अमिताभ बच्चन कोरोना पॉझिटिव्ह निघाले आणि संपू्र्ण बॉलीवूड इंडस्ट्रीला एक मोठा धक्काच बसला. सध्या बिग बी नानावटी हॉस्पिटलमध्ये कोरोनावर ट्रिटमेंट घेत आहेत. त्यांच्यासोबत अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्याही कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. मात्र आता ऐश्वर्या आणि आराध्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे. अमिताभ बच्चन या गंभीर आजारपणातही ते आपल्या चाहत्यांशी सोशल मीडियावरून संपर्कात आहेत. अमिताभ बच्चन यांनी अॅटमिट झाल्यापासून बऱ्याचदा डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांची जाहीर कृतज्ञता व्यक्त केली. कोरोना पेशंटची सेवा करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा सेवा भाव पाहुन ते इतके भारावून गेले की त्यांनी चक्क हात जोडून एकदा सर्वांची कृतज्ञता व्यक्त केली होती. काही वेळापूर्वी त्यांनी पुन्हा एका सोशल मीडिया पोस्टमधून संपुर्ण आरोग्य विभागाला त्यांच्या अमुल्य शब्दांमध्ये धन्यवाद दिले आहेत. जाणून घेऊ या काय म्हणाले बिग बी…
बिग बीने केलं आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक
अमिताभ बच्चन यांनी ट्विटर अकाऊंटवरून आरोग्य कर्मचाऱ्यांची कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांनी शेअर केलं आहे की, “आरोग्य कर्मचारी अतिशय कठीण आणि भयानक परिस्थितीत त्यांचं काम करत आहेत. म्हणूनच आपण सुरक्षित आहोत… पांढऱ्या रंगाचे पीपीई युनिट घालून रूग्णांची सेवा करणारे डॉक्टर्स, नर्स, इतर स्टाफ म्हणजे देवाघरचे दूतच आहेत… एवढ्या मोठ्या कामात बिझी असुनही ते त्यांच्या पेशंटच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यासाठी वेळ काढतात” एवढं सांगत त्यांनी डॉक्टर नेहमी सर्वांसाठी करत असलेली ही प्रार्थना शेअर केली आहे.
बिग बी हॉस्पिटलमध्ये असा घालवत आहेत वेळ
अमिताभ बच्चन कोरोनामुळे जरी सध्या हॉस्पिटलमध्ये असले तरी ते या रोगाची चिंताकाळजी करत बसलेले नाहीत. या वेळात ते अनेक चांगल्या गोष्टी करून आपलं मन आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. बिग बी सध्या ब्लॉग लिहीत आहेत. वडीलांच्या कवितांचे पुन्हा स्मरण करीत आहेत. सोशल मीडियावरून चाहत्यांशी संपर्कात आहेत. मागच्या काही पोस्टमध्ये त्यांनी कवी मुंशी प्रेमचंद यांची कविता चाहत्यांसोबत शेअर केली होती. अमिताभ बच्चन यांनी शेअर केलं होतं की, “संसार मे गऊ( गाय) बननेसे काम नही चलता, जितना दबो, उतना ही दबाते है” अशा माध्यमातून ते त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या आयुष्यातील घटनांबाबत अपडेटस् आणि आचरणात आणण्यासारखे काही सल्ले देत आहेत.
बिग बीसाठी चाहतेदेखील करत आहेत प्रार्थना
अमिताभ बच्चन या वयातही त्यांचे काम तितक्याच उत्साहाने करताना आढळतात. लॉकडाऊनमध्ये बिग बी आणि आयुषमान खुराना यांचा ‘गुलाबो सिताबो’ हा चित्रपट प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामधील त्यांची भूमिका थोडी हटके आणि मजेशीर होती. लवकरच बिग बी आयान मुखर्जीच्या ‘ब्रम्हास्त्र’ आणि रुमी जाफरीच्या ‘चेहरे’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मात्र त्यासाठी बिग बीने लवकर कोरोनामुक्त आणि आरोग्यसंपन्न व्हायला हवं. बिग बीचा चाहता वर्ग खूपच मोठा आहे. बिग बीने लवकर बरं व्हावं आणि पुन्हा मोठ्या पडद्यावरून भेटीला यावं यासाठी चाहते मनापासून प्रार्थना करीत आहेत.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
सध्याच्या परिस्थितीत ज्येष्ठ कलाकारांनाही काम करण्याची संधी मिळावी,पण- धर्मेंद्र
नेहा कक्कर यंदा सारेगमच्या सेटवर साजरा करणार ‘रक्षाबंधन’
रिया चक्रवर्तीला अटक करण्याची मागणी, सुशांतच्या केसला नवे वळण