बॉलीवूड सेलिब्रेटीज जे आहेत अजूनही अविवाहित

बॉलीवूड सेलिब्रेटीज जे आहेत अजूनही अविवाहित

भारतीय संस्कृतीमध्ये 'विवाह' हा एक धार्मिक संस्कार समजला जातो. असं म्हणतात की, लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात. लग्नसंस्कारातून उपवर मुलामुलींना आयुष्यभर एकत्र संसार करण्यासाठी सामाजिक मान्यता आणि आर्शीवाद दिली जाते. मात्र  आता बदलत्या काळानुसार प्रेम, लग्न, नातं या सर्वच गोष्टींमध्ये अनेक बदल झाले आहेत. बॉलीवूडमध्ये तर असे अनेक सेलिब्रेटीज आहेत ज्यांनी लग्नाचे वय उलटून गेल्यावरही विवाह केलेला नाही. जाणून घेऊ या अशा काही अविवाहित कलाकारांविषयी...

सलमान खान -

बॉलीवूडमधला कोणताही विषय असो त्यामध्ये भाईजान सलमान खानचं नाव नक्कीच गुंफलं जातं. त्यामुळे सुरूवात त्याच्यापासूनच करूया... सलमानला आजही तू लग्न कधी करणार? हा प्रश्न वारंवार विचारला जातो. बी-टाऊनमध्ये सलमानचं लग्न हा एक चर्चेचा विषय ठरू शकतो. कारण सलमानची आतापर्यंत अनेक अफेअर्स झाली आहेत मात्र ती लग्नापर्यंत कधीच गेली नाहीत. 

Instagram

तब्बू -

तब्बू ही बॉलीवूडची एक प्रतिभावान अभिनेत्री आहे. तिच्या सक्षम अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि नृत्यकलेचे  चाहते अनेक आहेत. मात्र तब्बूने वयाची चाळीशी उलटूनही लग्न केलेलं नाही. तब्बूचे अफेअर साजिद नाडीयादवाला याच्याशी होतं मात्र हे नातं फार टिकू शकलं नाही. असं म्हणतात की, ती साऊथ अभिनेता नागार्जूनच्याही प्रेमात होती. मात्र तिने अजुनपर्यंत कुणाशीच लग्न करण्याचा विचार केलेला नाही.

Instagram

सु्श्मीता सेन -

सुश्मीता सेन आणि तिच्या दिलखेचक अदांचे चाहते अनेक आहेत. मिस युर्निव्हर्स आणि बॉलीवूड अभिनेत्री असल्यामुळे तिचं अनेकांशी नातं जुळलं मात्र ते लग्नापर्यंत कधीच गेलं नाही. सुश्मीताने लग्न न करताच सिंगल मदर होण्याचा निर्णय घेतला. तिने रिने आणि अलिशा या दोन मुलींना दत्तक घेऊन एकटीनेच तिचा जीवनप्रवास सुरू ठेवला. सध्या तिचे रोहमन शॉल याच्याशी सूत जुळलं आहे मात्र हे नातं लग्नापर्यंत जाणार की नाही हे मात्र कुणीच सांगू शकत नाही. 

https://www.instagram.com/p/B9RgSReh68J/

अमीशा पटेल -

अमीशा पटेलने 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून पदार्पण करून अनेकांच्या ह्रदयाची स्पंदने वाढवली होती. बॉलीवूडमध्ये यशाच्या पायऱ्या चढू लागताच तिचं दिग्दर्शक विक्रम भट याच्याशी अफेअर असल्याची चर्चा सुरू झाली होती मात्र थोड्याच दिवसात हे नातं संपुष्टात आलं. त्यानंतर तिचं सूत लंडनमधील कनव पुरी या बिझनेसमॅनशी जुळलं. पण हेही नातं लग्नापर्यंत पोहचलं नाही. ज्यामुळे अमीशा आजही अविवाहीतच आहे.

Instagram

करण जोहर -

बॉलीवूडमध्ये गॉसिप आणि करण जोहर यांचं एक अजीब नातं आहे. बी-टाऊनमध्ये कोण कोणाला डेट करत आहे आणि कोणाचं सूत कोणाशी जुळलं आहे हे करणला सर्वात आधी समजतं. मात्र करणच्या आयुष्याबाबत गॉसिप करण्यासारखं कुणीच नाही. त्याच्या वैयक्तिक आयुष्याचे खुलासे त्याने त्याच्या आत्मचरित्रात केले आहेत. ज्यातुन तो लग्न न करताच एकटा का आहे हे समजू शकतं. मात्र करणने सरोगसीच्या माध्यमातून दोन मुलांना जन्म दिलेला आहे. सध्या तो त्याच्या रूही आणि यश यांच्यासोबत आपलं जीवन आनंदात घालवत आहे. 

Instagram

तुषार कपूर -

दिग्गज अभिनेता जितेंद्र यांचा मुलगा आणि डेली सोप क्वीन एकता कपूरचा भाऊ तुषार कपूरही अजूनही सिंगलच आहे. त्याचे राधिका आपटे आणि अमृता रावची सूत जुळल्याची चर्चा होती मात्र ही नाती लग्नापर्यंत गेली नाहीत. ज्यामुळे त्याने सिंगल पॅरेंट होण्याचा निर्णय घेतला. तुषारलाही सरोगसच्या माध्यमातून लक्ष्य नावाचा गोंडस मुलगा आहे. तुषार पाठोपाठ एकतानेही सरोगसीने सिंगल पॅरेंट होण्याचा निर्णय घेतला. तिच्या मुलाचे नाव रावी असे आहे. 

Instagram

संजय लीला भन्साली

हम दिल दे चुके सनम, बाजीराव मस्तानी, पद्मावत आणि देवदास सारखे सुपरहिट चित्रपट बॉलीवूडला देणाऱा दिग्दर्शक संजय लीला भन्सालीही एकटाच आहे त्याने अजूनही लग्न केलेलं नाही. त्याने त्याच्या कामाशीच लग्न केलेलं आहे त्यामुळे त्याला आयुष्यात दुसऱ्या कोणत्या जोडीदाराची गरज नाही. 


या कलाकारांप्रमाणेच दिनो मोरीया, राहुल खन्ना, रणदीप हुडा, साजीद खान, उदय चोप्रा, राहुल बोस, अक्षय खन्ना, तनीशा मुखर्जी, दिव्या दत्त हे कलाकारही अजुनही अविवाहितच आहेत. 

फोटोसौजन्य -  इन्स्टाग्राम

अधिक वाचा -

आरोग्य कर्मचारी म्हणजे देवदूत, बिग बीने व्यक्त केली कृतज्ञता

संगीतकार विशाल शेखरला टक्कर देतोय रितेश देशमुखचा मुलगा

घटस्फोटानंतरही भक्कमपणे उभ्या राहिल्या या अभिनेत्री