ADVERTISEMENT
home / मनोरंजन
‘गुलाबो सिताबो’ चित्रपटात अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराना  एकत्र

‘गुलाबो सिताबो’ चित्रपटात अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराना  एकत्र

शूजीत सरकार दिग्दर्शित यांचा आगामी चित्रपट गुलाबो सिताबो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच दोन पिढ्यांचे दिग्गज अभिनेते एकत्र दिसणार आहेत. महानायक अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराना एकत्र काम करणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना पहिल्यांदाच या दोघांच्या अभिनयाची एक अनोखी जुगलबंदी पाहता येणार आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांचे अनेक चाहते आहेत. गेली अनेक दशकं ते प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. आयुषमान खुराना याचा देखील एक खास चाहता वर्ग सध्या निर्माण झाला आहे. मागील वर्षी त्याचा बधाई हो, अंधाधुन यासारखे हिट चित्रपट दिले आहेत. शिवाय आयुषमानने शुजीतच्या विकी डोनर या एका हटके विषयावरील चित्रपटात काम केलं होतं. विकी डोनरमधील आयुषमानच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते. आता आयुषमान बिग बी सोबत झळकणार असल्यामुळे त्याच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे. म्हणूनच आयुषमानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या भावना अशा पद्धतीने व्यक्त केल्या आहेत. या पोस्ट मध्ये त्याने माझी आणि अमिताभ बच्चन सरांची जोडी अगदी गुलाबो सिताबो सारखी असेल असं  म्हटलं आहे. शिवाय या चित्रपटासाठी तो फार उत्सुक असून त्याने यात दिग्दर्शिक आणि त्याचे मेटॉंर शुजीत सरकार यांचे आभार व्यक्त केले आहेत.

‘गुलाबो सिताबो’ नोव्हेंबरमध्ये होणार प्रदर्शित

या वर्षांच्या नोव्हेंबर महिन्यात गुलाबो सिताबो हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. शूजीत सरकारचे चित्रपट नेहमीच वेगळ्या धाटणीचे असतात. या चित्रपटाचे कथानक जुही चतुर्वेदी आणि सुजीत यांनी केले आहे. शिवाय गुलाबो सिताबोची निर्मिती रॉनी लाहेरी आणि शील कुमार करत आहेत. हा चित्रपट उत्तर प्रदेशच्या बोली भाषेवर आधारित असणार आहे. नावावरूनच या चित्रपटात भरपूर कॉमेडी असण्याची शक्यता आहे असं वाटत आहे. या चित्रपटात अमिताभ आणि आयुषमान यांच्यासोबत कोण अभिनेत्री स्क्रीन शेअर करणार हे अद्याप उघड करण्यात आलेलं नाही. मात्र या चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरूवात होणार आहे हे मात्र नक्की .शुजीत सरकार सध्या विकी कौशल सोबत उधम सिंग या बायोपिकच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या शूटिंगनंतर तो लगेचच गुलाहो सिताबोच्या शूटिंगला सुरूवात करणार आहे.

शूजितचे आगामी चित्रपट देखील असतील का हिट

शूजीत सरकारने आतापर्यंत अनेक वेगळ्या विषयांसह चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. पिकू, मद्रास कॅफे, विकी डोनर सारख्या चित्रपटांचे नेहमीच कौतुक झाले आहे. त्यामुळे त्याच्या उधम सिंग आणि गुलाबो सिताबो कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा अधिक वाढल्या आहेत.

कान्समध्ये दिसला कोमोलिकाचा जलवा

ADVERTISEMENT

संजीवनी’चे डाॅक्टर्स करणार आता ‘इश्कबाजी’

या जुन्या मालिकांचे टायटल ट्रॅक तुम्हाला आजही आवडतात का?

फोटोसौजन्य –  इन्स्टाग्राम

15 May 2019
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT