लघवीच्या जागी खाजे येणे ही समस्या आजकाल अनेक महिलांना सतावत असते. लघवीच्या जागी खाज येण्यामागे योनीमार्ग कोरडा होणे, स्वच्छतेसाठी अती साबणाचा वापर करणे अशी अनेक कारणं असू शकतात. असं झाल्यास लघवीच्या जागी असह्य खाज येते ज्यामुळे लघवीला जाणे, बसणे अथवा दैनंदिन कामे करणे कठीण होते. शिवाय लघवीची जागा नाजूक असल्यामुळे खाजवल्यास अशा ठिकाणी लाल पुरळ येणे अथवा इतर इनफेक्शन होण्याचा धोका असतो. बऱ्याचदा लघवीच्या जागी खाज येण्यामागे यीस्ट इनफेक्शन ( Yeast Infection) अथवा एखादा गुप्त आजारही कारणीभूत असू शकतो. गंभीर आजार असल्यास याबाबत वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. मात्र काही जणींना अशा प्रायव्हेट भागात झालेल्या दुखण्याबद्दल चारचौघात बोलायला लाज वाटते. ज्यामध्ये जांघेत खाज सुटणे उपाय यांचाही समावेश असू शकतो. असे आजार गंभीर होऊ नयेत यासाठी तुम्ही काही पारंपरिक घरगुती औषधांचा वापर करू शकता. ज्यामुळे लघवीच्या जागी येणारी खाज कमी होतेच शिवाय तुम्हाला लवकर आराम मिळू शकतो. यासाठीच जाणून घ्या लघवीच्या जागी खाज येण्याची लक्षणे (symptoms of vaginal itching in marathi) आणि लघवीच्या जागी खाज येणे घरगुती उपचार (laghvichya jagi khaj yene gharguti upay) यासोबतच वाचा महिलांना वारंवार लघवी येणे यावर उपाय जाणून घ्या | Home Remedies For Frequent Urination.
बेकिंग सोडा बाथ (Baking Soda Bath)
बेकिंग सोड्याचा वापर त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी तसंच यीस्ट इनफेक्शनवर उपचार करण्यासाठी वापरला जातो.एका संशोधनात याबाबत असं आढळून आलं आहे की,बेकिंग सोड्यामध्ये असलेले अॅंटि फंगल घटक लघवीच्या जागी येणारी खाज कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. यासाठी ज्यांना असा त्रास होत असेल त्यांनी अंघोळीच्या पाण्यात अर्धा कप बेकिंग सोडा मिसळावा आणि त्या पाण्याने अंघोळ करावी. खाज येत असलेल्या जागी बेकिंग सोडा पाण्यात भिजवून तयार केलेली पेस्टदेखील तुम्ही लावू शकता. बेकिंग सोड्याच्या पाण्याने अंघोळ केल्यामुळे लघवीच्या जागी येणारी खाज तर कमी होतेच शिवाय इतर अनेक त्वचेच्या समस्या कमी होतात.
सुती अंर्तवस्त्रे (Cotton Innerwear)
लघवीच्या जागी खाज येणे कमी करण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाय देखील करायला हवेत. जसं की तुम्ही जर अशा वेळी सुती अथवा कॉटनच्या अंडरविअर, पॅंट वापरल्या तर तुमचा त्रास काहिसा कमी होऊ शकतो. कारण सुती कापडामुळे त्वचेला योग्य प्रमाणात ऑक्सिजनचा पूरवठा होता. ज्यामुळे हवा खेळती राहते आणि त्वचेला आराम मिळतो. जे लोक सुती कापडाची अंर्तवस्त्रे वापरतात त्यांना लघवीच्या जागी खाज येणे अथवा व्हजायनल इनफेक्शन होण्याचा धोका कमी असतो. यासोबतच लघवी पिवळी होण्याची कारणे जाणून घ्या
अॅपल सायडर व्हिनेगर बाथ (Apple Cider Vinegar Bath)
अंघोळीच्या पाण्यात अॅपल सायडर व्हिनेगर मिसळूनही तुम्ही तुमच्या लघवीच्या जागी खाज येण्याच्या समस्येवर उपाय करू शकता. अनेक लोक आजही हा घरगुती उपचार योनी मार्गातील खाज कमी करण्यासाठी करतात. शिवाय याचा कोणताही दुष्परिणाम तुमच्या त्वचेवर अथवा योनीमार्गावर होत नाही. घरी करता येण्यासारखा आणि सोपा उपाय असल्याने तुम्ही तो नक्कीच करू शकता. यासोबतच जाणून घ्या लघवीच्या जागी जळजळ होणे घरगुती उपाय (Urine Infection Home Remedies In Marathi)
प्रोबायोटिक अन्नपदार्थ (Probiotic Foods)
योनी मार्ग आणि लघवीची जागा सुरक्षित आणि निरोगी राहण्यासाठी तिथे काही पोषक बॅक्टेरिआ निर्माण होणं गरजेचं असतं. ज्यामुळे तुमचा योनी मार्ग अथवा लघवीची जागा कोरडी पडत नाही. या जीवजंतूंची निर्मिती होण्यासाठी तुमच्या आहारात प्रोबायोटिक्स असणं गरेजेचं आहे. जेव्हा अन्नातून असे प्रोबायोटिक्स मिळत नाहीत तेव्हा डॉक्टर सप्लीमेंट अथवा औषधांमधून त्याचा पूरवठा करतात. मात्र दही, लोणचं अशा पदार्थांमधून तुमच्या शरीराला नैसर्गिक प्रोबायोटिक्स मिळत असतात.
नारळाचे तेल (Coconut oil)
नारळाचे तेल कोणत्याही प्रकारच्या त्वचेच्या समस्येसाठी गुणकारी ठरते. विषाणूंचा नाश करून त्वचेचं पोषण करण्याचं काम नारळाचे तेल त्वचेवर करत असते. त्यामुळे लघवीच्या जागी खाज येत असेल अथवा योनीमार्गाचे इनफेक्शन झाले असेल तर नारळाचे तेल वापरल्यामुळे तुम्हाला आराम मिळू शकतो. अशा वेळी नारळाचे तेल थोडं कोमट करा आणि त्यामध्ये कापराची वडी विरघळवा. नारळाचे तेल आणि कापूर एकत्र केलेले तेल तुम्ही तुमच्या लघवीच्या जागी लावू शकता. नारळाच्या तेलामुळे तुमचे इनफेक्शन कमी होते आणि कापराच्या थंडाव्यामुळे तुम्हाला खाजेपासून आराम मिळतो.
अॅंटिफंगल क्रीम (Anti-Fungal Cream)
लघवीच्या जागी अतीप्रमाणात खाज येत असेल तर त्वरीत आराम मिळण्यासाठी तुम्ही त्या जागी एखादं अॅंटि फंगल क्रीम नक्कीच लावू शकता. कारण यीस्ट इनफेक्शन अथवा व्हजायनल इनफेक्शनमुळे तुम्हाला त्वचेवर असह्य खाज येते. अशा वेळी एखादं ओटीसी अॅंटि फंगल क्रीम तुमच्या नक्कीच फायद्याचं ठरू शकतं. कारण त्यामुळे विषाणू नष्ट होतात शिवाय तुमच्या त्वचेवर येणारी खाज कमी होते. काही प्रकारच्या अॅंटि फंगल क्रीम या व्हजायनल आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असतात. त्यामुळे तुम्ही त्या तुमच्या योनीमार्गावर लावू शकता.
स्वच्छता (Hygiene)
आजारपणापासून दूर राहायचं असेल तर स्वच्छता खूप महत्त्वाची आहे.सतत स्वच्छता राखण्यामुळे तुमच्या लघवीच्या जागी येणारी खाज हळू हळू कमी होते. यासाठी मासिक पाळीच्या काळात, नेहमी अंघोळ करताना, सौचविधी केल्यावर, लघवीला गेल्यावर योनी मार्ग आणि लघवीची जागा कोमट पाण्याने स्वच्छ करा. व्हजायनल स्वच्छता राखताना त्या जागी कधीच साबणाचा अती वापर करू नका. साबण, जेल अथवा क्लिंझर्स वापरल्यामुळे योनी मार्ग अती कोरडा होण्याची शक्यता असते.
दही आणि मध (Yogurt and Honey)
योगर्ट अथवा दही हे एक उत्तम प्रोबायोटिक आहे. त्यामुळे लघवीच्या जागी खाज येत असेल तर तुम्ही याचा वापर नक्कीच योनीमार्गाजवळ करू शकता. तुम्ही दही आणि मध एकत्र करून लघवीच्या जागी येणारी खाज कमी करू शकता. कारण दह्यामध्ये थंडावा देणारे गुणधर्म आहेत तर मध हे अॅंटिइनफ्लैमटरी आहे. थोडक्यात या घरगुती उपचारामुळे तुमच्या योनीमार्गाला चांगला आराम मिळू शकतो. अती प्रमाणात खाज येत असेल तर दिवसातून दोनदा तुम्ही लघवीच्या जागी हा उपचार करू शकता.
व्हॅसलिन (Vaseline)
लघवीच्या जागी खाज येण्याचे मुख्य कारण बऱ्याचदा योनी मार्ग अथवा लघवीची जागा अती प्रमाणात कोरडी होणे हा असतो. हिवाळ्यात, थंड हवेच्या ठिकाणी गेल्यावर अथवा अती प्रमाणात साबणाचा वापर केल्यामुळे लघवीची जागा कोरडी होते. अशा वेळी व्हॅसलिन लावून तुम्ही पटकन या समस्येवर उपाय करू शकता. बऱ्याचदा आपल्या घरी व्हॅसलिन असतेच तेव्हा थोडं व्हॅसलिन लघवीच्या जागी खाज येत असलेल्या ठिकाणी लावा. त्वचेचं पोषण झाल्यामुळे आणि त्वचा हायड्रेट झाल्यामुळे लघवीच्या जागी खाज येणे नक्कीच कमी होते.
कुलिंग थेरपी (Apply cooling therapy)
लघवीच्या जागी येणारी खाज त्वरीत कमी करण्याचा सोपा मार्ग म्हणजे त्या जागी कुलिंग थेरपी देणे. त्वचेला आराम देण्याचा हा एक अतिशय सोपा उपाय आहे. यासाठी आईस पॅकने अथवा कापडात बर्फ गुंडाळून तुम्ही लघवीची जागा शेकवू शकता. ज्यामुळे त्या जागी होणारी जळजळ लगेच कमी होईल. दाह कमी झाल्यामुळे तुम्हाला आराम वाटू लागेल.
लघवीच्या जागी खाज येणे घरगुती उपाय – FAQs
लघवीच्या जागी खाज आल्यास डॉक्टरांचा सल्ला केव्हा घ्यावा ?
लघवीची जागा कोरडी झाल्यामुळे तिथे खाज येत असेल तर नैसर्गिक उपाय केल्यावर लगेच आराम मिळू शकतो. मात्र जर तीन चार दिवसांपेक्षा जास्त दिवस लघवीच्या जागी खाज येत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. कारण यामागे एखादे इनफेक्शन अथवा गंभीर आजार कारणीभूत असू शकतो.
प्रायव्हेट भागावर मीठ लावणे योग्य आहे का ?
लघवीच्या जागी खाज येत असेल तर अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकून अंघोळ करण्यास काहीच हरकत नाही. त्यामुळे तुम्हाला नक्कीच चांगला आराम मिळू शकतो. मात्र मीठ योनीमार्गाच्या आत लावणे नक्कीच हिताचे नाही.
लघवीच्या जागी खाज येत असल्यास कोणते मलम लावावे ?
व्हजायनल इनफेक्शन अथवा प्रायव्हेट जागी लावण्यासाठी खास प्रकारचे मलम असतात. त्यामुळे याबाबत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. मात्र लघवीच्या जागी खाज येत असल्यास नारळाचे तेल, व्हॅसलिन अथवा कैलाश जीवन अशा प्रकारचे नैसर्गिक मलम वापरण्यास काहीच हरकत नाही.