बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांना लेखनकलेचीही विशेष आवड आहे. यातील अनेकांनी बॉलीवूडमध्ये उत्तम अभिनयाने आपली स्वतंत्र जागा निर्माण केलेली आहे. कलाकाराला आपल्या भावना नेहमीच अभिनयातून व्यक्त कराव्या लागतात. विविध प्रकारच्या भूमिका निभावताना त्यांच्यातील कलाकार विकसित होत जातो. निरनिराळया भूमिकांचा अभ्यास करता करता त्यांच्याकडे अनुभवाची शिदोरी जमा होत असते. या शिदोरीचा भविष्यात त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वांवरच परिणाम होत असतो. बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी या अनुभवातून स्वतःची पुस्तके लिहीली आहेत. यासाठी जाणून घेऊ या बॉलीवूडचे कोणकोणते कलाकार आहेत प्रेरणा देणारे लेखकसुद्धा…
ट्विंकल खन्ना –
दिग्गज अभिनेत्री डिंपल कपाडियाची मुलगी आणि बॉलीवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारची पत्नी असूनही ट्विंकल खन्नाला अभिनयात फार रस कधीच नव्हता. अनेक मुलाखतीत तिने तिला अभिनयापेक्षा लेखनात अधिक इंटरेस्ट असल्याचं उघड केलं आहे. काही चित्रपटात काम केल्यावर तिने तिच्या लेखनकलेवर जास्त फोकस करण्याचा विचार केला. ट्विंकल खन्नाने मिसेस फनीबोन्स, दी लिजेंड ऑफ लक्ष्मी प्रसाद ही पुस्तकं लिहिली आहेत. तिच्या पुस्तकं लोकप्रिय असून ती नेहमीच तिच्या वादग्रस्त लिखाणासाठी चर्चेत असते.
करिना कपूर –
करिना कपूर म्हणजेच बॉलीवूडच्या बेबोलाही लिखाणाची आवड आहे. करिना कपूरने ‘दी स्टाईल डायरी ऑफ बॉलीवूड दिवा’ नावाचे पुस्तक लिहीलेलं आहे. यात तिने तिच्या आयुष्याबाबत आणि फिलॉसॉफीबाबत काही गोष्टी मांडल्या आहेत. आरोग्य, लाईफस्टाईल अशा गोष्टींवर तिने यात लिहिलेलं आहे.
शिल्पा शेट्टी –
बॉलीवूडची एक फिटनेस प्रिय अभिनेत्री म्हणून शिल्पा शेट्टी ओळखली जाते. ती तिचे फूड आणि फिटनेसचे व्हिडिओ बऱ्याचदा शेअर करत असते. फिटनेसबाबत जनजागृती करण्यासाठी शिल्पाने ‘दी ग्रेट इंडिअन डाएट’ नावाचे पुस्तक लिहीलेले आहे. ज्यातून तिने तिच्या चाहत्यांसाठी फिट राहण्याचा मंत्र शेअर केला आहे.
इमरान हाश्मी
बॉलीवूडचा सिरिअल किलर या नावाने इमरान प्रसिद्ध आहे. मात्र तो एक अभिनेता असण्यासोबतच लेखकसुद्धा आहे. इमरानने ‘दी किस ऑफ लाईफ’ नावाचे पुस्तक लिहिलेलं आहे. ज्यामध्ये त्याने त्याच्या मुलाला झालेल्या कॅंन्सरच्या अनुभवाबाबत सविस्तर लिहीलेलं आहे. ज्यात त्याने एका पित्याने अनुभवलेला संघर्ष व्यक्त केला आहे.
वाचा – Best Marathi Horror Novels
आयुषमान खुराना –
मागील काही वर्षांपासून एका मागोमाग हिट आणि हटके चित्रपटांसाठी आयुषमान खुराना प्रसिद्ध आहे. व्हिजे, आरजे आणि मग बॉलीवूड स्टार असा त्याचा या क्षेत्रातील प्रवास आहे. आयुषमानने त्याच्या रोमांचक प्रवासातील अनुभव एका पुस्तकात एकत्र बांधला आहे. ‘क्रेकिंग दी कोड’ अशा नावाचं त्याचं पुस्तक लोकप्रिय आहे.
नवाजुद्दीन सिद्धिकी –
नवाजुद्दीन त्याच्या अभिनयासोबतच एका पुस्तकाच्या लिखाणासाठी प्रसिद्ध आहे. ‘एन ऑर्डिनरी लाईफ: ए मेमोइअर’ रिलीज नावाचे पुस्तक त्याने लिहिलेलं आहे. नवाजुद्दीनच्या पुस्तकातील लेखन हे वादग्रस्त असून त्यात त्याने त्याच्या सहकलाकार निहारिका सिंह बद्दल काही खुलासे केले होते. नवाजुद्दीनने या वादानंतर जाहीर माफी मागून पुस्तकांच्या प्रती परत मागवल्या होत्या.
नसरूद्दीन शाह –
दिग्गज कलाकार नसरुद्दीन शाह यांचे बॉलीवूडमधील योगदान नक्कीच कायम लक्षात राहील असे आहे. त्यांनी या प्रवासाचे सविस्तर वर्णन त्यांच्या आत्मचरित्रात केलेले आहे. ‘एन देन वन डे: ए मेमोइअर’ अशा नावाचे आत्मचरित्र त्यांनी लिहिलेलं आहे. लहान शहारातून अभिनयासाठी मुंबईला आलेल्या या अभिनेत्याने बॉलीवूडधील त्याचा सुंदर प्रवास यात मांडण्यात आलेला आहे.
याप्रमाणेच बॉलीवूड कलाकार अनुपम खेर, ऋषी कपूर, सोनु सूद, सोहा अली खान अशा अनेक कलाकारांनी अभिनयाप्रमाणेच लेखनक्षेत्रात आपले योगदान दिलेलं आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
‘या’ बॉलीवूड कलाकारांचे आहेत राजघराण्याशी संबंध
बॉलीवूड चित्रपटांमध्ये ‘या’ कलाकारांनी साकारली आहे डॉक्टरची भूमिका
या बॉलीवूड अभिनेत्री हुबेहूब दिसतात त्यांच्या ‘आई’सारख्या