कार्तिकसोबत बोल्ड सीन्स देण्यास माझी काहीच हरकत नाही

कार्तिकसोबत बोल्ड सीन्स देण्यास माझी काहीच हरकत नाही

बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या प्रेक्षकांच्या आणि खासकरून फिमेल फॅन्सच्या गळ्यातला ताईत झाला आहे. आता जो प्रेक्षकांचा फेव्हरेट आहे तोच बॉलीवूडमधल्या अभिनेत्रींच्या फेव्हरेट लिस्टमध्ये असणं साहजिक आहे. त्यामुळे कार्तिक सध्या नव्या जनरेशनच्या अभिनेत्रींच्या हॉट फेव्हरेटमध्ये आहे. सारा अली खानपासून ते अनन्या पांडे ते जान्हवी कपूरपर्यंत सर्वांनाच कार्तिक पसंत असल्याचं जाहीर केलं आहे. आता या लिस्टमध्ये अजून एका नव्या अभिनेत्रीचं नावही अॅड झालं आहे. ती अभिनेत्री म्हणजे पूजा बेदीची मुलगी अलाया फर्निचरवाला.

डेब्यूआधीच अलायाचं बोल्ड स्टेटमेंट

अलाया फर्नीचरवाला लवकरच सैफ अली खानसोबत जवानी जानेमन या चित्रपटात झळकणार आहे. अलायाचा हा डेब्यू सिनेमा असून ती या चित्रपटात सैफ अली खानच्या मुलीच्या भूमिकेत दिसेल. अलाया आजकाल तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये जबरदस्त बिझी आहे. याच दरम्यान एका चॅट शोमध्ये तिने लव आज कल या चित्रपटाबाबत आपलं मत मांडलं की, कार्तिक आर्यन आणि सारा अली खानचा बोल्ड सीन तिला खूपच आवडला. एवढंच नाहीतर तिने असा बोल्ड सीन देण्यास काहीच हरकत नाही, असंही म्हटलं.

कार्तिकसोबत बोल्ड सीन

या चॅट शोमध्ये अलायाला विचारण्यात आलं होतं की, जर कार्तिक आर्यन जर एक दिवस जर तिच्या बेडरूममध्ये दिसला तर तिची काय प्रतिक्रिया असेल. त्यावर अलायाने उत्तर दिलं की, मला कार्तिकला माझ्या बेडरूममध्ये पाहून आश्चर्य वाटणार नाही. तसंच लव आज कल ट्रेलरमधील कार्तिक आणि सारासारखा बोल्ड सीन करण्यास काहीच हरकत नाही असं तिने सांगितलं. त्यानंतर तिला हेही विचारण्यात आलं की, तिच्याकडे असं काय आहे जे अनन्या पांडेकडे नाहीयं. यावर तिने अगदी चपखल उत्तर देत सांगितलं की, अनन्याकडे नेपोटिझम चांगलं उत्तर नाहीयं पण माझ्याकडे आहे.

वरुण धवनशी लग्नाची स्वप्नं

View this post on Instagram

😜

A post shared by Alaya F (@alaya.f) on

एवढंच नाहीतर अलाया फर्नीचरवालाने सांगितलं की, तिला वरूण धवनशी लग्न करायला आवडलं असतं. पण वरूण धवनचं शुभमंगल आधीच ठरल्याने बिचाऱ्या अलायाला ते करणं आता शक्य नाही. असो अलायाचा पहिलावहिला डेब्यू सिनेमा जवानी जानेमन लवकरच रिलीज होणार असून यात तिच्या आईच्या भूमिकेत तब्बू आणि वडिलांच्या भूमिकेत सैफ अली खान दिसणार आहे. सूत्रानुसार, अलाया आधी या भूमिकेसाठी सारा अली खानचा विचार केला जात होता. मात्र नंतर साराऐवजी अलायाची वर्णी लागली. पण अलायाने तिच्या डेब्यूआधीच ती तिच्या आईप्रमाणेच बोल्ड असल्याचं दाखवून दिलं आहे. तिने आईच्या दुसऱ्या लग्नाबाबतही उघडपणे उत्तर दिली आणि सांगितलं की, तिच्या आईचं लवकरच लग्न होणार असून ती व्यक्ती मला आणि माझ्या भावालाही आवडते. 


बेस्ट ऑफ लक अलाया.