हर्षवर्धन राणे आणि किम शर्मामध्ये झाला का ब्रेकअप

हर्षवर्धन राणे आणि किम शर्मामध्ये झाला का ब्रेकअप

फोटोत दिसणार हे सुंदर कपल आता मात्र दुरावल्याचं कळतंय. सूत्रानुसार, गेल्या काही दिवसापासून अभिनेत्री किम शर्मा आणि ‘सनम तेरी कसम’मधील अभिनेता हर्षवर्धन राणे यांच्यात आलबेल नाही. काही दिवसांपूर्वी किम आणि हर्षवर्धन एकत्र दिसले होते. पण आता पुन्हा एकदा त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या चर्चेत आहेत.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Je t’aime ❤️


A post shared by Kim Sharma (@kimsharmaofficial) on
काही दिवसांपूर्वी ज्यांचं इन्स्टा अकाऊंट प्रेमाची साक्ष देणाऱ्या फोटोजनी सजलं होतं. ते आज एकमेकांना सोशल मीडियावर फॉलोही करत नाहीत. हो.. या दोघांनीही आता सोशल मीडियावर एकमेंकांना अनफॉलो केलं आहे. एवढंच नाहीतर किमने नुकतंच एका पोस्टमध्ये हेही म्हटलं की, रिलेशनशिपपेक्षा मैत्री बरी.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Happy Birthday baby🎂❤️. Shine on 🌟


A post shared by Kim Sharma (@kimsharmaofficial) on
आता या ब्रेकअपमागील कारण काय आहे हे अजून तरी कळलेलं नाही. पण या दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांमध्ये निर्माण केलेली भिंत बरंच काही सांगत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये दोघांची मैत्रीही कमी झाल्याचं दिसलं होतं.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Feliz Navidad from me and mine. Have a blessed and joyful day my lovelies 🥰🎅


A post shared by Kim Sharma (@kimsharmaofficial) on
सुरूवातील आपलं नातं लपवणार हे जोडपं नंतर मात्र सोशल मीडियावरही आपलं प्रेम दाखवत होतं. हे लव्ह बर्डस बाईक राईडपासून ते अगदी हॉलीडेपर्यंत एकमेंकासोबत दिसायचे. एवढंच नाहीतर एअरपोर्ट हे जोडपं एकत्र दिसलं होतं.

हर्षवर्धन राणे हा चित्रपट 'सनम तेरी कसम' मध्ये दिसला होता. त्यानंतर 'पलटन' या चित्रपटातही झळकला होता. दुसरीकडे किम शर्माबाबत बोलायचं झाल्यास ती मात्र मोठ्या पडद्यावर काही कमाल करू शकली नाही. पण तिच्या अफेअर्समुळे मात्र नेहमीच चर्चेत राहीली आहे.


बॉलीवूडमध्ये असं बरेचदा दिसून येतं की, कपल्स काही कारणास्तव ब्रेक घेतात आणि नंतर परत एकत्र दिसतात. त्यामुळे किम आणि हर्षच्या फॅन्सनाही अपेक्षा ठेवायला हरकत नाही.


हेही वाचा -


ब्रेकअप झाल्यावर पाहा ‘या’ 45 मूव्हीज


ब्रेकअपनंतर ‘या’ अभिनेत्री झाल्या अधिक Bold and Beautiful


ब्रेकअपसाठी व्हॉट्सअॅप आणि फेसबुक स्टेट्स