अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीला भविष्यात मिळणारं यश, लग्न आणि करियर हे जाणून घेण्यात अंकांची मोठी भूमिका असते. अंक फक्त आपल्या व्यक्तिमत्त्वावरच नाहीतर आपल्या आयुष्यातील अनेक घटनांवर प्रभाव टाकतात. मग ते अंक म्हणजे तुमच्या मोबाईलचा नंबरही असू शकतो. आश्चर्य वाटलं ना…हो. या नंबरला योग्य प्रकारे जोडल्यास तुमच्या व्यक्तीमत्त्वाबाबतच्या अनेक गोष्टी कळू शकतात.
मोबाइल चार्जिंग टिप्स देखील वाचा
उदाहरणार्थ जर तुमचा नंबर आहे 89191112234, तर तुमचा प्रभावी अंक मिळवण्यासाठी सर्व नंबर्सची बेरीज करा 8 +9 +1 +9 +1 +1 +1 +2 +2 +3 +4 = 41; 4 +1 = 5. अशा प्रकारेच तुम्हीही तुमच्या मोबाईलचा नंबर जोडून एक अंक प्राप्त करा आणि जाणून घ्या तो आकडा तुमच्याबद्दल काय सांगतो.
अंक #1 हा अंक मजबूत मानला जातो. हा ऊर्जा वाढवण्यासोबतच दुसऱ्यांवर प्रभाव टाकण्यातही मदत करतो. बिझनेसमन आणि करियर बिल्डर्सकरिता एकपेक्षा जास्त वेळा 1 तुमच्या नंबरमध्ये असणं चांगली गोष्ट आहे. जी लोक प्रेमाच्या शोधात आहे त्यांच्यासाठी मात्र हा आकडा न आल्यास जास्त चांगलं आहे.
अंक #2 हा अंक रोमँटिक आणि जे प्रेमाच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी परफेक्ट आहे. मोबाइलच्या नंबरमध्ये हा आकडा एक पेक्षा जास्त वेळा असल्यास ती व्यक्ती खूपच दयाळू आणि डिप्लोमॅटीक उत्तर देणारी असते. हा आकडा त्या लोकांसाठी योग्य आहे जे स्वतःच मत ठेवतात आणि सेल्सशी निगडीत काम करतात.
अंक #3 ज्या लोकांचा अंक 3 येईल ते क्रिएटीव्ह मानले जातात. इतरांनाही अशा लोकांबरोबर राहण्यात मजा येते. हा अंक आर्टिस्ट, संगीतकार आणि युवांसाठी चांगला आहे. हा अंक लेखक किंवा लिखाण क्षेत्राशी निगडीत लोकांसाठी उपयुक्त आहे.
अंक #4 हा अंक स्थिर आणि विश्वासू मानला जातो. यामुळे बँकिंग, लॉ फर्म आणि दुसऱ्या विश्वास असणाऱ्या सेक्टर्सशी निगडीत व्यक्तींसाठी उपयुक्त मानला जातो.
अंक #5 असं म्हणतात की, हा आकडा आयुष्यात रोमांच आणि बदल दोन्ही आणू शकतो. पण हाच अंक कुटुंबासोबत राहणाऱ्या आणि मानसिक तणावाखाली असणाऱ्या लोकांसाठी चांगला नाही.
वाचा – प्रभावी व्यक्तीमत्वासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स
अंक #6 हा अंक कुटुंबाकडे ओढा असणाऱ्या व्यक्तीसाठी चांगला आहे. या व्यक्तीसाठी हा अंक काळजी आणि सुरक्षेची भावना घेऊन येतो. तसंच कुटुंब आणि मित्रमंडळीतील नातीही मजबूत करतो.
अंक #7 हा अंक खूपच मजबूत मानला जातो. मुख्य म्हणझे विद्यार्थ्यांसाठी हा अंक चांगला आहे. हा तुम्हाला स्थिरता प्रदान करेल आणि संतुलित जीवन देईल.
अंक #8 हा अंक त्यांच्यासाठी चांगला आहे, ज्यांचा स्वतःचा बिझनेस आहे. कारण हा अंक धन आकर्षित करतो. हा तुमच्या आयुष्यावर सकारात्मक प्रभाव टाकेल.
अंक #9 हा अंक दोन प्रकारे विशेष आहे कारण हा अंक आदर्श आणि दया भावना घेऊन येतो. हा अंक येणाऱ्यांना भाग्याची साथ मिळते
मग पुढच्या मोबाईल नंबर निवडताना आधी अंक बेरीज नक्की करून पाहा. म्हणजे तो अंक तुमच्या पर्सनॅलिटीला सूट होतो की नाही ते कळेल.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देत आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.