दीपिकाला बघण्यासाठी ‘छपाक’ च्या सेटवर चाहत्यांची गर्दी, व्हिडिओ व्हायरल

दीपिकाला बघण्यासाठी ‘छपाक’ च्या सेटवर चाहत्यांची गर्दी, व्हिडिओ व्हायरल

दीपिका पादुकोण सध्या आपला आगामी चित्रपट ‘छपाक’च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. तिने या चित्रपटासाठी घेतलेली मेहनत आणि तिचा या चित्रपटातील लुक खूपच व्हायरल झाला असून दीपिकाच्या लुकची चाहत्यांकडून खूपच प्रशंसा होत आहे. दीपिका या चित्रपटामध्ये अॅसिड अटॅक सर्व्हायवर लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारत आहे. ही भूमिका साकारणं तिच्यासाठी नक्कीच आव्हानात्मक आहे. पण दीपिका जेव्हा तिच्या सेटवर या लुकमध्ये पोहचली तेव्हा तिला पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांनी अक्षरशः गर्दी केली होती. या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होतो आहे.  


‘छपाक’ च्या चित्रीकरणाला सुरुवात


गेल्या दहा दिवसापासून मेघना गुलजार दिग्दर्शित ‘छपाक’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी 10 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा दिल्लीमध्ये घडली असल्यामुळे सध्या ‘छपाक’ची पूर्ण टीम जुन्या दिल्लीमध्ये दिसून येत आहे. जेव्हा दीपिका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी या लुकमध्ये पोहचली तेव्हा दीपिकाला बघण्यासाठी या ठिकाणी चाहत्यांनी खूपच गर्दी केली होती. तिला या लुकमध्ये पाहण्यासाठी चाहते बराच वेळ वाट पाहात होते. तिची एक झलक मिळवण्यासाठी चाहते ताटकळत उभे राहिले होते. या चित्रीकरणादरम्यानचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे.

हा व्हिडिओ बघून तुम्ही अंदाज लाऊ शकता की, दीपिकाचे चाहते तिच्या या नव्या रूपाची आणि तिच्या हिमतीची किती प्रशंसा करत आहेत. यावेळी दीपिकानेही तिच्या चाहत्यांना नाराज केले नाही. तिने तिच्या चाहत्यांना याच लुकमध्ये प्रतिसादही दिला.


दीपिका घेत आहे बरीच मेहनत


दीपिकाची ही भूमिका लक्ष्मी अग्रवाल नावाच्या पीडित महिलेवर आधारित आहे. या चित्रपटाच्या तयारीसाठी लक्ष्मीशी निगडीत सर्व ऑनलाईन माहिती आणि मीडियातील बातम्यांचा अभ्यास सध्या दीपिका करत आहे. याशिवाय लक्ष्मी अग्रवालशीही दीपिका व्यक्तीगतरित्या संवाद साधत आहे. सूत्रानुसार लक्ष्मीने दीपिकासमोर अशाही काही गोष्टी ठेवल्या आहेत, ज्या अजून मीडियासमोरही आल्या नाहीत. यामध्ये दीपिका मालती नावाच्या मुलीची भूमिका करत असून पहिल्यांदाच मेघना गुलजारबरोबरही काम करत आहे. शिवाय या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये दीपिकाचा पुढाकार आहे. दीपिकाच्या प्रॉडक्शन हाऊस अन्वये बनणारा हा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे पहिलाच चित्रपट अशा वेगळ्या विषयावर निवडल्याबद्दलही दीपिकाची प्रशंसा होत आहे.  छपाक’सारखा संवेदनशील सिनेमा प्रोड्यूस करण्याचं दीपिकाचं हे पाऊल नक्कीच उल्लेखनीय आहे. त्यामुळे सध्या दीपिकाची दुहेरी कसरत सुरू आहे.


प्रथमच विक्रांत मेसीबरोबर दिसणार दीपिका


विक्रांत मेसीने आतापर्यंत खूपच वेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. दीपिकाबरोबर विक्रांत पहिल्यांदाच काम करत आहे. पण टेलिव्हिजनवर विक्रांतच्या कामाची नेहमीच प्रशंसा करण्यात आली आहे. शिवाय वेबसिरीजमध्येही विक्रांतचं बरंच नाव आहे. विक्रांतने आजपर्यंत अनेक भूमिका साकारल्या असून ही त्याच्या करिअरला वळण देणारी भूमिका ठरू शकते.


खाजगी आयुष्याबाबत बोलायचं झाल्यास दीपिका आणि रणवीर सिंग ही जोडी नुकतीच उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाशच्या लग्नाच्या वेळी एकत्र दिसली होती.


 

खाजगी आयुष्याबाबत बोलायचं झाल्यास दीपिका आणि रणवीर सिंग ही जोडी नुकतीच एका जाहिरातीमध्ये दिसली होती. शिवाय लग्न झाल्यानंतर या दोघांनी पहिल्यांदाच एकत्र काम केलं आहे.


फोटो सौजन्य - Instagram 


हेदेखील वाचा - 


First Look : 'छपाक' मध्ये अशी दिसणार दीपिका पदुकोण


दीपिकाच्या पुढे गेली कंगना, एका चित्रपटासाठी मिळाले तब्बल २४ कोटी


रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण पुन्हा एकत्र