंतर आता अनुष्काचे फॅन्स तिच्या पुढच्या प्रोजेक्टच्या प्रतीक्षेत आहेत.


कोणत्याही स्त्रीला आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर पोचल्यावर थोडं थांबावंस वाटणं साहजिक आहे. एवढंच काय तर तिला मातृत्वाचा अनुभवही घ्यावासा वाटू शकतो. आता पाहूया अनुष्का शर्मा प्रेक्षकांसाठी लवकरच काय बातमी घेऊन येते ते.