ADVERTISEMENT
home / मनोरंजन
सलमानच्या फॅनने ‘भारत’साठी बुक केलं संपूर्ण थिएटर

सलमानच्या फॅनने ‘भारत’साठी बुक केलं संपूर्ण थिएटर

बॉलीवूडचा भाईजान सलमानच्या भारत चित्रपटाची चाहते अगदी आतूरतेने वाट पाहत आहेत. दरवर्षी ईदच्या मुहूर्तावर सलमानचा चित्रपट प्रदर्शित होतो. सलमानचा चाहता वर्ग फार मोठा आहे. फॅन्स सलमानच्या चित्रपटाच्या फर्स्ट डे फर्स्ट शोसाठी चाहते फारच उत्सुक असतात. यंदा पाच जूनला सलमानचा आगामी चित्रपट भारत प्रदर्शित होत आहे. भारतच्या अॅडवान्स बूकिंगची सुरूवात झाली आहे. आश्चर्य म्हणजे या चित्रपटासाठी सलमानच्या फॅनने संपूर्ण थिएटरच बुक केलं आहे. त्यामुळे या फॅनची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

salman fan

सलमानवर प्रेम करणारा त्याचा सच्चा चाहता

सलमानच्या या फॅनचं नाव आशिष सिंघल असं आहे. आशिष नेहमी सलमानचे सर्व चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शोच बघतो. आशिष नाशिकमध्ये राहत असून भारतसाठी त्याने नाशिकमधील एक संपूर्ण थिएटर बुक केलं आहे. आशिष नेहमी त्याच्या सर्व मित्रांना चित्रपट पाहण्यासाठी घेऊन जातो. भारतसाठी संपूर्ण थिएटर बुक केल्यामुळे सलमानचा हा फॅन सध्या लोकप्रिय होत आहे.

सलमानच्या भारतची चाहत्यांना प्रतिक्षा

सलमान खानच्या ‘भारत’ची चर्चा सर्वत्र सुरू आहे. या वर्षाच्या सुरूवातीलाच.प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारतचं टिझर रिलीज झालं होतं या टिझरमधील सलमानची दमदार एंट्री आणि जबरदस्त डायलॉगमुळे चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रंचड उत्सुकता निर्माण झाली. टीझर आणि ट्रेलर पाहून चित्रपट नेहमीपेक्षा वेगळा आणि हिट होणार अशी चर्चा आहे. सलमान खानच्या यामध्ये वीस वर्षापासून ते साठ वर्षांपर्यंतच्या पाच विविध भूमिका असणार आहेत. भारतमध्ये अभिनेता जॅकी श्रॉफ, तब्बू, कतरीना कैफ आणि दिशा पटनी अशी स्टारकास्ट असणार आहे. देशप्रेमावर आधारित या चित्रपटाचं कथानक सत्तरच्या दशकातील असण्याची शक्यता आहे. शिवाय या चित्रपटात भारताच्या स्वातंत्र्यापासून आतापर्यंतची कहाणी दाखवली जाणार आहे. या चित्रपटामुळे पुन्हा एकदा अली अब्बास जाफर, कतरिता आणि सलमान खान हे त्रिकूट या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येत असून आतापर्यंत या त्रिकूटाने केलेल सर्व चित्रपट हिट ठरले आहेत. त्यामुळे या चित्रपटकडूनही प्रेक्षकांना खूपच अपेक्षा आहेत.

ADVERTISEMENT

salman fan %281%29

भारत सलमान – कतरिनाचा सहावा चित्रपट

सलमान आणि कतरिनाची जोडी नेहमीच हीट जोडी ठरते. त्या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना फार आवडते. सलमान आणि कतरिनाने यापूर्वी पाच चित्रपटात एकत्र काम केले असून या दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.  मैंने प्यार क्यू किया, पार्टनर, टायगर, टायगर जिंदा है, युवराज या पाचही चित्रपटांमध्ये या जोडीने एकत्र काम केलं होतं. भारत हा त्या दोघांचा एकत्र काम करत असलेला सहावा चित्रपट असणार आहे.

salman fan 1

दीपिका आणि रणबीरच्या या व्हिडिओ केली या चित्रपटाची आठवण ताजी

ADVERTISEMENT

चीनमध्ये हृतिक ठरला ‘दा शुई’, चीनच्या प्रेक्षकांना आवडला काबिल

अमिताभ बच्चन यांचा चेहरे’ चित्रपटातील लुक व्हायरल

फोटोसौजन्य –  इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक

 

ADVERTISEMENT
02 Jun 2019
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT