ADVERTISEMENT
home / Periods
पीसीओडीचा (PCOD) त्रास असेल तर या गोष्टी माहीत असायलाच हव्यातच

पीसीओडीचा (PCOD) त्रास असेल तर या गोष्टी माहीत असायलाच हव्यातच

‘पीसीओडी’ म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसिज हा स्त्रिया आणि मुलींच्या मनात आधी काळजी आणि मग न्यूनगंड निर्माण करणारा आजार असं म्हटलं जातं. जीवनशैलीतील बदलांमुळे या आजाराचा सामना करावा लागणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण सध्या वाढत चाललं आहे. नेमका काय आहे हा आजार, तो होऊच नये म्हणून काय करावं आणि झालाच तरी त्यावर उपचार करण्यापूर्वीच्या तपासण्या कोणत्या याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. Wockhardt Hospital Mumbai Central च्या स्त्री रोग  विशेषतज्ज्ञ आणि प्रसुतीशास्त्रज्ञ, डॉ गंधाली देवरुखकर यांच्याशी ‘POPxo मराठी’ ने संवाद साधला असता त्यांनी ही दिलेली संपूर्ण माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल.

PCOD म्हणजे काय? (What is PCOD)

‘पॉलीसिस्टिक ओव्हेरीयन डिसीज’ (पीसीओडी)या नावातच सारे काही आले. पॉली- अनेक, सिस्टीक- गाठी, ओव्हेरीयन- अंडाशयाचा आजार असा त्याचा पूर्ण अर्थ आहे. अर्थातच या आजारात अंडाशयाला अनेक गाठी येतात आणि त्यामुळे मुख्यत: हॉर्मोन्सचा समतोल बिघडतो. त्यामुळे तुमच्या मासिक पाळीला त्रास होतो.

stomach pain

पीसीओडीची लक्षणं कोणती? (Symptoms of PCOD)

पीसीओडीत आढळणारी लक्षणं सर्वाधिक मासिक पाळीशी निगडीत असतात. नक्की काय असतात ही लक्षणं आपण पाहू-

•         मासिक पाळीतील अनियमितता प्रमुख लक्षण

•         पाळीदरम्यानचा स्त्राव कमी होऊन कालांतराने पाळी बंद होणे

•         अनियमित मासिक पाळीचा परिणाम म्हणजे येणारे वंध्यत्व

ADVERTISEMENT

•         यात वजन अधिक वाढतं

•         चेहरा, हातापायांवर आणि पोटावर लव येणे

•         चेहऱ्यावर मुरुमं येणे

•         मानेवरची त्वचा जाडसर होऊन काळी दिसणे

ADVERTISEMENT

•         केस गळण्याचं प्रमाण वाढतं

•         काही महिलांची मानसिकता ढासळते

पीसीओडीची कारणं (Reasons of PCOD)

–  आनुवंशिक

–  इन्सुलिन प्रतिरोधन

ADVERTISEMENT

–  स्थुलत्व

–  अयोग्य जीवनशैली

–  चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव आणि ताणतणाव

stress

ही कारणं असली तरीही तुम्ही स्वतःच्या मनाने कोणताही उपाय करणं योग्य नाही. पीसीओडी अथवा पीसीओएस निदान झाल्यानंतर सर्वात आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही सोनोग्राफी आणि रक्ताची तपासणी करून घ्यावी. हे सर्वात महत्त्वाचं.

ADVERTISEMENT

पीसीओडीसाठी करावयाच्या तपासणी (Medical Check up for PCOD)

1. सोनोग्राफी

ही एक अतिशय महत्त्वाची तपासणी आहे. यामध्ये अंडाशयाचे अगदी योग्य चित्र आपल्याला मिळते आणि पीसीओडी असल्यास त्याचे योग्य निदान होऊ शकते.

2. हॉर्मोन्स

आपल्या शरीरातील हॉमोन्सचे प्रमाण ही दुसरी महत्त्वाची तपासणी आहे. यात साधारणपणे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन (एफएसएच), ल्युटेनायझिंग हॉर्मोन(एलएच), टेस्टॉस्टेरॉन, एन्टीम्युलेरियन हार्मोन (एएमएच)  आणि डीहायड्रोएपिअँड्रोस्टेरॉनचे (डीएचइएएस) प्रमाण तपासून घेतले जाते. याबरोबर स्त्रीच्या रक्तातील साखरेचे प्रमाणही तपासले जाते.

पीसीओडीचे शरीरावरील घातक परिणाम

या आजारामुळे हॉर्मोन्सचे समतोल बिघडते. परिणामी दर महिन्याला स्त्रीच्या शरीरात तयार होणाऱ्या स्त्रीबीजाचे प्रमाणही घटते. यामुळे पुढे जाऊन त्यामुळे वंधत्व येण्याची शक्यता असते. त्यामुळे यावर वेळेवर उपचार घेणं अत्यंत गरजेचं असतं. याकडे कोणत्याही स्त्री अथवा मुलीने दुर्लक्ष करू नये.

पीसीओडी / पीसीओएस उपचार (Treatment for PCOD)

junk food
  • सुयोग्य जीवनशैलीसाठी योग्य व वेळेवर घरचा पोषक आहार
  • जंक फूड टाळणे, बेकरीचे, जड पदार्थ न खाणे, शक्यतो ताजे गरम रुचकर पारंपरिक अन्नपदार्थ मुलींना दिले पाहिजे
  • विशेषत: शाळेचा डबा देताना यानुसार योग्य नियोजन केले पाहिजे
  • यात एक महत्त्वाची गोष्ट जी आजकाल अतिजागरुकतेमुळे चुकू शकते ती म्हणजे लागोपाठ दिला जाणारा जड आहार!
  • तणाव व्यवस्थापन. जीवनशैलीचे व तणावाचेदेखील नियोजन करणे हे अगदी शाळकरी मुलींमध्येही आवश्यक झाले आहे. यामध्ये ताणतणाव टाळणे महत्त्वाचे आहे. यात अगदी लहानसहान गोष्टींचापण यात समावेश असतो. ज्याचे महत्त्व बरेचदा पालकांच्या लक्षात येत नाही.

खेळ आणि इतर व्यायाम (Exercise and Games for PCOD)

  • प्रत्येक मुलीने दिवसातील ठराविक वेळ हा खेळण्यासाठी / व्यायामासाठी राखून ठेवलाच पाहिजे
  • शाळेत खेळाच्या तासाला मैदानावर न खेळता झाडाखाली अथवा वर्गात बसून राहणे चुकीचे आहे. अपवाद फक्त आजारपणाचा!
  • तसेच अभ्यास व इतर छंदवर्ग याचे योग्य नियोजन करून आपापल्या आवडीनुसार बॅडमिंटन/पोहणे/टेनिस इत्यादीसाठी वेळ काढणे आवश्यक आहे
  • वजन व उंचीचे योग्य प्रमाण असणे आवश्यक आहे. काही विशिष्ट योगप्रकार देखील यासाठी उपलब्ध आहेत.

फोटो सौजन्य – Shutter Stock

ADVERTISEMENT

हेदेखील वाचा –

मासिक पाळीच्या समस्या आणि त्यावरील उपाय

Period Tracker वापरण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का

11 Apr 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT