बॉयफ्रेंडमधून बाहेर पडत नेहा कक्करने केली मोठी घोषणा

बॉयफ्रेंडमधून बाहेर पडत नेहा कक्करने केली मोठी घोषणा

हिंमाश कोहलीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर नेहा कक्करला झाले काय? असे बोलण्याची वेळ आली होती. कारण ब्रेकअपनंतरच्या तिच्या पोस्टनी अनेकांना हैराण करुन टाकले होते. पण आता नेहा कक्कर या ब्रेकअपमधून बाहेर पडली असून तिने एक मोठी घोषणा तिच्या फॅन्ससाठी नुकतीच केली आहे. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडिओनुसार ती तिच्या फॅन्सना प्रत्येक दिवशी ५० हजार रुपये देणार आहे.


सेटवर असा साजरा केला 'शितली' चा वाढदिवस


काय आहे ५० हजार देण्यामागचे कारण?


नेहा कक्करचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की, नेहा कक्कर एक रिअॅलिटी शो घेऊन येत आहे. हा रिअॅलिटी गेम शो असून तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरच खेळला जाणार आहे. या शोचे  नाव ‘Jhacaaash’ असे या गेम शोचे नाव आहे. हा शो लाईव्ह खेळला जाणार असून या गेम शो मध्ये नेहा बॉलीवूडशी निगडीत प्रश्न विचारणार आहे. यासाठी १० प्रश्न विटारले जाणार असून विजेत्याला ५० हजार रुपये बक्षीस  मिळणार आहे.


 

मालामाल होण्यासाठी व्हा तयार


आता हा गेम शो आहे म्हटल्यावर अनेकांची उत्सुकता वाढली असेल. हा गेम शो १८ मार्च पासून सुरु होणार आहे. आता हा लाईव्ह गेम शो असल्यामुळे तुम्हाला फेसबुकवरील Jhacaash नावाच्या फेसबुक पेजवर जायचे आहे. दर गुरुवारी संध्याकाळी ६ वाजता खेळला जाणार आहे. या गेमसंदर्भातील सगळे नियम फेसबुक पेजवर दिले जाणार आहेत.


समीराने ट्रोलर्सचं तोंड केलं बंद, वाचा काय म्हणाली समीरा


मी असं करायला नको होतं


नेहा तिच्या प्ले बॅक सिंगिंगमुळे प्रसिद्ध आहे. पण हिमांश कोहलीसोबतच्या रिलेशनशीप आणि ब्रेकअपनंतर सगळ्यात जास्त चर्चेत आली. कारण ब्रेकअपनंतर तिने सोशल मीडियावरुन व्यक्त होण्याचा प्रयत्न केला. त्यापुढे जात तिने खास हिमांशसाठी ‘इसमे तेरा घाटा’ या गाण्याचा व्हिडिओ तयार करुन पोस्ट केला. तिचे असे वागणे पोरकटपणाचे असल्याच्या प्रतिक्रिया तिच्या फॅन्सनीदेखील दिल्या. पण ते कळायला तिला बराच वेळ गेला. ज्यावेळी तिला तिची चूक लक्षात आली. त्यावेळी तिने मी  असे करायला नको होते. मी थोडे भावुक असल्यामुळे मला माझ्या भावना आवरता आल्या नाहीत, अशी प्रतिक्रया नेहाने दिली आहे. आता हे बघायचे आहे की, ती नक्की यातून बाहेर पडली आहे की, पुन्हा काहीतरी नवे ती करणार आहे.

हिमांश कोहली मात्र शांत


इतके सगळे होऊनही हिमांश कोहली मात्र शांत होता. त्याने या संदर्भात कुठेही काहीच वाच्यता केली नाही. शिवाय नेहाप्रमाणे त्याने तिच्यासोबतचे फोटो त्याच्या इन्स्टा अकाऊंटवरुनही काढून टाकले नाहीत.उलट त्याने हा ब्रेकअप फार हेल्दी वेने घेतला अशी प्रतिक्रिया लोकांनी दिली आणि नेहाला टार्गेट केले.सध्या हिमांश या सगळ्यापासून लांब गेला असून आपल्या भावंडासोबत तो क्वालिटी टाईम स्पेंड करत आहे.


कसौटीच्या सेटवर खरेच झाले कमोलिका आणि प्रेरणाचे भांडण 


himansh kohli