ADVERTISEMENT
home / Fitness
कॅन्सरचा धोका टाळायचा असेल तर करा नैसर्गिक पदार्थांचा वापर

कॅन्सरचा धोका टाळायचा असेल तर करा नैसर्गिक पदार्थांचा वापर

 

आजकाल बऱ्याच जणांना कॅन्सर झाला असल्याचं ऐकिवात येते. याचं नक्की कारण काय असा विचारही येतो. पण खरं तर आपली बदललेली लाईफस्टाईल आणि त्यामुळे आपल्या शरीरावर होणारे परिणाम हेच याचं खरं कारण आहे. कॅन्सर हा काही अनुवंशिक असतो असं नाही तरीही काही जण याला अनुवंशिक मानतात. कॅन्सरवर कोणत्याही डॉक्टरांना 100 टक्के उपाय करता येत नाही. पण आपण आपल्या खाण्यावर नियंत्रण ठेवून यावर नक्की उपाय करू शकतो. त्याशिवाय अशी काही औषधं आहे जी ‘Vitabiotics’ ने प्रयोग करून आणली आहेत. यापैकी एक औषध म्हणजे ‘इम्युनेस’. विटाबायोटिक्सचे उपाध्यक्ष रोहित शेलाटकर यांच्याशी ‘POPxo मराठी’ने याबाबत चर्चा  केली. रोहितच्या म्हणण्याप्रमाणे आताच्या बदलत्या लाईफस्टाईलमुळे आणि खाण्यावर नीट नियंत्रण नसल्यामुळे आजार उद्भवतात. पण तुम्ही जर नैसर्गिक पदार्थांचं सेवन केलं तर तुम्ही बऱ्याच प्रमाणात याचा धोका टाळू शकता. 

ब्रेस्ट कॅन्सरच्या लक्षणांबाबत ‘या’ लिंबाच्या चित्रातून कळतात बऱ्याच गोष्टी

कोणत्या पदार्थांचा करावा जेवणामध्ये समावेश

Shutterstock

 

आपण हल्ली जेवणाच्या वेळा पाळत नाही. त्यातही बऱ्याच प्रमाणात पोटामध्ये फास्ट फूड जात असतं. पण याचा सर्वात जास्त परिणाम आपल्या शरीरावर होत असतो याचा अंदाज आपल्याला आधी येत नाही. कारण यामध्ये प्रोसेस्ड फूडचा जास्त प्रमाणात वापर करण्यात आलेला असतो जे आपल्या शरीरामध्ये पचायलाही जड असते. पण याऐवजी आपण जास्तीत जास्त नैसर्गिक पदार्थांचा आपल्या जेवणात समावेश केला तर कॅन्सरच्या धोक्यापासून आपण वाचू शकतो. आता आपल्याला असा प्रश्न पडतो की नैसर्गिक पदार्थ म्हणजे नेमकं काय? तर फायबर असणारे पदार्थ, अंडी, नैसर्गिक फळं हे नैसर्गिक पदार्थ आहेत. तुम्ही जर साखर खात असाल तर साखर ही गुळापासून बनते. मग साखर ही प्रोसेस्ड असते ज्याने मधुमेहासारखे रोगही होतात. त्याऐवजी तुम्ही तुमच्या जेवणामध्ये गुळाचा वापर करा. तुम्ही मांसाहारी असल्यास मांस खाण्यापेक्षा मासे आणि अंडी यावर जास्त भर द्या. तेल टाळण्याचा प्रयत्न  करा. तेल वापरायचे असेल तर तुम्ही एकदा तळलेले पदार्थांचे तेल पुन्हा वापरू नका. आपल्या जेवणामध्ये सफरचंद, गाजर, केळे यासारख्या नैसर्गिक पदार्थांचा समावेश करून घ्या. जेणेकरून नैसर्गिक पद्धतीने साखर तुमच्या शरीरामध्ये नैसर्गिक फळांमधून जाते. 

ADVERTISEMENT

#WorldBreastFeedingWeek : स्तनपानाने टळतो ब्रेस्ट कॅन्सरचा धोका…हे खरं आहे का

फॅटमधील फरक

Vice President of Vitabiotics

 

प्रोसेस्ड फूडमधून जास्त फॅट अर्थात चरबी शरीरामध्ये निर्माण होते आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरामध्ये अधिक आजार निर्माण होण्यावर होत असतो असंही रोहित शेलाटकर यांनी यावेळी सांगितलं. त्याशिवाय तुमच्या शरीरासाठी आवश्यक असणारे फॅट हे लिक्विड फॅट असावे जे आपल्या शरीरासाठी चांगले असते असंही त्यांनी म्हटलं. शरीराला आवश्यक असणारे विटामिन्स, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स अथवा मिनरल्स हे भात, डाळी, शाकाहारी पदार्थ, भाज्या यामधून जास्तीत जास्त प्रमाणात घ्या. शरीराला अँटिऑक्सिडंट्सची गरज असते आणि ते आपल्याला नैसर्गिक पदार्थांमधूनच मिळू शकते. आपल्या शरीराची काळजी घेणे हे आपल्याच हातात आहे. त्याशिवाय हल्ली महिलांना जास्त प्रमाणात कॅन्सरचा धोका असतो त्यामुळे त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी ही व्यवस्थित करायला हवी असेही त्यांनी म्हटले. नैसर्गिक पदार्थ हे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असून शरीराची काळजी घेण्यासाठी याचा जास्त प्रमाणात उपयोग करून घ्यायला हवा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.

स्वयंपाकघरातील अशा वस्तू ज्यामुळे असतो कॅन्सर होण्याचा धोका

जाणून घ्या ब्रेन ट्युमरची लक्षणे (Brain Tumor Symptoms In Marathi)

ADVERTISEMENT

तोंडाचा कर्करोग लक्षणे व उपाय (Mouth Cancer Symptoms In Marathi)

17 Feb 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT