नेहा कक्कड हे बॉलीवूड आणि गाण्याच्या दुनियेतील प्रसिद्ध नाव आहे. आपल्या आवाजाची जादू नेहाने अनेक प्रेक्षकांच्या मनावर गाजवली आहे. नेहा नेहमीच सोशल मीडियावरदेखील अॅक्टिव्ह असते त्यामुळे तिच्या चाहत्यांच्या संख्येत रोज नव्याने वाढ होत असते. असं असलं तर नेहा सध्या एक कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन झाली आहे. मागच्या वर्षी एका रियालिटी शो मध्ये हिमांश कोहलीबरोबरचं आपलं नातं नेहाने सांगितलं होतं. पण काही महिन्यातच हे दोघं वेगळे झाले आणि नेहा आणि हिमांश चर्चेचा विषय बनले. आता पुन्हा एकदा नेहा यावर्षी याच रियालिटी शो ची परीक्षक आहे. पुन्हा एकदा नेहा चर्चेत आली आहे ती एका वेगळ्या व्हिडिओमुळे. मात्र यावेळचं कारण आहे वेगळं. या रियालिटी शो दरम्यान नेहाला एका स्पर्धकाने चक्क जबरदस्तीने पकडून Kiss केल्याचं समोर आलं आहे.
विशाल दादलानी यांनी पोलिसांना बोलवण्यास सांगितलं
नेहा कक्कड सध्या एका रियालिटी शो ची परीक्षक म्हणून काम करत आहे. तिच्याबरोबर विशाल दादलानी आणि अन्नू मलिकदेखील या शो मध्ये आहेत. याचवेळी नेहाचे अनेक चाहतेदेखील स्टेजवर येऊन परफॉर्मन्स देतात आणि तिची भेट घेतात. अशाच एका चाहत्याने तिला स्टेजवर बोलावले. पण तिच्यावर जबरदस्ती करत तिच्या गालावर किस घेतलं. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या प्रकारानंतर विशाल दादलानी यांनी पोलिसांना बोलावण्यास सांगितलं होतं. पण या प्रकरणानंतरही त्या स्पर्धकाला सोडून देण्याचा निर्णय नेहाने घेतला. त्यामुळे सध्या यावर उलटसुलट चर्चा होत आहे.
नेहासाठी कॉन्ट्रोव्हर्सी नवी नाही
नेहा कक्कड नेहमीच कोणत्या ना कोणत्या कॉन्ट्रॉव्हर्सीमध्ये फसत असते. नेहा अनेक गाणी म्हणते. शिवाय तिचा आवाज बऱ्याच जणांना आवडतो. तिचे अनेक चाहते आहेत. याआधीदेखील नेहाला एका स्पर्धकाने लग्नाची मागणी घातली होती. तर मागच्या रियालिटी शो मधील एका स्पर्धकाबरोबर तिचं नावही जोडण्यात आलं आहे. पण हिमांश कोहलीबरोबरच्या नात्यानंतर नेहाने या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी बराच वेळ लावला. तिने याविषयी प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी सांगितलं. त्यामुळे नेहाच्या नावाची अधिक चर्चा झाली. मात्र या विषयावर हिमांश कधीही बोलला नाही आणि ना कधी त्याने नेहाच्या नावाची बदनामी केली.
गायिका नेहा कक्करने सांगितलं ब्रेकअपमागचं खरं कारण
हिमांशशी ब्रेकअप झाल्यावर नेहाची प्रतिक्रिया
नेहा तिच्या प्ले बॅक सिंगिंगमुळे प्रसिद्ध आहे. पण हिमांश कोहलीसोबतच्या रिलेशनशीप आणि ब्रेकअपनंतर सगळ्यात जास्त चर्चेत आली. कारण ब्रेकअपनंतर तिने सोशल मीडियावरुन व्यक्त होण्याचा प्रयत्न केला. त्यापुढे जात तिने खास हिमांशसाठी ‘इसमे तेरा घाटा’ या गाण्याचा व्हिडिओ तयार करुन पोस्ट केला. तिचे असे वागणे पोरकटपणाचे असल्याच्या प्रतिक्रिया तिच्या फॅन्सनीदेखील दिल्या. पण ते कळायला तिला बराच वेळ गेला. ज्यावेळी तिला तिची चूक लक्षात आली. त्यावेळी तिने मी असे करायला नको होते. मी थोडे भावूक असल्यामुळे मला माझ्या भावना आवरता आल्या नाहीत, अशी प्रतिक्रया नेहाने दिली आहे. नेहा सध्या बरचं काही करत असते त्यामुळे ती यातून सावरली आहे असं म्हणता येईल. शिवाय नेहा जी गाणी गाते ती प्रसिद्ध होतात. बऱ्याच जुन्या गाण्यांचे रिमेकदेखील नेहाने गायले आहेत.
बॉयफ्रेंडमधून बाहेर पडत नेहा कक्करने केली मोठी घोषणा
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.
मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.