ADVERTISEMENT
home / मनोरंजन
मणिरत्नमच्या आगामी चित्रपटात ऐश्वर्या साकारणार खलनायिका

मणिरत्नमच्या आगामी चित्रपटात ऐश्वर्या साकारणार खलनायिका

विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन आणि फिल्ममेकर मणिरत्नम यांनी एकत्र अनेक हिट चित्रपट केले आहेत.  त्यामुळेचाहते या दोघांना पुन्हा एकदा एकत्र काम करताना पाहण्यासाठी नक्कीच उत्सुक आहेत. आता पुन्हा एकदा मणिरत्नमच्या आगामी चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन झळकणार आहे. मणिरत्नम यांच्या पिरिएड ड्रामा या आगामी चित्रपटात ऐश्वर्या रायची नकारात्मक भूमिका असणार आहे.

aishwarya rai bachchan

पिरिएड ड्रामा एक ऐतिहासिक चित्रपट

पिरिएड ड्रामा चित्रपट दहाव्या शतकातील कथा दाखविण्यात येणार आहे. हा चित्रपट पेन्नियिन या कांदबरीवर आधारित आहे. त्यामुळे या चित्रपटात चोळ साम्राज्य  आणि त्याचील राजकारण पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. या चित्रपटात ऐश्वर्या नंदिनीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातील ऐश्वर्याची भूमिका फारच गुढ आणि अॅंग्री वुमनची असणार आहे. नंदिनी तिच्या पतीच्या मदतीने चोळ साम्राज्याचा सर्वनाश करण्याचा प्रयत्न करते.  मागे घडलेल्या काही गोष्टींचा बदला घेण्यासाठी ती असा प्रयत्न करते असं या चित्रपटात दाखविण्यात येणार आहे. कथानक ऐतिहासिक असलं तरी या निमित्ताने ऐश्वर्या एका खलनायिकेची भूमिका साकारत आहे. या आधी ऐश्वर्यांने खाकी आणि धूम 2 मध्ये नकारात्मक छटा असलेल्या भूमिका साकारल्या होत्या.

मागच्या अनुभवातून घेतेय धडा

aishwarya rai 1

ADVERTISEMENT

ऐश्वर्या राय बच्चनने मुलीच्या जन्मानंतर बॉलीवूडमध्ये काम करणं फारच कमी केलं आहे. ती अगदी मोजक्याच चित्रपटात त्यानंतर दिसली होती. मागील वर्षी तिचा अनिल कपूर आणि राजकुमार रावसोबतचा फन्ने खान बॉक्सऑफिसवर विशेष कमाल दाखवू शकला नाही. या चित्रपटाच्या आधी ऐ दिल है मुश्किलमध्ये ती रणबीर कपूरसोबत एका छोट्याशा भूमिकेत दिसली होती. या चित्रपटातदेखील तिने नेहमीपेक्षा वेगळं काम करण्याचा प्रयत्न केला होता. यावरून ती नेहमीच्या भूमिकांपेक्षा वेगळं काम करण्याच्या शोधात असल्याचं दिसून येतं. मागील चित्रपटाच्या अपयशानंतर ती जाणिवपूर्वक भूमिका निवडत  असल्याचंदेखील वाटत आहे. परिएड ड्रामामधून कदाचित तिच्या अभिनयातील निराळ्या आणि नकारात्मक छटा पाहता येतील अशी आशा आहे.

ऐश्वर्या आणि मणिरत्नमची मैत्री

ऐश्वर्यांने मणिरत्नम यांच्या इरूवर या दाक्षिणात्य चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. आता करिअरच्या या वळणावर ती पुन्हा एकदा मणिरत्नमसोबत काम करत आहे. सहाजिकच ऐश आणि मणिच्या या मैत्रीचा या चित्रपटाच्या यशावर नक्कीच चांगला परिणाम दिसून येईल.

ऐश्वर्याची डुप्लिकेट सोशल मीडियावर व्हायरल

aishwarya rai duplicate

ऐश्वर्या रॉय बच्चन हिच्यासारखी दिसणारी एक मॉडेल मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महलाघा जबेरी ही इराणी मॉडेल हुबेहुब दिसणारी आणि तिच्याइतकीच सुंदर आहे. सोशल मीडियावर ऐश्वर्याची ती कार्बन कॉपी आहे असं म्हटलं जात आहे. महलाना इराणमध्ये मॉडेलिंग करत आहे. सोशल मीडियावर ती खूप अॅक्टिव्ह असून तिचा चाहता वर्गही फार मोठा आहे.महलाघा जबेरी प्रमाणे काही दिवसांपूर्वी अभिनेत्री स्नेहा उल्लालदेखील ऐश्वर्याप्रमाणे दिसत असल्याची चर्चा रंगली होती. स्नेहाने सलमान खानच्या लकी या चित्रपटातून पदार्पण केलं होतं.

ADVERTISEMENT

संजीवनी’चे डाॅक्टर्स करणार आता ‘इश्कबाजी’

गुलाबो सिताबो’ चित्रपटात अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराना एकत्र

कान्समध्ये दिसला कोमोलिकाचा जलवा

फोटोसौजन्य –  इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

 

16 May 2019
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT