सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन आणि अभिनेत्री चारू असोपा यांनी गेल्यावर्षी जूनमध्ये लग्न केलं. मात्र एक वर्षाच्या आत यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. काही महिन्यांपासून हे दोघेही वेगळे राहात आहेत. चारू मुंबईत एकटी आहे तर राजीव दिल्लीमध्ये आहे. दोघांच्या खासगी आयुष्याबद्दल खूपच चर्चा रंगली होती. दोघांनीही या बाबतीत आपली बाजू सांगितली असून राजीवच्या म्हणण्यानुसार लग्नामध्ये काहीही अडचण नाही. तर चारूने पोस्ट केलेल्या शेअरनुसार चारू मात्र राजीववर नक्कीच नाराज असल्याचं दिसून येत आहे. पण आता चारूच्या पोस्टवर राजीवने कमेंट केली असून दोघांमधील दुरावा आता कमी होत चालला असल्याचं दिसून येत आहे.
चारूच्या फोटोंवर राजीवची कमेंट
वास्तविक चारू सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर आपले फोटो चारू नेहमीच शेअर करत असते आणि नेहमीच आपल्या भावना शायरीच्या माध्यमातून मांडत असते. नुकतेच चारूने दोन हॉट फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आणि ‘खैरीयत नहीं पूछते मेरी, मगर खबर रखते हैं, मैंने सुना है की वो मुझ पर नजर रखते है’ अशी कॅप्शन दिली. चारूने पोस्ट केलेल्या या फोटोवर राजीव कमेंट करण्यास स्वतःला रोखू शकला नाही. आपल्या बायकोच्या फोटोवर कमेंट करताना राजीवने लिहिले, ‘काय करणार तुझ्याबद्दल जाणून तर घ्यावंच लागणार, इतकी चंचल आहेस तू चारू असोपा’. या राजीवच्या कमेंटवर चारूनेही रिप्लाय देत दोघांमधील दुरावा हळूहळू कमी होत चालला असल्याची जाणीव करून दिली आहे. चारू यावर म्हणाली, ‘जाणून घेणं नक्कीच चांगली गोष्ट आहे मिस्टर ब्योमकेश बक्षी…पण कधीतरी काळजी पण करत जा’
एक वर्षात सुश्मिता सेनचा भाऊ होणार पत्नीपासून वेगळा, नात्यात दुरावा
दोघांनीही नात्यातील कडवटपणा केला होता स्पष्ट
बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेनचा भाऊ राजीव आणि त्याची पत्नी अभिनेत्री चारू असोपाने वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याच्या बातम्या आता समोर येत होत्या. वास्तविक दोघांनीही आपल्या इन्स्टाग्रामवरून लग्नाचे फोटो डिलीट केले. त्यानंतरच ते दोघेही वेगळे झाले असल्याचा कयास बांधला जात होता. लग्नाच्या एका वर्षातच दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात होते. राजीवला एका वृत्तपत्राने लग्नाचा फोटो का डिलीट केला विचारले असता त्याने आपण याविषयी बोलू शकत नाही. मात्र मी सध्या खूपच आनंदी असल्याचे मात्र आवर्जून सांगितलं होतं. तर चारूने एका मुलाखतीमध्ये ‘राजीव दिल्लीत आहे आणि मी इथे एकटी आहे हे सर्वांनाच माहीत आहे. याशिवाय मी आता देवाला विचारत आहे की पुढे काय? मी स्वतःदेखील देवाच्या इशाऱ्याची वाट पाहात आहे’ असं सांगितलं होतं. मात्र आता दोघांमधील संवाद पाहता लवकरच दोघे पुन्हा लवकर एकत्र येतील अशी आशा त्यांच्या चाहत्यांना वाटत आहे.
सुश्मिता सेनच्या भावाला मिळाली बिग बॉस 14 ची ऑफर, राजीवची आहे एक अट
राजीव आपल्या कामानिमित्त दिल्लीला
मागच्या वर्षी 8 जूनला राजीव आणि चारूने कोर्ट मॅरेज केले आणि त्यानंतर गोव्यात 16 जूनला दोघांनी पारंपरिक पद्धतीने लग्न केले होते. त्याआधी एक वर्ष दोघांनी एकमेकांना जाणून घेतले होते. मात्र आता एक वर्षातच दोघांच्या नात्यात दुरावा आला असून वेगळे होत असल्याचे चित्र समोर येत होतं. पण नक्की या दोघांमध्ये काय बिघडले आहे हे मात्र समोर आले नाही. चारूने आतापर्यंत ‘कर्ण संगिनी’, ‘देवों के देव महादेव’, ‘टशन-ए-इश्क’, ‘जीजी माँ’, ‘बडे अच्छे लगते है’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘अगले जनम मोहे बिटीया ही किजो’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तर राजीव सेन हा मॉडल आणि उद्योगपती असून आपल्या कामानिमित्त दिल्लीला असल्याचंही त्याने सांगितलं आहे.
सुश्मिता सेननंतर तिच्या भावाच्या नात्यात दुरावा,प्रसिद्धीसाठीचा हा दिखावा
घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा