आराध्या बच्चन पुन्हा ट्रोल, ‘हा’ फोटो पाहून नेटिझन्स म्हणाले…

आराध्या बच्चन पुन्हा ट्रोल, ‘हा’ फोटो पाहून नेटिझन्स म्हणाले…

बॉलिवूड कलाकार तसंच त्यांच्या कुटुंबीयांसाठी सोशल मीडिया ‘ट्रोल’ होणं ही बाब आता नित्याचीच झाली आहे. जास्त मेकअप करण्यापासून ते मेकअप न करण्यापर्यंत, कपड्यांपासून ते दागिन्यांपर्यंत...जवळपास छोट्या-मोठ्या सर्वच गोष्टींवरून स्टार्संना ट्रोल केलं जातं. कलाकार मंडळींच्या लहान मुलांचीही यापासून सुटका झालेली नाही. ट्रोलर्संकडून ऐश्वर्या राय-बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांची कन्या आराध्याला पुन्हा (Aaradhya Bachchan) टार्गेट करण्यात आलं आहे. 

आराध्याच्या फोटोवर नेटिझन्सनी नोंदवला आक्षेप

ऐश्वर्या आणि अभिषेकनं 16 नोव्हेंबरला मुलगी आराध्याचा आठवा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला. ग्रँड पार्टीमध्ये बॉलिवूडमधील कित्येक सिनेतारे-तारकांनी आवर्जून हजेरी लावली होती. बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या निवासस्थानी झालेल्या धमाकेदार पार्टीचे काही इनसाइड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याच फोटोवरून आराध्याला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. आराध्याला करण्यात आलेल्या अति मेकअपमुळे तिच्यासह ऐश्वर्या-अभिषेकवरही टीकांसह सूचनांचा भडीमार होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये ऐश्वर्या, अभिषेक आणि आराध्या आकाश पाळण्यात (Giant Wheel) बसल्याचं दिसत आहे. याच फोटोमुळे ट्रोलर्सना आयती संधी मिळाली. वाढदिवशी छोट्या आराध्यानं सुंदर ड्रेस आणि मेकअपदेखील केला होता. इतक्या लहान वयात आराध्याच्या चेहऱ्यावर अतिप्रमाणात मेकअप दिसल्यानं तिला ट्रोल केलं जात आहे. यावर अनेक युजर्संकडून आक्षेप देखील नोंदवण्यात आला आहे. 

(वाचा : नखरे नाही तर ‘या’मुळे कृतिनं सोडला अमिताभ बच्चन यांचा ‘चेहरे’ सिनेमा)

 

मायलेकी कायम ट्रोलर्सच्या निशाण्यावर

एका युजरनं लिहिलं की, ‘ यांची मुलगी एवढी लहान आहे. पालकांना तिचा मेकअप करण्याची आवश्यकता का भासली?’  दरम्यान, यापूर्वीही आराध्या आणि ऐश्वर्याला बऱ्याचदा ट्रोल केलं गेलं आहे. आराध्याच्या शाळेतल्या फंक्शनमधील डान्स व्हिडीओ असो किंवा तिचं आई-बाबांबरोबर आऊटिंग असो. आपल्या आईपासून कधीही दूर न होणारी आराध्या आणि चुकूनही मुलीचा हात न सोडणाऱ्या ऐश्वर्याला ‘ओव्हर प्रोटेक्टिव्ह’वरूनही टार्गेट केलं गेलं. 

(वाचा : वैभव तत्ववादी पडलाय 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात)

 

Viral : ऐश्वर्या राय देणार गोड बातमी?

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या आणि अभिषेक वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले होते. एका व्हायरल फोटोवरून अभि-ऐशकडे पुन्हा एकदा गुड न्यूज आहे का? असा प्रश्न सर्वांना पडला होता. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये ऐश्‍वर्याची ड्रेसिंग स्‍टाईल पाहून ती प्रेग्‍नेंट (Aishwarya Rai Pregnency) असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. नुकतीच अंबानींकडे झालेल्या पार्टीमध्ये ऐश्वर्या आणि अभिषेकनं हजेरी लावली होती. मुकेश अंबानींची बहीण नीना कोठारी यांची मुलगी नयनताराच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनसाठी ही पार्टी ठेवण्यात आली होती. या पार्टीमध्ये अभिषेक ब्लॅक सूटमध्ये तर ऐश्वर्याने फॅशन डिझाइनर सब्यसाचीच्या रेड आणि गोल्डन डिझाइनर सूट परिधान केला होता. या फोटोमध्ये ऐश्वर्याने ओढणीने पोट झाकलं होतं. त्यामुळे हा फोटो सोशल मीडियावर येताच युजर्सनी लगेचच ऐश्वर्याच्या प्रेग्नेंसीबाबत प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. ऐश्वर्या बेबी बंप लवपण्यासाठी प्रयत्न केल्याचं अनेक युजर्संनं  म्हटलं. 

(वाचा : ‘Good Newwz’च्या टायटलमध्ये का वापरलं चुकीचं स्पेलिंग, करण जोहर म्हणाला…)

View this post on Instagram

✨❤️MINE💖✨🌈💝🥰🌟😘LOVE

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

लाइमलाइटपासून दूर असण्यानेही शंका

कामाच्या बाबतीत म्हणायचं झाल्यास ऐश सध्या सिनेमांमध्येही दिसत नाही. नुकत्याच येऊन गेलेल्या हॉलिवूड अभिनेत्री अँजलिना जोलीच्या 'Maleficent: Mistress Of Evil' या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनला ऐश्वर्याने आवाज दिला होता. 2014 साली आलेल्या ‘मेलफिसंट’ या सिनेमाचा हा सीक्वेल होता. ज्यामध्ये अँजलिनाची प्रमुख भूमिका होती. तिच्यासोबत या चित्रपटात एली फॅनिंग, सॅम रिले, इमेल्डा स्टॉन्टन, जूना टेम्पल, लेसले मेनविले हेही होते.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.