अभिनेत्री श्वेता तिवारी झाली हेअर स्टायलिस्ट, घरातच कापले मुलाचे केस

अभिनेत्री श्वेता तिवारी झाली हेअर स्टायलिस्ट, घरातच कापले मुलाचे केस

लॉकडाऊनमुळे सध्या सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रेटीजपर्यंत सर्वजण घरातच आहेत. एवढंच नाही तर जीवनाश्यक सेवा सोडल्यास इतर कोणतीही सेवा बाहेरून मिळणे शक्य नाही. त्याचप्रमाणे किराणा माल, औषधे, भाजीपाला आणि फळं सोडल्यास इतर कोणत्याही गोष्टींसाठी बाहेर जाणं आता शक्य नाही. लॉकडाऊनच्या काळामुळे घराेघरी लहान मुलांच्या डोक्यावर वाढणाऱ्या केसांची समस्या वाढू लागली आहे. घरातच राहून यावर काहीतरी उपाय करणं आता भाग आहे. कारण मुलांना या वाढणाऱ्या केसांमुळे फार गरम होत आहे. ज्यामुळे त्यांची चिडचिडदेखील होत असल्याचं चित्र समोर येत आहे. मात्र यावर सध्या अभिनेत्री श्वेता तिवारी हिने एक युक्ती शोधून काढली आहे. तिने घरातच कात्रीने स्वतःच्या मुलाचे केस कापले आहेत. जर तुमच्या घरातही अशी समस्या असेल तर हा उपाय करायला काहीच हरकत नाही.

Instagram

श्वेता तिच्या मुलांसाठी काहिही करायला आहे तयार

श्वेताने तिच्या सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिचा मुलगा रियांशची हेअर स्टायलिस्ट झालेली आहे. श्वेताने घरातील कात्रीने रियांशचा हेअर कट केला आहे. हे फोटो आणि व्हिडिओ पाहून तर तुम्हालाही श्वेता तिवारी एखादी प्रोफेश्नल हेअर स्टायलिस्ट असल्यासारखी वाटू शकते. तिचा मुलगा रियांशदेखील केस कापण्यासाठी अगदी शहाण्या बाळाप्रमाणे बसला आहे. एरव्ही मुलं सलॉनमध्ये केस कापण्यासाठी खूपच नाटकं करतात मात्र आता परिस्थितीचं गांभिर्य या छोट्याशा रियांशलापण समजलं असावं. 

Instagram

श्वेता तिवारीचा लॉकडाऊनमध्ये हा आहे दिनक्रम

सध्या श्वेता तिवारी तिचा मुलगा रियांश आणि मुलगी पलक यांच्यासोबत होम क्वारंटाईनचा काळ घालवत आहेत. मात्र ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांच्या नक्कीच संपर्कात असते. श्वेता तिवारीचा सध्या पुस्तके वाचणे, स्वयंपाक करणे आणि मुलांना सांभाळणे हा दिनक्रम आहे. या दिनक्रमातही तिचं एक अनोखं रूप जगासमोर आलं आहे. तिच्या मुलांचे योग्य संगोपन करण्यासाठी ती हातात कात्री घेऊन हेअरस्टायलिस्ट व्हायला देखील तयार आहे. 

श्वेता तिवारीचं खाजगी आयुष्य

श्वेता तिवारीच्या खासगी आयुष्यात तिला फार सुख कधीच मिळालं नाही. 1998 मध्ये तिने अभिनेता राजा चौधरीबरोबर लग्न केलं होतं. मात्र मुलगी पलक झाल्यावर तिने राजाला घटस्फोट दिला. त्यानंतर श्वेताने अभिनेता अभिनव कोहलीसह दुसरं लग्न केलं. या दोघांना रेयांश नावाचा मुलगा झाला मात्र अभिनवशीही श्वेताने घटस्फोट घेतला. दुसऱ्या लग्नात तर मुलगी पलक हिने अभिनव कोहली यावर विनयभंगाचा आरोप केला होता आएकंदरीतच तिच्या दोन्ही लग्नामध्ये तिला कोणत्याही प्रकारचं सुख मिळू शकलेलं नाही. आता केवळ आपल्या मुलांवरच प्रेम करायचं असं तिने ठरवलं आहे. सध्या श्वेता तिच्या दोन्ही मुलांना एकटीच सांभाळत आहे. सीरियलच्या दुनियेपासून श्वेता काही वर्षांपासून लांब असली तरी तिने अभिनयाशी तिचं नातं कायम ठेवलं आहे. आपल्या मुलांना पूर्ण वेळ देत तिने काही नाटकांमध्ये काम केलं आहे. 

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम 

हे ही वाचा-

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा

अधिक वाचा - 

लॉकडाऊनच्या काळात 'या' बॉलीवूड कलाकारांचे टिक टॉक व्हिडिओ व्हायरल

महानायकाने केला #weareone चा संकल्प, एक लाख मजुरांना दिला मदतीचा हात

लॉकडाऊनमुळे जुन्या मालिका आल्या पुन्हा ट्रेंडमध्ये