ADVERTISEMENT
home / आरोग्य
#WorldCancerDay - महिलांमध्ये वाढतोय स्तनांचा कर्करोग

#WorldCancerDay – महिलांमध्ये वाढतोय स्तनांचा कर्करोग

स्तनाचा कर्करोग हा शहरी भारतातील स्त्रियांमध्ये आढळणारा सर्वात सामान्य कर्करोग आहे आणि ग्रामीण भागातील दुसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे. हा जगातील स्त्रियांमध्ये सर्वात सामान्यपणे आढळणारा कर्करोग आहे. मुंबईत त्याचे प्रमाण जवळजवळ 32 टक्के इतके नोंदविण्यात आले आहे आणि ते आता वाढतही आहे. त्यामुळे स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांमध्ये त्याचे प्रमाण एक तृतीयांशपेक्षा जास्त आहे. याबद्दल अधिक माहिती आम्ही घेतली आहे डॉ. तुषार जाधव, कन्सल्टंट, सर्जिकल ऑन्कोलॉजी अँड ब्रेस्ट सर्जरी, रिलायन्स हॉस्पिटल, नवी मुंबई यांच्याकडून. #worldcancerday च्या निमित्ताने याविषयी अधिक जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे. प्रत्येक महिलेला याबाबत माहिती असणं आवश्यक आहे.

रोगाचे प्रमाण व जोखमीचे घटक

Shutterstock

सुमारे वीसपैकी एका महिलेस स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका असतो आणि त्यापैकी केवळ दहा टक्के केसेस आनुवंशिक असतात. सामान्यतः याबाबतीत जो समज आहे, त्यापेक्षा ही परिस्थिती वेगळी आहे. स्तनाचा कर्करोग होण्याचे नेमके कारण अद्याप अज्ञात असले, तरी त्याच्या जोखमीचे घटक आपल्याला माहीत आहेत. स्त्रिया करीत असलेले धूम्रपान व मद्यपान यांचा या जोखमीच्या घटकांमध्ये समावेश होतो. तसेच, उशीरा मूल होणे (वयाच्या पस्तिशीत वा त्यानंतर पहिले मूल होणे), मूल न होणे, मुलास स्तनपान न देणे, तोंडाने घेण्याच्या काही गर्भनिरोधक औषधांचे सेवन करणे, ‘हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी’ घेणे, ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता, अशा काही कारणांमुळेही स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. भारतातील स्त्रियांना पाश्चिमात्य लोकसंख्येच्या तुलनेत, सरासरीपेक्षा कमी वयात हा कर्करोग होत असल्याचे आढळून आले आहे.

ADVERTISEMENT

#WorldBreastFeedingWeek : स्तनपानाने टळतो ब्रेस्ट कॅन्सरचा धोका…हे खरं आहे का

चाचणीचे महत्त्व

स्तनाचा कर्करोग आहे किंवा कसे, हे कळण्यासाठी चाचण्या व तपासण्या करणे अतिशय महत्त्वाचे असते. या कर्करोगाचे वैद्यकीय निदान होण्यापूर्वीदेखील, काही लक्षणे आहेत का, याची तपासणी सामान्य निरोगी स्त्रियांमध्ये करता येते. स्त्रियांनी अशी तपासणी दरवर्षी करण्याची शिफारस करण्यात येते; तथापि, संसाधनावर मर्यादा असण्याच्या परिस्थितीमुळे, आपल्याकडे सार्वत्रिक तपासणी कार्यक्रम राबविता येत नाही. अनेक महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान न होण्यामागील हे एक मोठे कारण आहे.

कॅन्सरचा धोका टाळायचा असेल तर करा नैसर्गिक पदार्थांचा वापर

प्रगत तंत्र व उपचारांचे पर्याय

कर्करोगाचे निदान झाल्यास, संबंधित कुटुंबाच्या सामाजिक, नैतिक आणि आर्थिक बाबींमध्ये मोठेच बदल होतात. प्रत्येक स्त्री घरात अनेक भूमिकांमध्ये वावरत असल्यामुळे, कुटुंबातील या महत्त्वाच्या व्यक्तीस हा आजार झाल्यास, त्याचा परिणाम फार मोठा होतो. लवकर निदान झाल्यास आणि वेळेवर उपचार केल्यास, हा कर्करोग पूर्णपणे बरा होतो.

ADVERTISEMENT

सहाय्यक स्वरुपाच्या उपचारांमध्ये आता मोठ्या प्रमाणात प्रगती झाली असल्याने, नाविन्यपूर्ण व प्रगत शल्यक्रिया पध्दतीमुळे स्तनाचा कर्करोग चौथ्या अवस्थेतही बरा होऊ शकतो. एकदा निदान झाल्यानंतर, रूग्णावर विविध पद्धतींनी उपचार करणे आवश्यक आहे. शस्त्रक्रिया ही अर्थातच सर्वात महत्वाची आणि अनिवार्य पद्धत आहे. रोगाच्या उपप्रकारांनुसार व तीव्रतेनुसार, केमोथेरपी, रेडिओथेरपी, हार्मोनल थेरपी, टार्गेटेड थेरपी अशा काही इतर पद्धतींचाही एकत्रितपणे वापर करावा लागतो.

स्तनाचे सर्व कर्करोग एकसारखे नसतात. म्हणूनच उपचारपद्धती ठरवतानादेखील रुग्णाचा व्यक्तिशः विचार करावा लागतो. बाधित स्तन सुरक्षितपणे संरक्षित केला जाऊ शकतो आणि ‘मास्टेक्टॉमी’ (शल्यक्रिया करून स्तन काढून टाकणे) ही टाळता येऊ शकते. ‘ऑन्कोप्लास्टिक’ तंत्राने संरक्षित स्तनाचा घाट व आकार यांची फेररचना करता येते. ‘मास्टेक्टॉमी’ आवश्यकच असेल, तर कर्करोगाच्या शस्त्रक्रियेच्या वेळी संपूर्ण स्तनाची फेररचना करण्यासाठी विविध तंत्रे उपलब्ध आहेत. याशिवाय, शस्त्रक्रियेपूर्वी विविध स्वरुपाची ‘केमोथेरपी’ व ‘हार्मोनल थेरपी’ वापरुन, आपण आता उच्च टप्प्यातील आजारातील ट्यूमरचे ओझे कमी करून स्तनाचे संवर्धन करू शकतो. स्तनाच्या सर्वच कर्करोगांमध्ये ‘केमोथेरपी’ची आवश्यकता नसते. रुग्णाचे वय व ट्यूमरचा प्रकार, यानुसार केमोथरपीचे प्रमाण ठरविता येते. काही ठराविक प्रकरणांमध्ये ‘केमोथरपी’ टाळताही येते.

म्हणूनच, अशा अभिनव शल्यक्रिया प्रक्रियांचा वापर करून आणि नवीन ‘केमोथेरपी औषधां’च्या मदतीने, ट्यूमर जागेवर वाढलेला असतानासुद्धा, स्तनाची फेररचना करून, त्याला इच्छित घाट, आकार, आकारमान व समतोलपणा देऊन त्याचे जतन करता येते. ‘सेंटिनल लिम्फ नोड बायोप्सी’ (एसएलएनबी) या तंत्राचा वापर करून विकृती कमी करता येते. शल्यविशारदांना अतिशय उपयुक्त ठरणारे हे मार्गदर्शक असे नवीन तंत्र आहे. हे सर्व उपचार आता अत्यंत ‘ऑन्कोलॉजिकल सेफ्टी’द्वारे केले जाऊ शकतात. नवीन ‘थेराप्युटिक मॉलिक्यूल्स’मुळे, स्तनाच्या कर्करोगाचे निदान चांगल्या पद्धतीने करता येते व रुग्णाच्या एकूणच जगण्याची शक्यता वाढते.

स्तनाचा कर्करोग म्हणजे लढाई गमावणे किंवा स्तन गमावणे, असे आता राहिलेले नाही. कर्करोगाच्या उपचारांनंतरही रुग्ण आपले स्त्रीत्व जपू शकते, एवढेच नव्हे तर ती अधिक स्त्री-सुलभ आणि सुंदर असू शकते.

ADVERTISEMENT

स्वयंपाकघरातील अशा वस्तू ज्यामुळे असतो कॅन्सर होण्याचा धोका

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

01 Feb 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT