घरच्यांच्या आठवणीने स्पृहा झाली भावूक

घरच्यांच्या आठवणीने स्पृहा झाली भावूक

दिवाळी हा सणच एकत्र मिळून साजरा करण्याचा आहे. त्यामुळे दिवाळी सणाला तरी आपल्या व्यस्त टाईमटेबलमधून थोडा वेळ काढण्याचा आणि आपल्या घरच्यांसोबत राहण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करतो. सेलिब्रिटीजच्याबाबतीतही हेच लागू असलं तरी बरेचदा अनेक सेलिब्रिटीजना शूटमुळे किंवा दिवाळी विशेष कार्यक्रमांमुळे हे शक्य होत नाही. असंच काहीसं झालं आहे मराठीतील अभिनेत्री आणि कवियित्री स्पृहा जोशी (Spruha Joshi) बाबत.

स्पृहाची घरापासून दूर दिवाळी

अभिनेत्री स्पृहा जोशीसुध्दा दरवर्षी न चुकता आपल्या घरच्यांसोबतच दिवाळी साजरी करते. पण यंदाची तिची दिवाळी मात्र याला अपवाद आहे. स्पृहा यंदाची दिवाळी तिच्या घरच्यांसोबत साजरी करू शकणार नाहीयं. ती एकटी भोपाळला असणार आहे आणि त्यामुळे ती सध्या तिच्या घरच्यांना खूप मिस करत आहे.

काय आहे नेमकं कारण

अभिनेत्री स्पृहा जोशी याबाबत विचारलं असता तिने यामागील कारण POPxoMarathi ला सांगितलं की, “सध्या मी भोपाळमध्ये माझ्या आगामी हिंदी वेबसीरिजच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. लवकरच ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने सध्या वेगाने चित्रीकरणाचे काम सुरू आहे. इथे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फक्त अर्ध्या दिवसाची सुट्टी होती. त्यामुळे आसपास राहणारे अनेक कलाकार आणि तंत्रज्ञ त्यांच्या घरी गेले. पण भोपाळपासून मुंबई खूप दूर असल्याने मला घरी पोहोचणं शक्य नव्हतं. त्यामुळे मी दिवाळीत भोपाळला अगदी एकटी आहे.”

घरच्यांच्या आठवणीने स्पृहा झाली भावूक

दिवाळी आपल्या प्रत्येकालाच आवडते आणि याला अपवाद स्पृहाही नाही. दिवाळीबाबत स्पृहा जोशी सांगते की, “खरंतर दिवाळी हा माझा सर्वात आवडता सण आहे. आजवरचा इतक्या वर्षांचा माझा नियम होता की, दिवाळीला तर घरीच राहायचं. पण यंदा मात्र पहिल्यांदाच घरच्यांपासून दूर एकटीच दिवाळीत राहत असल्याने मन भरून आलंय. अशावेळी जाणवतं की, सणाच्या दिवशी आपली माणसं जवळ असणं किती महत्वाचं असतं. मला घरच्यांची खूप आठवण येतेय.”

स्पृहाची घौडदौड

तर दिवाळी जरी घरच्यांसोबत साजरी करता येणार नसली तरी स्पृहाच्या करिअरसाठी ही दिवाळी नक्कीच वेगळी ठरणार आहे. स्पृहा अभिनय करणार असलेली ही तिची दुसरी वेबसीरिज असेल. मात्र या वेबसीरिजचं नाव #RangbaazPhirse असं असून तिच्या भूमिकेबाबतची अजून काही माहिती समोर आलेली नाही. ही वेबसीरिज डिसेंबरमध्ये येत आहे. या आधी तिने 'द ऑफिस' वेबसीरिजमध्ये काम केलं होतं. त्यासोबतच ती सध्या सूर नवा ध्यास नवा हा संगीत रिएलिटी शोसुद्धा होस्ट करत आहे. तसंच तिचा विक्की वेलिंगकर हा सिनेमासुद्धा डिसेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

 

स्पृहा ही नेहमीच दर्जेदार चित्रपटांमध्ये काम करण्यासोबतच कामामध्ये विविधता आणताना दिसून येते. मग हिंदी वेबसीरिज करणं असो किंवा रिएलिटी शो करणं असो. त्यामुळे स्पृहाला कोणत्याही एका प्रकारच्या भूमिकांमध्ये न अडकता वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहणं तिच्या फॅन्सनाही नक्कीच कौतुकास्पद आहे.

बेस्ट ऑफ लक आणि हॅपी दिवाळी Spruha Joshi.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.