ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
womens-day-poem-in-marathi

महिला दिन विशेष मराठी कविता | Women’s Day Poem In Marathi

आपल्याकडे 8 मार्च हा महिला दिन विशेष (Mahila Din Vishesh) मानला जातो. जागतिक महिला दिन शुभेच्छा या दिवशी आपण आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या महिलांना देत असतो. अनेक महिलांच्या यशोगाथा आपल्याला प्रेरणा देत असतात.  या दिवशी आपण आपल्या आईला, बहिणीला अथवा आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या महिलांना खास आणि विशेष गिफ्ट्स देऊन त्यांचे आपल्या आयुष्यातील अस्तित्व किती महत्त्वाचे आहे हे जाणवून देत असतो. तर महिला दिनाच्या दिवशी खास गिफ्ट्समध्ये तुमच्या सौंदर्यात भर घालण्यासाठीही तुम्ही आमचे myglamm.com च्या साईटवरून काही खास मेकअप उत्पादने त्यांना पाठवू शकता. अशाच आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या महिलांना या महिला दिनी तुम्ही महिला दिन कविता मराठी पाठवा (Mahila Din Vishesh Marathi Kavita) आणि त्यांना खूष करा. महिला दिन कविता मराठीतून (Women’s Day Poem In Marathi) आपल्या प्रिय व्यक्तींना पाठवून त्यांना करा आनंदी!

महिला दिन विशेष मराठी कविता 1 | Mahila Din Vishes Marathi Kavita 1

जिच्या उदरातून जन्म घेते ही दुनिया सारी,
जिच्या उदरातून जन्म घेते ही दुनिया सारी,
या अशा विश्वशक्ती चे नाव आहे नारी.
ती आहे शेती आणि सृजणाची निर्माती, 
तिच्यामुळे तिवतात दिव्या मधील वाती, 
चहूकडे प्रकाश देऊनी जगास ती उद्धारी,
या अशा विश्वशक्ती चे नाव आहे नारी. 
क्रांतीबांची सावित्री भीमरावांची रमाई,
शौर्याचे त्यागाचे प्रतिक झाली ती आमची जिजाई,
रणांगणावर लढते जसी देवी झलकारी, 
या अशा विश्वशक्ती चे नाव आहे नारी.
शक्ती पीठ नवदुर्गाचे ती भक्तीचे ऊर्जा स्थान,
तिच्यामुळेच मिळते आम्हाला जगण्याचे आत्मभान, 
ती विठूची ती आषाढीची वारी,
या अशा विश्वशक्ती चे नाव आहे नारी.
नारी मुळे माणसांची आहे जगभर कीर्ती,
ती जन्मभर असते त्यागाची जिवंत मूर्ती, 
घडवत गेली पिढ्या स्वतः झिजली दरी,
या अशा विश्वशक्ती चे नाव आहे नारी.
जिच्या उदरातून जन्म घेते ही दुनिया सारी,
जिच्या उदरातून जन्म घेते ही दुनिया सारी,
या अशा विश्वशक्ती चे नाव आहे नारी.

महिला दिन विशेष मराठी कविता 2 | Mahila Din Vishesh Marathi Kavita 2

महिला दिन विशेष मराठी कविता | Womens Day Poem In Marathi
महिला दिनानिमित्त मराठी कविता

शक्ती जी तुमच्यामध्ये संपूर्ण दुनियेला दिसते, 
माझ्या नजरेतून पाहिलं तर मला दिसतं ते समर्पण 
प्रेमाचे, सेवेचे, करूणेचे, दयेचे, संरक्षणाचे समर्पण 
कितीही असो कठीण वाट, कायम राहते तुझी साथ 
कर्जदार कायम असू आम्ही तुमच्या प्रत्येक ऋणांचे 
प्रत्येक वेळी देता योग्य मार्ग, आभारी आहोत 
तुम्ही आमच्या आयुष्यात असण्याचे 
आई, बहीण, मुलगी, पत्नी, प्रेमिका, शिक्षिका 
प्रत्येक रूपात असते तुमची साथ 
महिला दिनी या मानतो तुमचे आभार, राहा कायम अशाच आयुष्यात! – दिपाली नाफडे 

वाचाजाहिराती ज्यांनी दाखवून समाजाला दाखवून दिले महिलांचे अनोखे रुप

ADVERTISEMENT

महिला दिन विशेष मराठी कविता 3 | Mahila Din Vishesh Marathi Kavita 3

महिला दिन विशेष मराठी कविता 4 (mahila din vishesh marathi kavita)
महिला दिन विशेष मराठी कविता

आज आहे नारी शक्ती दिन अर्थात महिला दिन 
आहेत तुझी अनेक रूपं, जी कायम मनात भरतात 
प्रत्येक परिस्थितीत जी होते समरूप
जिच्याशिवाय आहे आयुष्य अपूर्ण
महिलेच्या असण्याने होते सृष्टीही तृप्त
प्रकृतीचे दुसरे नावच आहे नारी
देवाचे दुसरे रूप आहे नारी
तरीही का आहे अजूनही अवहेलनेस पात्र? 
स्वतःला ओळख, तुझी आहे शक्ती अपार
तुझी ओळख तूच आहेस, तुझा सन्मान न करणाऱ्यांकडे तू कर दुर्लक्ष
आपल्यासाठी रस्ता तुझा तूच निवड 
तुझ्या पदरात आहे अतोनात आनंद, 
महिला दिन विशेष नसावा एकच दिवस 
असावा कायम परमानंद! 
दिपाली नाफडे 

महिला दिन विशेष मराठी कविता 4 | Mahila Din Vishesh Marathi Kavita 4

महिला दिन विशेष मराठी कविता | Women's Day Poem In Marathi
महिला दिन विशेष मराठी कविता 4 (mahila din vishesh marathi kavita)

फुलासारखी कोमल नारी, 
वेळेवर काट्यावरही चालणारी कठोर नारी
तरीही आपल्या अस्तित्वाने सर्वांवर मात करणारी नारी 
समाजातील बंधनाने वेढलेली नारी, तरीही त्यातून मार्ग काढणारी नारी
कुटुंबासाठी सर्वस्व अर्पण करणारी नारी, कधीही न घाबरणारी नारी 
अशीही नारी आहे सर्वांवर भारी
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 
दिपाली नाफडे

वाचाबॉलीवूड अभिनेत्री ज्यांनी निर्मितीच्या क्षेत्रातही घेतली उत्तुंग भरारी

महिला दिन विशेष मराठी कविता 5 | Mahila Din Vishesh Marathi Kavita 5

तू आई
तू ताई
तू आजी
तू बाईचं शेवटी
तू आहेस नारी
तू वारस नाहीस घराण्याचा
पण वारस तूच देशील घराण्याला
नाव मोठं राखण्यास कुळदीपक तूच देशील…
स्त्री जन्म घेतलास अन होळी जीवनाची केली…..
पुराणातही स्त्री बस आगीत होरपळून गेलीं…सीता….
अग्नि परीक्षेला उगीच का सामोरी गेली….
अन मंदोदरी तिचं काय….तिची तर रोजच होती उखळातली गती…
तोड दाबून मुकं पणानं झेलत राहिली सगळे अत्याचार रावणाचे
नांव किती सांगायचे ….
तेंव्हापासून आत्ताचे…
अहिल्या ,सीता,द्रौपदी…
मीरा ,राधा,रुक्मिणी….ते राणी झाशीची पण होती त्यांच्या सोबतीची
काय सांगू किती अन कसं सांगू
पुराणात ले अन इतिहासातले
सगळे सोडा…
वर्तमानही त्यात जोडा…
आताच तर भीषण चित्र आहे
महिला दिन साजरा करून
त्यांचे  एक दिवस गोडवे गाऊन
बस काय….
विचारा एकच क्षण ….
आपुल्याच मनाला….
आई…पायी स्वर्ग असतो तिच्या
तिचे अन्याय कुणाला सांगू
ताई बाई माई कुणी कुणीच
सुटले नाही….
पाहू काही उपयोग का
लिहण्याचा या पोथीचा
कीं वाचून फेका कचरा नुसता
उद्या चे जैसे थें….
गरज थोडीशीच आहें
मानसिकता बदलण्याची
दृष्टी कोण मानवीय ठेवण्याची
तिला काही नको…
फक्त जगु द्या फुलू द्या
कोवळ्या कळी ला उमलू द्या
एक हात द्या प्रेमाची साथ द्या
विश्वास द्या आश्वासक एक कटाक्ष द्या
बस…….!!!!!! 
अलका यशवंतराव देशमुख

ADVERTISEMENT

महिला दिन विशेष मराठी कविता 6 | Mahila Din Vishesh Marathi Kavita 6

रोज लुटली जाते इथे रस्त्यावर इज्जत महिलेची
अन आम्ही गातोय समारंभात महिती महिला दिनाची
वर्षांनुवर्षे निर्भया माझी न्यायासाठी लढते आहे
न्यायदेवता माझ्या देशाची आरोपीला संधी देते आहे
येता जाता भरचौकात होतो तिचा विनयभंग
आम्ही मात्र समारंभात हारतुरे घेण्यात दंग
शेजारी नातेवाईक भाऊ अन बापही
अत्याचार पोरीवर करतो आहे
आजची नारी सक्षम किती
यावरच भाषण झोडतो आहे
जेंव्हा मायबहीण आपली
निर्भयपणे रस्त्यावर फिरेल
तो दिवस खऱ्या अर्थाने
महिला दिवस असेल. 
माधुरी चौधरी, औरंगाबाद

वाचामहिलांविषयी आदर हा कायमस्वरुपी असायला हवा – वैदेही परशुरामी

महिला दिन विशेष मराठी कविता 7 | Mahila Din Vishesh Marathi Kavita 7

शुभेच्छा  …  शुभेच्छा … शुभेच्छा
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आईच्या आईपणाला
तिच्यातील बाईपणाला
तिने सोसलेल्या नऊ महिन्याच्या कळांना
त्यासाठी मिळालेल्या हत्तीच्या बळांना
शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा
बायको नावाच्या अर्धांगिनीला
तिच्यात दडलेल्या कारभारणीला
संसारातील तिच्याबरोबरच्या प्रत्येक क्षणाला
दोन घर जोडणाऱ्या तिच्या विशेष मनाला
शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा
सख्या , चुलत , मावस  बहिणीला
बहिणी सारख्या प्रिय वहिनीला
त्यांनी बांधलेल्या प्रत्येक राखीला
माहेरी झालेल्या त्यांच्या वजाबाकीला
शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा
मावशी आणि आत्याला
त्यांनी जपलेल्या जुन्या नात्याला
मामी आणि तिच्या खट्याळ पोरीला
शाळा कॉलेजातील प्रत्येक दिलचोरीला
शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा
आज्जीच्या संस्कार सृष्टीला 
तिने पेरलेल्या अनुभवी दूरदृष्टीला 
घरच्या आणि शेजारच्या काकूला
सुख दुःखात त्यांनी दिलेल्या टेकूला
महिला दिनाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा
मनभूमी ते कणभूमी गाजवणाऱ्या
विश्वातील प्रत्येक क्षेत्रात डंका वाजवणाऱ्या
भूत , वर्तमान , भविष्यकाळी  रणरागिनींना
तुमच्या आमच्या सर्वांच्या माता भगिनींना..! 
भालचंद्र कोळपकर

महिला दिन विशेष मराठी कविता 8 | Women’s Day Poem In Marathi 8

आई, तू कधी थकून का नाही?
का तू कधी आपल्या कृत्यातून पळून जात नाही? 
आपल्या थकवा वेदना, मला का करा बलिदानाची शक्ती,
हे फक्त तुमच्यातच असते 
आम्ही सर्व संघर्ष, इतके सारे काम न करता, 
आम्ही आपल्याकडून आणखी अपेक्षा करतो असे का? 
महिला दिनी तुझ्या या नारीशक्तीला माझा सलाम 
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (women’s day poem in marathi) 

ADVERTISEMENT

महिला दिन विशेष मराठी कविता 9 | Women’s Day Poem In Marathi 9

महिला दिन विशेष मराठी कविता 9 (mahila din vishesh marathi kavita)

इतिहास सांगतो आमुचा स्त्रीनेच शत्रू तुडवला!
लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला लढवला !!
जिजाऊने राजा शिवछत्रपती घडवला !!!
महाराणी ताराबाईने महाराष्ट्र भूमीत औरंगजेब रडवला !!
स्त्री म्हणजे जन्मदाती,
स्त्री म्हणजे संस्कृती,
स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा, 
स्त्री म्हणजे घराच घरपण,
स्त्री म्हणजे महान कार्य, 
अशा या स्त्री शक्तीला मानाचा मुजरा

महिला दिन विशेष मराठी कविता 10 | Women’s Day Poem In Marathi 10

आई-बाबा मित्र मैत्रिणी सोडून आली तुझ्या घरी
तिचे मन सांभाळायची आता कोणाची जबाबदारी
अनोळख्या कुटुंबात इतकी ती एकरुप होते
स्वतःची काही आवड होती हेच मुळी विसरुन जाते
अशा तुझ्या पत्नीसाठी थोडासा बदलशील का
तिच्या मनाचा थोडातरी विचार जरा करशील का
कधी सकाळी लवकर उठून चहा तिला नेऊन दे
वाफाळता गरम उपमा हळूच पुढ्यात आणून दे
भाजीत मीठ नसले तरी हसून वेळ मारुन ने
स्वैपाकाला कधी तरी कौतुकभरले शब्द दे
साडी मस्त शोभतीये आज मनमोकळी दाद दे
सुटीत एखाद्या एकटीलाच आपणहून फिरायला ने
मुलगीच समजून हट्ट एखादा तूच जरा समजून घे
वाढदिवस नसतानाही प्रेझेंटचा धक्का दे
वादात स्वर उंचावतातच शांतपणे ऐकून घे
पुरुषप्रधान संस्कृती सोडून माणूसपणाला थारा दे
झोपताना थोपटून तिला आधाराची कुशी दे
जमलेच तर सुरात गुणगुणून स्वप्नांची मोकळीक दे
हातात हात घेतलास लग्नात, आता खरी साथ दे
नवरेपणा दूर टाकून विसावायला प्रेमळ खांदा दे
अशी काहीशी साथ दे, मित्रत्वाचा हात दे
आज ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. 

महिला दिन विशेष मराठी कविता पाठवा (Women’s Day Poem In Marathi) आपल्या प्रियजनांना आणि साजरा करा महिला दिन!

ADVERTISEMENT

Womens Day Wishes In English
Womens Day Captions In English
Womens Day Poem In English

01 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT