लॉकडाऊनच्या काळात 'या' बॉलीवूड कलाकारांचे टिक टॉक व्हिडिओ व्हायरल

लॉकडाऊनच्या काळात 'या' बॉलीवूड कलाकारांचे टिक टॉक व्हिडिओ व्हायरल

कोरोना व्हायरसमुळे सध्या देशात लॉकडाऊन करण्यात आलेलं आहे. ज्यामुळे सर्वसामान्य जनतेप्रमाणे सर्व सेलिब्रेटीजनांदेखील घरात राहावे लागत आहे. लॉकडाऊनमुळे चित्रपट आणि दैनंदिन मालिकांचे शूटिंगसुद्धा सध्या बंदच आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन सध्या टेलिव्हिजनवर पुनःप्रसारित करण्यात येणाऱ्या जुन्या मालिकांमधून होत आहे. मात्र कलाकारांना प्रेक्षकांचे मनोरंजन केल्याशिवाय आनंद मिळत नाही. म्हणून काही सेलिब्रेटीज घरातूनच त्यांच्या चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत. सोशल मीडियावर टिकटॉक व्हिडिओ शेअर करून हे कलाकार आपल्या चाहत्यांना हसवण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वतःच्या आणि इतरांच्या मनाला रमवण्याचा हा एक चांगला प्रयत्न असून या कलाकारांच्या व्हिडिओजला चांगला प्रतिसाददेखील मिळत आहे. 

शिल्पा शेट्टी -

शिल्पा शेट्टीचे सोशल मीडियावर अनेक फॉलोव्हर्स आहेत. ज्यामुळे सोशल मीडयावरील तिचे टिक टॉक व्हिडियोज सध्या अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. शिल्पा शेट्टी सध्या तिचे पती राज कुंद्रा, मुलगा विहान आणि नुकतीच झालेली छकुली शमिशा हिच्यासोबत होम क्वारंटाईनचा आनंद घेत आहे. मात्र घरातूनच ती आणि राज प्रेक्षकांसाठी त्यांचे काही खास टिकटॉक व्हिडिओ शेअर करत आहेत. मग ते घरातील काम करताना असो अथवा नवऱ्यासोबत खोटं खोटं भांडण असो त्यांचे हे व्हिडिओ पाहण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक आहेत. 

रितेश देशमुख -

रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख ही एक क्यूट सेलिब्रेटी जोडी आहे.  या दोघांचे टिक टॉक व्हिडिओज नेहमीच सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असतात. मात्र सध्या त्यांच्या व्हिडिओजमुळे अनेकांचे मनोरंजन नक्कीच होत आहे. घरातील भांडी घासण्यापासून ते थेट कोरोनाला पिटाळून लावेपर्यंत विविध विषयावर या दोघांनी सध्या टिक टॉक व्हिडिओ केलेले आहेत. 

अनिता हसनंदानी

नागिण या मालिकेतील अनिता हंसनंदानी सुद्धा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात मुळीच मागे नाही. ती आणि तिचा पती रोहित रेड्डीचे मजेशीर टिक टॉक व्हिडिओ पाहणं हा सध्या अनेकांच्या घरातील खास कार्यक्रम झाला आहे. अनिता तिच्या फॉलोव्हर्ससाठी रोज काहीतरी नवीन मनोरंजनाचा धमाका घेऊन येत आहे. 

कार्तिक आर्यन -

बॉलीवूड मध्ये सध्या सर्वात मस्तीखोर अभिनेता म्हणून कार्तिक आर्यनला ओळखलं जातं. त्याची स्टाईल आणि अभिनयावर अनेक तरूणी फिदा आहेत. मात्र त्याचा टिक टॉकवरील हा खास अंदाज सर्वांनाच खिळवून धरत आहे. क्वारंटाईनमुळे घरात बसलेल्या चाहत्यांना कार्तिक मजेशीर गोष्टींतून केलेल्या या व्हिडिओजमुळे पोटधरून हसवत आहे.

जॅकलिन फर्नांडिस -

अभिनेत्री जॅकलिन सध्या चित्रपटांपासून दूर आहे मात्र ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असते. सध्या घरातून जॅकलिन तिच्या चाहत्यांसाठी अनेक मनोरंजक व्हिडिओ पोस्ट करत आहे. ज्यामुळे तिच्या चाहत्यांना सतत काहीतरी नवीन आणि मनोरंजक पाहण्यासाठी संधी मिळत आहे.  

अंकिता लोखंडे -

अंकिता लोखंडे सध्या लॉकडाऊन मुळे घरात आहे. ज्यामुळे ती सध्या टिक टॉक व्हिडिओ तयार करून स्वतःचं आणि इतरांचे मनोरंजन करत आहे. घरच्यांसोबत वेळ घालवता घालवता ती या पद्धतीने तिच्या चाहत्यांच्या देखील सतत संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे.