अक्षय कुमारचा 'सुर्यवंशी'मधील फर्स्ट लुक रिलीज

अक्षय कुमारचा 'सुर्यवंशी'मधील फर्स्ट लुक रिलीज

रोहीत शेट्टीच्या ब्लॉकब्लस्टर ‘सिम्बा’मध्ये त्याच्या आगामी चित्रपट ‘सुर्यवंशी’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. नुकतच या चित्रपटाचा फर्स्ट लुक सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. 'सिंघम' आणि 'सिम्बा'च्या तुफान यशानंतर आता रोहीत शेट्टीचा 'सुर्यवंशी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या  चित्रपटात बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ‘ए बुलेट फॉर बुलेट’ असं या चित्रपटाचं टॅगलाईन आहे. सुर्यवंशी चित्रपटाची निर्मिती करण जोहर आणि रोहीत शेट्टी करत आहेत. 2020 मध्ये ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सिंघम आणि सिम्बामधील पोलिसाच्या भुमिकेतील अजय देवगन आणि रणवीर सिंगला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. आता सुर्यवंशीमध्ये अक्षयची भूमिका नेमकी कशी असेल याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. रोहित शेट्टीचा अंदाज प्रत्येक चित्रपटामध्ये हटके असतो.  शिवाय अक्षयकुमार पहिल्यांदाच रोहितबरोबर सुर्यवंशीमध्ये काम करत आहे. त्यामुळे या चित्रपटाबाबत प्रंचड उत्सुकता लागली आहे. सिम्बामधील ‘सूर्यवंशी’ची पहिली झलक पाहिल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये याबाबत प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे.

अक्षय कुमारचं 'बिझी' शेड्यूल


अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेल्या धर्मा प्रॉडक्शनचा ‘केसरी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे अक्षय या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. केसरीमध्ये तो सीख योद्धाची नेहमीपेक्षा वेगळी आणि ऐतिहासिक भूमिका साकारत आहे. शिवाय त्यानंतर तो करिनासोबत ‘गुडन्यूज’च्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे. या चित्रपटाममध्ये अक्षय आणि करिनासोबतच दिलजीत दोसांझ आणि कियारा अडवाणीदेखील दिसणार आहेत. मे मध्ये अक्षयचा ‘हाऊसफुल 4 हा चित्रपट येत आहे. शिवाय ‘मिशन मंगल’ देखील ऑगस्ट - सप्टेंबरदरम्यान प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.या वर्षअखेरीस तो हेराफेरी 3 च्या शूटिंगला सुरूवात करणार अशी चर्चा आहे. या  चित्रपटात अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनिल शेट्टी पुन्हा एकदा एकत्र दिसणार असल्याने चाहते खूपच खूश आहेत. अक्की एकाच वेळी अनेक चित्रपटात काम करत असल्यामुळे तो सध्या शूटिंगमध्ये बिझी आहे हे मात्र नक्की.

 


करण जोहर आणि रोहीत शेट्टी 'सुर्यवंशी'साठी सज्ज


रोहित शेट्टी सध्या ‘खतरों के खिलाडी’मध्ये व्यस्त आहे. नुकतच रिलीज झालेल्या सुर्यवंशीच्या पोेस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये रोहीत शेट्टीचे अफलातून दिग्दर्शन आणि अक्षयच्या अॅक्शन ड्रामा पाहण्याची क्रेझ वाढत आहे. त्यामुळे 2020 मध्ये सिंघम आणि सिम्बाप्रमाणे सुर्यवंशीचा अॅक्शन ड्राम चाहत्यांना दिसणार आहे.
'सूर सपाटा'चा दिमाखात रंगला ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळा


कोण होणार करोडपतीचा नवा होस्ट...मराठी प्रेक्षकांना सरप्राईज!


#StrengthOfAWoman : दीपिका पादुकोण, सोनम कपूरसारख्या अनेक बॉलीवूड अभिनेत्रींचा आहे वेगळा बिझनेस


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम